Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhandara: ३ महिन्यात दूध संकलनात मोठी घट; प्रशासकीय कारवाईचा धसका! भेसळ प्रकरण निरंक

भंडारा जिल्ह्यात अन्न व औषधी प्रशासनाची धडक तपासणी मोहीम आणि तीव्र उन्हाळ्यामुळे गेल्या तीन महिन्यांत दूध संकलनात मोठी घट नोंदवली गेली आहे. प्रशासनाने गोळा केलेल्या सर्व ४९ नमुन्यांची गुणवत्ता योग्य असल्याचे समोर आले असून जिल्ह्यात दुधातील भेसळीचे प्रमाण निरंक आढळले आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 28, 2026 | 03:48 PM
Bhandara: ३ महिन्यात दूध संकलनात मोठी घट; प्रशासकीय कारवाईचा धसका! भेसळ प्रकरण निरंक
Follow Us
Follow Us:
  • अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईच्या भीतीमुळे आणि कडक उन्हाळ्यामुळे भंडारात दूध संकलनात घट झाली.
  • जिल्ह्यातून तपासणीसाठी पाठवलेले दुधाचे सर्व ४९ नमुने मानकानुसार योग्य असून भेसळ निरंक आढळली.
  • संकलन घटले असले तरी जिल्ह्यात ग्राहकांना मिळणाऱ्या दुधाची गुणवत्ता उत्तम असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

दुग्धव्यवसाय हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा महत्त्वाचा पूरक व्यवसाय आहे. जिल्ह्यात पशुपालन मोठ्या प्रमाणावर होत असून नागरिक थेट शेतकऱ्यांकडून किंवा डेअरीमधून दूध खरेदी करतात. दरम्यानच्या काळात अन्न व औषधी प्रशासनाच्या धडक कारवाईमुळे आणि कडक उन्हाळ्यामुळे तीन महिन्यांत दूध संकलनात घट झाली असल्याचे समोर आले आहे.

तीन महिन्यांतील दूध संकलनाची आकडेवारी- जिल्ह्यात एप्रिल आणि जून या महिन्यांत दूध संकलनात तूट निर्माण झाली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार एप्रिल महिन्याच्या पहिल्या टप्प्यात एकूण दोन लाख ४६ हजार २९८ लिटर दूध संकलन झाले. त्यात खासगी प्रकल्पांकडून दोन लाख १७ हजार ४७७ लिटर तर दूध संघाने २८ हजार ८०१ लिटर संकलन केले. मागील वर्षीच्या तुलनेत यात दोन हजार २२१ लिटरची तूट आढळून आली. दुसऱ्या टप्प्यात एप्रिल महिन्यात एकूण दोन लाख ३६ हजार ९५९ लिटर दूध संकलन करण्यात आले.

Used Oil Scam: तुमच्या ताटात ‘विष’? मोठा स्कॅम उघड… वापरलेल्या खाद्यतेलाचा काळाबाजार; तब्बल 46 लाख लीटर जुनं तेल जप्त

यामध्ये खासगी माध्यमातून दोन लाख ९ हजार ३१ लिटर तर दूध संघाने ३४ हजार २८ लिटर संकलन केले. यात मागील वर्षीच्या तुलनेत १५ हजार तीन लिटरची तूट नोंदवली गेली. त्यानंतर जून महिन्यात एकूण दोन लाख २३ हजार ६९९ लिटर दूध संकलन झाले. त्यात खासगी दूध संकलन एक लाख ९९ हजार ४८४ लिटर तर दूध संघाने २५ हजार २१५ लिटर दूध संकलन केले.

गतवर्षीच्या तुलनेत जूनमध्ये १६१९५ लिटरची तूट आढळली. यंत्रणा आणि खासगी डेअरींचे जाळेः जिल्ह्यात एकूण २६२ सहकारी दूध संकलन संस्था कार्यरत आहेत. तसेच ११ खासगी डेअरींचा समावेश आहे. यामध्ये दिनशा, तुमसरे डेअरी, जैन डेअरी, जर्सी डेअरी, बन्सी डेअरी, एसव्हीके डेअरी, राहुल डेअरी, अग्रवाल डेअरी, अतुल डेअरी, वसंत डेअरी, लोकमंगल डेअरी यांचा समावेश आहे.

FDA Big Action: ‘उत्तम उपहारगृहा’वर एफडीएचा मोठा हातोडा! अस्वच्छता अन्…; परवाना निलंबित करून हॉटेल केले सील

अन्न प्रशासनाकडून ४९ नमुने तपासणी

जिल्ह्यात दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ झाल्याची कोणतीही नोंद नाही. अन्न व औषधी प्रशासनाचे सुरू असलेले धाडसत्र आणि मे ते जून या काळातील उन्हाळा यामुळे दुधाची आवक घटली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत विविध डेअऱ्यांतून एकूण ४९ नमुने गोळा करण्यात आले असून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. हे सर्व नमुने स्टैंडर्ड असल्याचे निष्पन्न झाले आहे.

प्रशासनाकडून नियमिततपासणी मोहीम राबवली जात असून अन्न व औषधी सुरक्षेच्या दृष्टीने निकषांची कठोर अंमलबजावणी सुरू आहे. असे पूनम तुरकर, अन्न सुरक्षा अधिकारी यांनी स्पष्ट केले.

दूध संकलनात घटझाली असली तरी जिल्ह्यात दुधाची गुणवत्ता उत्तम राखली जात आहे. -प्रदीप पात्रे, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी असे स्पष्टीकरण प्रदीप पात्रे, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांनी दिले.

Web Title: Bhandara milk collection drops fda crackdown summer heat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 03:48 PM

Topics:  

  • Adulterating Milk
  • Bhandara
  • maharashtra

संबंधित बातम्या

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर
1

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
2

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज
3

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले
4

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.