Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis: “नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी…”; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

बेस्टच्या ताफ्यात ५०३ वातानुकूलित आणि पूर्ण इलेक्ट्रिकल बस दाखल झाल्या आहेत. यातील विक्रोळी ते मुंबई सेंट्रल या बसला हिरवी झेंडी दाखवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 25, 2025 | 09:53 PM
Devendra Fadnavis: “नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी…”; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: मुंबईतील नागरिकांची जीवनवाहिनी म्हणून ‘बेस्ट’ची ओळख आहे. नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर, आरामदायी होण्यासाठी ‘बेस्ट’ने अत्याधुनिक बस आणि प्रभावी सोयीसुविधा पुरविण्यासोबत स्वत:चे उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबईतील नागरिकांना प्रवास करताना जास्त ताटकळत थांबावे लागू यासाठी नियोजन करावे. बसच्या संख्या वाढविण्यासोबत बस किती वेळात येणार, सध्या कुठे आहे, याची माहिती प्रवाशांना होण्यासाठीच्या यंत्रणेची त्वरित अंमलबजावणी करावी. बांद्रा, दिंडोशी आणि देवनार बस डेपोंचा पुनर्विकास करताना जागा भाडेतत्वावर देताना धोरण ठरवावे. त्याठिकाणी व्यावसायिक गाळे, रहिवास आणि बेस्ट बस आगार अशा पद्धतीने रचना केल्यास बेस्टचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. मुंबईतील छोटे, अरूंद रस्ते पाहता अत्याधुनिक छोट्या बस घ्याव्यात. यासाठी केंद्र सरकारकडून येणाऱ्या एन कॅपच्या (नॅशनल क्लिन एअर पॉलिसी) निधीचा वापर करावा.

मुंबईमध्ये लोकल रेल्वे, मेट्रो, मोनोरेल आणि बससाठी सार्वजनिक वाहतूक प्रणाली एका सिंगल मोबिलिटी प्लॅटफॉर्मवर आणण्याची प्रणाली तयार होत आहे. यातून नागरिकांना एकाच तिकिटामध्ये प्रवास करता येणार असल्याने बेस्टला याचाही फायदा होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पाच बस डेपोच्या ठिकाणी मराठी सिनेमा थिएटर

बस डेपोंचा पुनर्विकास करताना करमणूक केंद्राचाही विचार करण्याबाबत सहपालक मंत्री शेलार यांनी सूचना केल्या. मराठी सिनेमाला उर्जितावस्था येण्यासाठी पाच ठिकाणी मराठी सिनेमा थिएटरची निर्मिती केल्यास यातूनही उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

‘मनपा’च्या बजेटमध्ये निधीची तरतूद

‘बेस्ट’वरील खर्चाचा भार कमी करण्यासाठी प्रत्येक वर्षी मुंबई महानगरपालिका मदत करते. मात्र ‘मनपा’च्या बजेटमध्ये तीन टक्के वाहतुकीसाठी राखीव तरतूद केली तर याचा ‘बेस्ट’ला फायदा होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी बेस्टचे व्यवस्थापक श्रीनिवास यांनी टोल माफ करावेत, कर्मचाऱ्यांच्या देण्यापोटीची १६५८ कोटी मिळावेत. सरकारी कर माफ करण्याची मागणी केली. याबाबत प्रस्ताव सादर करावेत, शासन याचा सकारात्मक विचार करेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

छोट्या गाड्यांचा प्रस्ताव तयार करा-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, नागरिकांच्या सोयीसाठी मेट्रो स्टेशन आणि बेस्ट बसच्या मार्गाचे नियोजन करावे. यासाठी छोट्या अत्याधुनिक बसचा प्रस्ताव तयार करावा. नागरिकांच्या करानुसार सोयीसुविधा पुरविण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या. मुंबई शहरात बेस्टच्या विविध ठिकाणी जागा आहेत, त्यातूनही उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत.

बेस्टच्या वातानुकूलित बसचे उद्घाटन

बेस्टच्या ताफ्यात ५०३ वातानुकूलित आणि पूर्ण इलेक्ट्रिकल बस दाखल झाल्या आहेत. यातील विक्रोळी ते मुंबई सेंट्रल या बसला हिरवी झेंडी दाखवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मुंबईसाठी २,१०० वातानुकूलित बसची खरेदी करण्यात आली असून यातील ५०३ बस मिळाल्या असून आणखी २,४०० बस मागविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

‘जीपीएस’साठी गुगलशी करार

प्रवाशांना सध्या बस कुठे आहे, किती वेळेत येईल, यानुसार प्रवासाचे नियोजन करण्यासाठी जीपीएस सिस्टीमचा उपयोग होणार आहे. यासाठी बेस्ट गुगलशी करार करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

बेस्ट बसची सद्यस्थिती

सध्या बेस्टकडे २,७८३ बस; यामध्ये ८७५ इलेक्ट्रीक बस

लोकसंख्येच्या तुलनेत सात हजार बसची आवश्यकता

रिक्षा, मेट्रो, टॅक्सीपेक्षा कमी भाडे; भाडेवाढीची मागणी

२०२७ पर्यंत सर्व बस इलेक्ट्रीक करण्याचा ‘बेस्ट’चा मानस

Web Title: Best provide standard bus services to make the journey of citizens instructed by cm devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2025 | 09:53 PM

Topics:  

  • Electric Buses
  • Mumbai
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Thane : ठाणेकरांचा मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
1

Thane : ठाणेकरांचा मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Virar: मोबाईल चिट्ठ्या घेऊन उमेदवाराचा मतदान केंद्रात प्रवेश, अपक्ष उमेदवाराने घेतला आक्षेप
2

Virar: मोबाईल चिट्ठ्या घेऊन उमेदवाराचा मतदान केंद्रात प्रवेश, अपक्ष उमेदवाराने घेतला आक्षेप

‘कामा’च्या आयसीयूत श्वसनविकारग्रस्त बालकांच्या रुग्णसंख्येत वाढ! वर्षभरात विविध समस्यांनी ३३५ नवजात उपचाराधीन
3

‘कामा’च्या आयसीयूत श्वसनविकारग्रस्त बालकांच्या रुग्णसंख्येत वाढ! वर्षभरात विविध समस्यांनी ३३५ नवजात उपचाराधीन

Electric Vehicle Market in India: भारताच्या ईव्ही क्रांतीला वेग! २०२५ मध्ये पीएलआय आणि पीएम ई-ड्राइव्हचा मोठा प्रभाव
4

Electric Vehicle Market in India: भारताच्या ईव्ही क्रांतीला वेग! २०२५ मध्ये पीएलआय आणि पीएम ई-ड्राइव्हचा मोठा प्रभाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.