Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhandara News: भंडारा जिल्ह्यात २१ वर्षांत ७८१ शेतकरी आत्महत्या! फक्त २ शेतकरी कुटुंबांनाच मदत; तब्बल ४७६ प्रकरणे ठरवली अपात्र

धान उत्पादक भंडारा जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे संकट कायम आहे. 2003 ते 2024 दरम्यान 781 घटनांपैकी 476 प्रकरणे अपात्र ठरली, तर 2025 आणि 2026 मध्येही आत्महत्यांच्या घटना सुरूच असल्याचे शासकीय आकडेवारीतून समोर आले आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 11, 2026 | 05:01 PM
Bhandara News: भंडारा जिल्ह्यात २१ वर्षांत ७८१ शेतकरी आत्महत्या! फक्त २ शेतकरी कुटुंबांनाच मदत; तब्बल ४७६ प्रकरणे ठरवली अपात्र
Follow Us
Follow Us:
  • भंडाऱ्यात 21 वर्षांत 781 शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली, मात्र केवळ 305 प्रकरणे मदतीस पात्र ठरली आहेत.
  • 2026 मध्ये नोंदलेल्या 10 आत्महत्यांपैकी फक्त 2 कुटुंबांना प्रत्येकी ₹1 लाखांची शासकीय मदत मिळाली आहे.
  • नापिकी, कर्जबाजारीपणा आणि कर्जफेडीचा तगादा यांसह विविध कारणांची चौकशी करून मदतीची पात्रता ठरवली जाते.
धान उत्पादक जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न अद्यापही गंभीर आहे. उपलब्ध शासकीय विवरणानुसार २००३ ते २०२४ या २१ वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यात ७८१ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली. यापैकी ३०५ प्रकरणे मदतीस पात्र ठरली, तर तब्बल ४७६ प्रकरणे अपात्र ठरली. म्हणजेच नोंद झालेल्या आत्महत्यांपैकी सुमारे ६१ टक्के प्रकरणे शासकीय मदतीच्या निकषांत बसली नाहीत. त्यानंतर २०२५ मध्ये ५० आणि जानेवारी ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत आणखी १० आत्महत्यांची नोंद झाली. २०२६ मधील १० प्रकरणांपैकी केवळ २ प्रकरणे पात्र ठरली असून दोन्ही कुटुंबांना प्रत्येकी एक लाख रुपये याप्रमाणे एकूण दोन लाख रुपयांची मदत देण्यात

कारणांचा स्वतंत्र अभ्यास आवश्यक

शेतकरी आत्महत्येमागे केवळ एकच कारण असते असे नाही. शेतीतील नुकसान, कर्जबाजारीपणा आणि आर्थिक अडचणींसोबत कौटुंबिक, सामाजिक आणि वैयक्तिक परिस्थितीही कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे प्रत्येक प्रकरणाची चौकशी करताना सर्व संबंधित बाबींचा संवेदनशीलपणे विचार होणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे २०१५ मध्ये ५६ आत्महत्यांच्या प्रकरणांपैकी ३२ प्रकरणे पात्र ठरली होती. २०१६ मध्ये ५४ पैकी ४१ प्रकरणे पात्र ठरली. मात्र २०२३ मध्ये ५६ पैकी केवळ १४ आणि २०२४ मध्ये ६० पैकी १३ प्रकरणे पात्र ठरली.

Suicide Prevention: विद्यार्थ्यांच्या मानसिक तणावात वाढ; केंद्र सरकारने कोणता तोडगा काढला? जाणून घ्या सविस्तर..

एक लाखाची मदत, मात्र निकषांची कसोटी कायम

पात्र ठरलेल्या शेतकरी आत्महत्या प्रकरणांमध्ये वारसांना शासनाकडून एक लाख रुपये आर्थिक मदत दिली जाते. जिल्ह्यात २००३ ते २०२४ या कालावधीत पात्र ठरलेल्या ३०५ प्रकरणांसाठी एकूण ३०५ लाख रुपये, म्हणजेच ३ कोटी ५ लाख रुपयांची मदत देण्यात आल्याची नोंद आहे. २०२५ मध्ये ५० आत्महत्यांच्या प्रकरणांपैकी १४ प्रकरणे पात्र ठरली, तर ३६ प्रकरणे अपात्र ठरली. २०२६ मध्ये ऑगस्टपर्यंत १० आत्महत्यांची नोंद झाली असून त्यापैकी २ प्रकरणे पात्र आणि ८ प्रकरणे अपात्र ठरली आहेत.

५ सयमानुसार प्रत्येक प्रकरणाची रितसर चौकशी तसेच संबंधित कागदपत्रांची केल्यानंतरच पडताळणी निर्धारित निकषांची पूर्तता करणाऱ्या पात्र प्रकरणांना आर्थिक मदत दिली जाते. २०२६ मध्ये ऑगस्टपर्यंत नोंद झालेल्या १० प्रकरणांपैकी पात्र ठरलेल्या प्रकरणांतील कुटुंबांना प्रत्येकी १ लाख रुपये याप्रमाणे आर्थिक मदत देण्यात आली आहे.- मनोहर चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी, भंडारा

NEET Exam Stress: नीट परीक्षेच्या तणावातून ‘या’ राज्यांमध्ये सर्वाधिक विद्यार्थ्यांच्या आत्महत्या; एकदा वाचाच धक्कादायक रिपोर्ट

अपात्रतेची कारणे काय ?

शेतकरी आत्महत्या झाल्यानंतर घटना शासकीय मदतीसाठी निर्धारित निकषांमध्ये बसते का, याची चौकशी केली जाते. नापिकी, कर्जबाजारीपणा आणि कर्जफेडीचा तगादा हे पात्रतेच्या तपासणीतील प्रमुख निकष आहेत. आत्महत्येचा संबंध या निकषांशी असल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्यास प्रकरण मदतीस पात्र ठरते. याउलट आत्महत्येचे कारण निर्धारित निकषांशी संबंधित नसल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास प्रकरण अपात्र ठरू शकते. महसूल आणि पोलिस यंत्रणेकडून शेतीची स्थिती, कर्जाची माहिती, उपलब्ध कागदपत्रे आणि आत्महत्येच्या कारणांचा तपास केला जातो. त्यानंतर प्रकरणाची पात्रता निश्चित करण्याची प्रक्रिया पार पडते.

धान उत्पादक शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी धान पिकावर अवलंबून आहेत. मात्र वाढता उत्पादन खर्च, हवामानातील अनिश्चितता, नापिकी, कर्जाचा भार, धानाच्या विक्रीतील अडचणी आणि बाजारपेठेतील चढ-उतार यामुळे शेतीचे अर्थकारण अनेकदा अडचणीत येते.

Web Title: Bhandara farmer suicide cases government aid marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 05:00 PM

Topics:  

  • Bhandara
  • Farmer Sucide
  • Farmers

संबंधित बातम्या

Shevgaon Farmers: शेवगावात पावसाळ्यातच दुष्काळाचे सावट! तीन महिन्यांपासून पाऊस गायब; पिके करपली, शेतकरी हवालदिल
1

Shevgaon Farmers: शेवगावात पावसाळ्यातच दुष्काळाचे सावट! तीन महिन्यांपासून पाऊस गायब; पिके करपली, शेतकरी हवालदिल

Bhandara News: भंडारा जिल्ह्यात २६९ परवानाधारक सावकार! एकही तक्रार नाही; अवैध सावकारी नाही की तक्रारीच पोहोचत नाही?
2

Bhandara News: भंडारा जिल्ह्यात २६९ परवानाधारक सावकार! एकही तक्रार नाही; अवैध सावकारी नाही की तक्रारीच पोहोचत नाही?

Devendra Fadnavis: ऊस उत्पादकांसाठी मोठी बातमी! 15 ऑक्टोबरपासून राज्यात गाळप हंगामाला सुरुवात
3

Devendra Fadnavis: ऊस उत्पादकांसाठी मोठी बातमी! 15 ऑक्टोबरपासून राज्यात गाळप हंगामाला सुरुवात

आदिवासी शेतकऱ्यांना मोठा दिलासा! स्ट्रॉबेरी लागवडीसाठी ४ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर; दिलीप वळसे पाटील यांची माहिती
4

आदिवासी शेतकऱ्यांना मोठा दिलासा! स्ट्रॉबेरी लागवडीसाठी ४ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर; दिलीप वळसे पाटील यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.