Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matheran Leopard News : माथेरानमध्ये बिबट्याची दहशत; हनिमून पॉईंटजवळ पाळीव कुत्र्याची शिकार, घटना CCTV मध्ये कैद

माथेरानमधील हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा समोर आला आहे. रात्री पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्याची शिकार करणारा बिबट्या गणेश सणगरे यांच्या घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या घटनेनंतर हनिमून पॉईंट, लुईझा पॉईंट आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 14, 2026 | 03:32 PM
माथेरानमध्ये बिबट्याची दहशत; हनिमून पॉईंटजवळ पाळीव कुत्र्याची शिकार, घटना CCTV मध्ये कैद

माथेरानमध्ये बिबट्याची दहशत; हनिमून पॉईंटजवळ पाळीव कुत्र्याची शिकार, घटना CCTV मध्ये कैद

Follow Us
Follow Us:
  • माथेरानमध्ये पुन्हा बिबट्याचा वावर
  • रात्री कुत्र्यावर हल्ला
  • नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
 

कर्जत : माथेरान शहरातील जंगल भागात मोठ्या प्रमाणात स्थानिकांना बिबट्याचे दर्शन होते. हनिमून पॉईंट भागातील सनगरे यांची दुकानात असलेल्या कॅमेऱ्यात हा बिबट्या कैद झाला आहे.या बिबट्याने येथील कुत्र्याला लक्ष्य केले असून स्थानिक महिला दुकानदार भयभीत झाल्या आहेत. माथेरानमध्ये बिबट्याच्या वावराने पुन्हा एकदा नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास हनिमून पॉईंटजवळील गणेश सणगरे यांच्या घराबाहेरील पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून त्याची शिकार केली. ही संपूर्ण घटना सणगरे यांच्या घराच्या बाहेर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे.त्यानंतरच बिबट्याच्या हालचालींची खात्री झाली असून वन विभागाने त्याकडे लक्ष्य केंद्रित केले आहे. सीसीटीव्हीत बिबट्याचे दर्शन कैद झाल्याने परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले असून, या घटनेनंतर हनिमून पॉईंट, लुईझा पॉईंट आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Matheran News : माथेरानमध्ये दूषित पाणी थेट नळातून? साथीच्या आजारांचा धोका, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

राजेंद्र टी अँड कोल्ड्रिंक्स हे दुकान ज्योती राजेंद्र सनगरे चालवत असून रात्री त्या घरात एकट्याच होत्या. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास कुत्र्यांच्या भुंकणेंचे आवाजात ज्योती या उठल्या. त्यानंतर त्यांनी घरातून बाहेर पाहिले असता प्रचंड मोठ्या आकाराचा बिबट्या दिसून आला.दुकानातून स्पष्ट दिसत असलेली बिबट्याने कुत्र्याला शिकार केले होते.त्यावेळी ज्योती या प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत असताना देखील आरडाओरड करून बिबट्याला हाकलवून देण्याचा प्रयत्न केला.यापूर्वी ज्योती राजेंद्र सनगरे यांनी 2010 मध्ये घरची समोरच्या झाडावर बिबट्याने कुत्र्याला मारून ठेवले होते हे पाहिले होते तर काही महिन्यापूर्वी देखील दुकानासमोर रात्रीच्या वेळी पाहिले होते.त्यामुळे या परिसरात बिबट्याचा सातत्याने वावर असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.वन विभागाने या भागात गस्त वाढवून नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

बिबट्याचे हल्ले

सुमारे महिनाभरापूर्वी याच परिसरातील संदीप जाबरे आणि उज्वला चौधरी यांच्या घरातील पाळीव कुत्र्यांची बिबट्याने शिकार केली होती.
काही दिवसांपूर्वी माथेरान दस्तुरी नाका मार्गावरील माऊंटबेरी परिसरातही बिबट्याचे वारंवार दर्शन झाले होते. आता त्याने आपला वावर बदलून लुईझा पॉईंट हनिमून पॉईंट परिसरात वाढवल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

वनरक्षक जयवंत चिमटे

माथेरानच्या जंगलात सुमारे २ ते ३ वर्षे वयोगटातील बिबट्याचे तीन बछडे वास्तव्यास आहेत. त्यामुळे नागरिकांनी, विशेषतः रात्रीच्या वेळी, अधिक सतर्क राहावे. जंगला लगतच्या परिसरातील बंगले धारकांनी तसेच नागरिकांनी स्वतःची व पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी. रात्रीच्या वेळी विनाकारण बाहेर फिरणे टाळावे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ वन विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Matheran Accident : माथेरानहून परतणाऱ्या पर्यटकांवर संकट; ओव्हरलोड टेम्पो घाटात कलंडला, सात जण जखमी

Web Title: Matheran leopard spotted honeymoon point cctv dog hunt locals fear news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 03:32 PM

Topics:  

  • Leopard
  • maharashtra
  • Matheran

संबंधित बातम्या

Rain Update: गोविंदांच्या उत्साहात पावसाची भर! आज महाराष्ट्रात कुठे बरसणार सरी? जाणून घ्या हवामानाचा अंदाज
1

Rain Update: गोविंदांच्या उत्साहात पावसाची भर! आज महाराष्ट्रात कुठे बरसणार सरी? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Leopard News: CCTV मध्ये धडकी भरवणारे दृश्य! घराभोवती बिबट्याच्या फेऱ्या, रात्री घराबाहेर पडायचं कसं? गुहागरच्या काजळी गावात थरार
2

Leopard News: CCTV मध्ये धडकी भरवणारे दृश्य! घराभोवती बिबट्याच्या फेऱ्या, रात्री घराबाहेर पडायचं कसं? गुहागरच्या काजळी गावात थरार

Gokulashtami 2026: कला अन् कृष्णभक्तीचा सुंदर संगम; वसईच्या कलाकाराने बासरीवर रेखाटले श्रीकृष्ण
3

Gokulashtami 2026: कला अन् कृष्णभक्तीचा सुंदर संगम; वसईच्या कलाकाराने बासरीवर रेखाटले श्रीकृष्ण

ग्रामीण भागात किती वेळ लोडशेडींगला कायदेशीर परवानगी आहे? यासंबंधित तुम्ही कुठे आणि कशी तक्रार नोंदवू शकता? जाणून घ्या
4

ग्रामीण भागात किती वेळ लोडशेडींगला कायदेशीर परवानगी आहे? यासंबंधित तुम्ही कुठे आणि कशी तक्रार नोंदवू शकता? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.