Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना दुय्यम वागणूक, आत्मसन्मानासाठी संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल’, एसटी कर्मचारी काँग्रेसचा बीड विभागाला इशारा

बीड एसटी विभागात बाहेरून बदली होऊन आलेल्या कर्मचाऱ्यांवर ज्येष्ठतेच्या नावाखाली अन्याय होत असल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला. परिपत्रकाची योग्य अंमलबजावणी करून सर्व कर्मचाऱ्यांना समान न्याय द्यावा, अन्यथा आत्मसन्मानासाठी आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 14, 2026 | 03:51 PM
एसटीच्या बीड विभागात ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना दुय्यम वागणूक

एसटीच्या बीड विभागात ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना दुय्यम वागणूक

Follow Us
Follow Us:
  • एसटीच्या बीड विभागात ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना दुय्यम वागणूक
  • आत्मसन्मानासाठी संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल
  • श्रीरंग बरगे यांचा बीड जिल्ह्यातील एसटीच्या व्यवस्थापनाला इशारा
बीड : बीड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एसटी विभागीय कार्यालयासमोर महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी बीड एसटी विभागाच्या व्यवस्थापनावर गंभीर आरोप करत बदली होऊन आलेल्या कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या कथित अन्यायाचा मुद्दा उपस्थित केला.

बरगे म्हणाले की, बीड जिल्ह्यातील अनेक तरुण नोकरीसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांत अनेक वर्षे सेवा बजावतात. तब्बल १० ते २० वर्षे बाहेर काम केल्यानंतर त्यांची मूळ जिल्ह्यात बदली होते. मात्र, आपल्या कुटुंबासोबत उर्वरित सेवाकाळ घालवण्याची संधी मिळाल्यानंतरही त्यांना कामगिरी वाटप करताना वारंवार दुय्यम वागणूक दिली जाते.

St Employees Salary : एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! वेतन वाढीचा थकीत हप्ता बँक खात्यात जमा

त्यांच्या मते, “तुम्ही बाहेरून बदली होऊन आलात, त्यामुळे ज्येष्ठता यादीत खाली आहात. ही कामगिरी मिळणार नाही, ती कामगिरी मिळणार नाही,” अशा शब्दांत संबंधित कर्मचाऱ्यांचा मानसिक छळ केला जातो. ही बाब केवळ अन्यायकारक नसून कर्मचाऱ्यांच्या आत्मसन्मानालाही धक्का देणारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बरगे यांनी आरोप केला की, महामंडळाच्या परिपत्रकाचा बीड विभागात चुकीचा अर्थ लावला जात आहे. धाराशिव आणि सातारा विभागात त्याच परिपत्रकाची अंमलबजावणी वेगळ्या पद्धतीने केली जाते, तर बीड विभागात मात्र त्याचा विपरीत अर्थ काढून बदली होऊन आलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या कामगिरीपासून वंचित ठेवले जाते.

ते म्हणाले की, बदली कर्मचाऱ्यांना कोणतेही अतिरिक्त भत्ते किंवा विशेष सुविधा नकोत. त्यांना फक्त महामंडळाच्या परिपत्रकानुसार मिळणारे हक्क आणि समान वागणूक हवी आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास कर्मचाऱ्यांच्या आत्मसन्मानासाठी आंदोलन उभारण्यास संघटना मागे हटणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

या कार्यक्रमात अनेक कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कार्यक्रमाला राजेंद्र वाहटुळे, विशाल कांबळे, विजय जगताप, अभिजित सूर्यवंशी, अशोक महानोर, शेषराव नागरगोजे, ईश्वर माळवाले, भगवान गर्जे, श्रीकृष्ण येवले, विकास गीते, बाळकृष्ण पेंटुळे, गजानन गिराम, राजकुमार आंधळे यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

अर्थ खात्याविरुद्ध ‘बोंब मारो आंदोलन’; वेतनवाढ फरक हप्ता न दिल्यास…; एसटी कर्मचारी काँग्रेसचा इशारा

Web Title: Beed st employees transfer seniority dispute shrirang barge warning protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 03:51 PM

Topics:  

  • maharashtra
  • Shrirang Barge
  • ST Employees

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: ऊस उत्पादकांसाठी मोठी बातमी! 15 ऑक्टोबरपासून राज्यात गाळप हंगामाला सुरुवात
1

Devendra Fadnavis: ऊस उत्पादकांसाठी मोठी बातमी! 15 ऑक्टोबरपासून राज्यात गाळप हंगामाला सुरुवात

Dharashiv News: धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात विनापरवानगी वृक्षतोड? जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
2

Dharashiv News: धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात विनापरवानगी वृक्षतोड? जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Pratap Sarnaik: ॲप टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! कंपन्यांना 3 महिन्यांत द्यावी लागणार चालकांची संपूर्ण माहिती
3

Pratap Sarnaik: ॲप टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! कंपन्यांना 3 महिन्यांत द्यावी लागणार चालकांची संपूर्ण माहिती

Gondiya News: रोजगाराचा शोध काळाने रस्त्यावरच संपवला!  गोंदियामध्ये ट्रकच्या धडकेत मध्य प्रदेशातील ६ मजुरांचा मृत्यू
4

Gondiya News: रोजगाराचा शोध काळाने रस्त्यावरच संपवला!  गोंदियामध्ये ट्रकच्या धडकेत मध्य प्रदेशातील ६ मजुरांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.