Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhandara News: ४१५ वर्गखोल्या धोकादायक! दुरुस्तीची कासवगती; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात, पालकवर्गातून संताप

भंडारा जिल्ह्यातील ७९४ जिल्हा परिषद शाळांपैकी शेकडो इमारती जीर्ण आणि धोकादायक झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. निधी मंजूर असूनही दुरुस्ती आणि नवीन वर्गखोल्यांचे काम संथ गतीने सुरू असल्याने पालकांमधून तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 02, 2026 | 05:07 PM
Bhandara News: ४१५ वर्गखोल्या धोकादायक! दुरुस्तीची कासवगती; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात, पालकवर्गातून संताप
Follow Us
Follow Us:
  • जिल्ह्यातील ४१५ शाळांच्या वर्गखोल्या जीर्ण असून ४६ शाळांना साधी संरक्षण भिंतसुद्धा नसल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे.
  • निधी मंजूर असूनही दुरुस्तीची कामे ३० ते ४० टक्क्यांवर रेंगाळल्याने पावसाळ्यात छतातून पाणी गळण्याची भीती वाढली आहे.
  • प्रशासकीय स्तरावर विशेष दुरुस्ती आणि नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामाला गती देऊन विद्यार्थ्यांना सुरक्षित इमारत देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

शिक्षणहक्क कायद्यांतर्गत प्रत्येक बालकाला सुरक्षित वातावरणात शिक्षण मिळणे हा मुलभूत अधिकार मानला जातो. मात्र, जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींची वस्तुस्थिती पाहता विद्यार्थी खऱ्या अर्थाने जीव मुठीत धरून ज्ञानार्जन करत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात जि. प.च्या एकूण ७९४ शाळा असून, त्यापैकी शेकडो शाळांच्या इमारती जीर्ण, पडक्या आणि धोकादायक बनल्या आहेत. प्रशासनाने कागदोपत्री विशेष दुरुस्ती व नवीन बांधकामांचे प्रस्ताव मांडले असले; तरी प्रत्यक्षात कामांची अत्यंत धिमी गती आहे.

४६ शाळांना संरक्षण भिंतच नाही: पायाभूत सुविधांचा अभाव

परिषदेंतर्गत येणाऱ्या ७९४ शाळांच्या पायाभूत सुविधांचे विश्लेषण केल्यास अनेक मुलभूत गरजांचा अभाव दिसून येतो. जिल्ह्यातील तब्बल ४१५ शाळांमध्ये वर्गखोल्या अतिशय जीर्ण व पडक्या स्थितीत आहेत, तर ४७४ शाळांना मोठ्या दुरुस्तीची तातडीने गरज आहे. याशिवाय ४६ शाळांना संरक्षण भिंत नाही.

खेळ, संवाद आणि कृतीतून गणिताची गोडी; बालभारतीचे चौथीचे नवे पुस्तक विद्यार्थ्यांच्या भेटीला

दुरुस्तीच्या कामांची गती संथ

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सन २०२४-२५ आणि २०२५-२६ या आर्थिक वर्षांत दुरुस्ती व नवीन नवीन बांधकामांसाठी भरीव तरतूद केली आहे. सन २०२५-२६ मध्ये विशेष शाळा दुरुस्तीसाठी १०६ कामे प्रस्तावित असून त्यासाठी ७.०० कोटी रुपये मंजूर आहेत, तसेच ७३ नवीन

पावसाळ्यात धोका अधिक

कामांना होणारा हा विलंब थेट विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी खेळ ठरत आहे. पावसाळ्यात जीर्ण शाळांच्या छतांतून पाणी गळत असते, अशा बिकट परिस्थितीत चिमुकल्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल पालकवर्गातून विचारला जात आहे. भिंतींना तडे गेलेले व स्लॅबचे प्लास्टर निखळलेल्या अशा धोकादायक वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना बसवणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देण्यासारखे आहे. केवळ कागदोपत्री आकड्यांचा खेळ न दाखवता प्रशासनाने तातडीने प्रत्यक्षात उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.

सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा कल वाढतोय की कमी होतोय? छत्रपती संभाजीनगरातली प्रवेशसंख्या आश्चर्यकारक

२०२४-२५ मध्ये १५२ दुरुस्ती कामांसाठी ७.६३ कोटी आणि ७० नवीन वर्गखोल्यांसाठी ६९६.०० लाखांच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. प्रशासाच्या दाव्यानुसार ही सर्व कामे सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी वस्तुस्थिती निराशाजनक आहे. काही कामे केवळ ३० ते ४० टक्क्यांवर रेंगाळली आहेत, तर काही ठिकाणी कामे अपूर्ण आहेत.

जिल्ह्यातील शाळांमधील वर्गखोल्यांच्या ८८ दुरुस्तीसाठी आणि नव्या बांधकामांसाठी चालू य मागील वर्षांत शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, प्रशासकीय स्तरावर विशेष शाळा दुरुस्ती व नवीन वर्गखोल्यांच्या नियोजनाला गती देण्यात आली आहे. या सकारात्मक प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील शेकडो जीर्ण शाळांचे रूप पालटण्यास आणि हजारो विद्यार्थ्यांना हक्काची व सुरक्षित शैक्षणिक इमारत मिळण्यास नक्कीच मोठी मदत होईल. असे मत सुशील कान्हेकर, अभियंता, समग्र शिक्षा, अभियान, जिल्हा परिषद भंडारा यांनी मांडले आहे.

Web Title: Bhandara zilla parishad school buildings dilapidated condition student safety issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 05:07 PM

Topics:  

  • Bhandara
  • maharashtra

संबंधित बातम्या

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर
1

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
2

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज
3

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले
4

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.