
श्रावण महिन्याच्या धार्मिक पर्वानिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने भाविकांसाठी विशेष तीर्थयात्रांचे आयोजन केले आहे. भंडारा विभागातील ६ आगारांमधून एकदिवसीय तसेच मुक्कामी धार्मिक सहलींचे नियोजन करण्यात येत असून, शेगाव, शिर्डी, पंढरपूर, आळंदी, जेजुरी, अक्कलकोट, तुळजापूर, नांदेड आणि माहूर या प्रमुख तीर्थक्षेत्रांना ‘लालपरी’ने जाण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
सहा आगारातून बससेवेचे नियोजन : शेगाव, शिडर्डी, पंढरपूर, आळंदी, जेजुरी , अक्कलकोट, तुळजापूर, नांदेड, माहूर भंडारा एसटी विभागांतर्गत भंडारा, तुमसर, साकोली, पवनी, गोंदिया आणि तिरोडा हे सहा आगार असून, श्रावण महिन्यात या आगारांमधून धार्मिक सहली आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गावातील महिला बचत गट, ज्येष्ठ नागरिक संघ, विविध सेवाभावी संस्था तसेच भाविकांच्या समूहांनी पुढाकार घेतल्यास विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे.
उपक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे विविध प्रवासी सवलतींचा लाभ धार्मिक सहलींनाही मिळणार आहे. ७५ वर्षे पूर्ण झालेल्या अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, तर महिला, १२ वर्षांखालील मुलांनाही सवलतीचा लाभ आणि ज्येष्ठ नागरिकांना अर्ध्या तिकिटात प्रवासाची सुविधा मिळणार आहे. अपंग प्रवाशांसाठी नियमानुसार एक चतुर्थांश तिकीट दर आकारण्यात येणार असून, १२ वर्षांखालील मुलांनाही लागू सवलतीचा लाभ मिळणार आहे. पुरुष प्रवाशांसाठी नियमित पूर्ण तिकीट आकारण्यात येईल.
Mangalagaur 2026: पूजेच्या वेळी गप्प राहण्याचा नियम का? मंगळागौरीच्या व्रतातील ‘हा’ नियम जाणून घ्या!
श्रावण मासातील तीर्थाटनाला आले विशेष महत्त्व
हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या काळात शिवमंदिरांसह विविध देवस्थाने आणि तीर्थक्षेत्रांवर भाविकांची मोठी गर्दी असते. देवदर्शन, उपासना आणि तीर्थाटनामुळे आध्यात्मिक समाधान व मनःशांती मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. याच पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी ही विशेष बस सेवा उपलब्ध केली आहे. महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या प्रवास सवलतीमुळे सर्वसामान्य भाविकांसाठी तीर्थयात्रा अधिक परवडणारी ठरणार आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक संघ, महिला बचत गट आणि सामाजिक संस्थांना एकत्रितपणे धार्मिक सहलीचे आयोजन करणे सुलभ होणार आहे. या उपक्रमामुळे एसटीच्या प्रवासी संख्येतही वाढ होण्याची अपेक्षा आहे.
थेट गावातून बसची सुविधा
धार्मिक सहलीसाठी एखाद्या गावातून किंवा परिसरातून किमान ४० प्रवासी एकत्र आल्यास त्या ठिकाणाहून विशेष बस उपलब्ध करून देण्याची सुविधा एसटी महामंडळाने जाहीर केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील भाविकांनाही बसस्थानकापर्यंत स्वतंत्र प्रवास न करता थेट आपल्या गावातून तीर्थयात्रेला जाणे
अशा मिळतील सवलती
पुरुष : पूर्ण तिकीट
महिला : अर्धे तिकीट
ज्येष्ठ नागरिक : अर्धे तिकीट
७५ वर्षांवरील अमृत ज्येष्ठ: मोफत प्रवास
अपंग व्यक्ती : एक चतुर्थांश तिकीट
Kuldevta: कुलदैवताला चांदीचा टाक जेजुरीवरूनच का आणतात? जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि परंपरा
किमान ४० प्रवासी असल्यास थेट गावातून विशेष बस शक्य होणार आहे. तीर्थक्षेत्रांवर पोहोचल्यानंतर प्रवाशांच्या सुविधेसाठी अनुभवी चालक व वाहकांकडून आवश्यक मार्गदर्शन आणि सहकार्य करण्यात येणार आहे. सुरक्षित आणि आनंददायी प्रवासाची जबाबदारी एसटी प्रशासनाने स्वीकारली असून, भाविकांनी समूहाने प्रवासाचे नियोजन करून आगाऊ बुकिंग करावे, असे आवाहन केले आहे.
श्रावण महिन्यातील धार्मिक सहलीसाठी परिवहन विभागातर्फे विशेष योजना राबविली जात असून जास्तीत जास्त इच्छुक प्रवाशांनी श्रावणातील तीर्थाटनाचा लाभघ्यावा. प्रवासस्थळे, सवलती आणि इतर माहितीसाठी आगाराशी संपर्क करावा. नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, भंडारा.