Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Wangav Crime: “बचाव रे मला!” आईला केला शेवटचा कॉल अन् थरारक सत्याचा पर्दाफाश; अमानुष मारहाणीत तरुण जागीच मृत!

Beed Wangav Crime: जुनी दुचाकी खरेदी करायला गेलेल्या तरुणावर चोरीचा संशय घेत ट्रॅक्टरला बांधून दिली अमानुष मृत्यूची साक्ष! बीडमधील या थरारक हत्याकांडाने हादरले राज्य...

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 17, 2026 | 10:04 AM
Beed Wangav Crime: "बचाव रे मला!" आईला केला शेवटचा कॉल अन् थरारक सत्याचा पर्दाफाश; अमानुष मारहाणीत तरुण जागीच मृत!

Beed Wangav Crime: "बचाव रे मला!" आईला केला शेवटचा कॉल अन् थरारक सत्याचा पर्दाफाश; अमानुष मारहाणीत तरुण जागीच मृत!

Follow Us
Follow Us:
  • जुनी दुचाकी खरेदीला गेलेल्या दोन तरुणांना ट्रॅक्टरला बांधून अमानुष मारहाण
  • या मारहाणीत धाराशिवच्या तरुणचा मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी
  • पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटक 
Beed Wangav Crime: माणुसकीला काळिमा फागणारी आणि अंगावर काटा आणणारी एक धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातून समोर आली आहे. जुनी दुचाकी खरेदी करण्यासाठी आलेल्या दोन तरुणांवर ५० हजार रुपये आणि मोबाईल चोरीचा संशय घेत, त्यांना चक्क ट्रॅक्टरला बांधून पाईपने अमानुष मारहाण करण्यात आली आहे. या भीषण मारहाणीत धाराशिव जिल्ह्यातील एका ३८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे.

याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. संभाजी विश्वनाथ सारुक (वय ३८, रा. नांदगाव, ता. वाशी, जि. धाराशिव) असे मृत तरुणाचे नाव असून, हर्ष विकास जाधवर हा तरुण या हल्ल्यात जखमी झाला आहे.

हेही वाचा: हडपसरमध्ये मध्यरात्री थरार; सुरक्षा रक्षकावर धारदार शस्त्राने हल्ला, दोघे पोलिसांच्या ताब्यात

नेमका प्रकार काय घडला?

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील नांदगाव येथील संभाजी सारुक आणि हर्ष जाधवर हे दोघे रविवारी दुपारी मुकादम अशोक कागदे यांची जुनी दुचाकी खरेदी करण्यासाठी बीडमधील वानगाव येथे आले होते. दुचाकी पाहण्यासाठी अशोकने त्या दोघांना घरी पाठवले. तिथे पवन रोमण आणि इतर आरोपींनी संभाजी व हर्ष यांच्यावर ५० हजार रुपये आणि मोबाईल चोरी केल्याचा खोटा आरोप करत त्यांना मारहाण सुरू केली.

आरोपींनी क्रूरतेची सर्व सीमा ओलांडत संभाजी याला पाईपच्या साहाय्याने ट्रॅक्टरच्या नांगराला, तर हर्ष याला ट्रॅक्टरच्या बारपट्टीला बांधले आणि पाचही जणांनी मिळून दोघांना बेदम मारहाण केली. या अमानुष मारहाणीत संभाजी बेशुद्ध पडल्यानंतर सर्व आरोपींनी तिथून पळ काढला.

हेही वाचा: Accident News: मुक्या जनावराचे प्राण वाचवताना प्रसिद्ध मराठी कवयित्री यांचा भीषण अपघातात मृत्यू; साहित्य क्षेत्रात शोककळा!

आईला केलेल्या एका फोनमुळे घटना आली समोर

आरोपी पळून गेल्यानंतर जखमी अवस्थेतील हर्षने संभाजीच्या मोबाईलवरून आपली आई अनिता यांना फोन केला आणि घडलेला सर्व भयावह प्रकार सांगितला. माहिती मिळताच एका तासानंतर हर्षचे कुटुंबीय तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोघांचीही सुटका करून त्यांना धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.

मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच किंवा उपचारादरम्यान संभाजी यांचा आधीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. यानंतर नेकनूर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत ५ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला असून, यातील दोन आरोपींना अटक केली आहे, तर फरार असलेल्या इतर तिघांचा शोध सुरू आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली आहे?

    Ans: बीड जिल्ह्यातील वानगाव येथे ही धक्कादायक घटना घडली आहे

  • Que: तरुणांवर नेमका काय आरोप करण्यात आला होता?

    Ans: आरोपींनी त्या तरुणांवर ५० हजार रुपये आणि मोबाईल चोरी केल्याचा आरोप केला होता

  • Que: या प्रकरणात पोलिसांकडून काय काय कारवाई करण्यात आली आहे?

    Ans: नेकनूर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे

Web Title: Beed wangav old bike purchase youth murder neknoor police sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 10:04 AM

Topics:  

  • Beed Case
  • Beed Murder Case
  • Crime . Crime News
  • Sambhajinagar News

संबंधित बातम्या

Suspicious Death: “चार विहिरींचे पाणी उपसले अन् हाती लागला मृत्यूचा सर्वात मोठा पुरावा!”दौलतबाबा मृत्यू प्रकरणात धक्कादायक सत्य?
1

Suspicious Death: “चार विहिरींचे पाणी उपसले अन् हाती लागला मृत्यूचा सर्वात मोठा पुरावा!”दौलतबाबा मृत्यू प्रकरणात धक्कादायक सत्य?

Theft Case: देवदर्शनाला गेलेल्या कुटुंबाचे बंद घर फोडून तब्बल १३ लाखांचा ऐवज लंपास; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी चक्क …
2

Theft Case: देवदर्शनाला गेलेल्या कुटुंबाचे बंद घर फोडून तब्बल १३ लाखांचा ऐवज लंपास; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी चक्क …

Murder Pune: “पाणी भरण्याचा किरकोळ वाद ठरला जीवघेणा!” पुण्याच्या बालेवाडीत १९ वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून…
3

Murder Pune: “पाणी भरण्याचा किरकोळ वाद ठरला जीवघेणा!” पुण्याच्या बालेवाडीत १९ वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून…

Family Assault: “अश्लील मेसेजचा जाब विचारला म्हणून पोलिसाच्या कुटुंबावर हल्ला!”परप्रांतीय तरुणांच्या या मुजोरीमुळे उडाली खळबळ
4

Family Assault: “अश्लील मेसेजचा जाब विचारला म्हणून पोलिसाच्या कुटुंबावर हल्ला!”परप्रांतीय तरुणांच्या या मुजोरीमुळे उडाली खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.