Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gondiya News: पुरामुळे तुटतोय ९६ गावांचा संपर्क! पावसाळ्यामध्ये वैनगंगा आणि बाग नदीला येतोय पूर

गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे वैनगंगा आणि बाग नद्यांना पूर येऊन २०० पेक्षा जास्त कमी उंचीच्या पुलांवर पाणी साचते. यामुळे आठ तालुक्यांतील ९६ गावांचा संपर्क तुटून दरवर्षी गावकऱ्यांसह शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 07, 2026 | 06:35 PM
Gondiya News: पुरामुळे तुटतोय ९६ गावांचा संपर्क! पावसाळ्यामध्ये वैनगंगा आणि बाग नदीला येतोय पूर
Follow Us
Follow Us:
  • गोंदिया जिल्ह्यातील वैनगंगा व बाग नद्यांना आलेल्या पुरामुळे दरवर्षी आठ तालुक्यांतील तब्बल ९६ गावांचा संपर्क पूर्णपणे तुटतो.
  • जिल्हा परिषदेच्या २०० हून अधिक पुलांची उंची कमी असल्याने थोड्या पावसातही पाणी पुलांवरून वाहून वाहतूक पूर्ण ठप्प होते.
  • जिल्हा प्रशासनाकडून शोध व बचाव पथकासह आपत्ती व्यवस्थापन सज्ज ठेवले असून नवीन पुलांचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आले आहेत.

मुसळधार व संततधार पावसामुळे जिल्ह्यातील ९६ गावांना दरवषी पुराचा धोका निर्माण होतो. नद्या आणि नाल्यांना आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधील ९६ गावांमध्ये पुराचा धोका वाढतो. पावसाळ्यात वैनगंगा, बाग आणि गढवी नद्यांना सतत पूर येतो, त्यामुळे अनेक गावांवर परिणाम होतो. जिल्ह्यात जिल्हा परिषद अंतर्गत जवळपास २०० हून अधिक पूल आहे.

या सर्व पुलांची उंची गेल्या क्रित्येक वर्षापासून खूप कमी आहे. त्यामुळे दर पावसाळ्यात या पुलावरून पाणी वाहत असते. वैनगंगा नदीला येणाऱ्या पुरामुळे सर्वात मोठा धोका निर्माण होतो. तिच्या काठावरील अनेक गावांना पुराचा – फटका बसतो. पुराचे पाणी रहिवाशांच्या घरांभोवती पसरते. गोंदिया तालुक्यात २४ गावे, गोरेगावमध्ये १, तिरोडामध्ये ८, अर्जुनी मोरगावमध्ये १४, आमगावमध्ये ११, सालेकसामध्ये १४, सडक अर्जुनीमध्ये १५ आणि देवरी तालुक्यात ९ गावांना पुराचा उच्च धोका असतो.

Gondiya News: संतप्त विद्यार्थ्यांनी रोखली लालपरी! धापेवाडा येथे आंदोलन; वाहतूक विस्कळीत, अतिरिक्त बससेवेची मागणी

सर्वाधिक पुराचा धोका गोंदिया तालुक्यात कासा, बिरसोला, मु मुरडोरा आणि तिरोडा तालुक्यात घाटकुरोडा, चांदोरी, बिरोली आणि किडंगीपार येथे आहे. वर्षाला पावसाळयाच्या दिवसात शालेय मुले व गावकऱ्यांनाही त्रस सहन करावा लागतो. त्यामुळे या पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशी अपेक्षा आहे. असे संतोष शहारे, प्रशासक, ग्राम पंचायत शिवणी यांनी आपले मत मांडले आहे..

जि.प.च्या बांधकाम विभाग अंतर्गत २०० हून अधिक पूल असून, सर्वच पुलांची उंची कमी आहे. पूरस्थिती निर्माण झाल्यास सर्वच पुले पाण्याखाली येतात. त्यामुळे गावांचा संपर्क तुटतो. पावसाने विश्रांती घेतल्यास पाच तासात पुलावरून पाणी ओसरते. निधी प्राप्त होताच नवे पूल बांधकाम केले जातील, तसा प्रस्ताव शासनदरबारी पाठविण्यात आला. असे प्रकाश ताकसांडे, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, जिप. यांनी सांगितले आहे.

Gondiya News: बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी! बिबिटोलातील घटना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, वनविभागाने लावला पिंजरा

पुराच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागही सज्ज असतो. अर्जुनी मोरगाव येथील पोलीस मुख्यालय आणि इतर ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात येते. पूरग्रस्त गावांतील रहिवाशांना आपत्ती कशी टाळावी याबद्दल माहितीही देण्यात येते. आपत्तीला प्रतिसाद देण्यासाठी स्थानिक पातळीवर एक शोध आणि बचाव पथक तयार करण्यात येते. असे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी सांगितले.

Web Title: Gondia news flood threat to 96 villages due to low bridges

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 06:35 PM

Topics:  

  • gondiya
  • heavy rains
  • maharashtra

संबंधित बातम्या

Maharashtra Sarkar : महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी कार्यालयां’ ची केंद्र सरकारकडून दखल, इतक्या लाखांचे मिळणार अनुदान …
1

Maharashtra Sarkar : महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी कार्यालयां’ ची केंद्र सरकारकडून दखल, इतक्या लाखांचे मिळणार अनुदान …

Farmers Protest Maharashtra: कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको
2

Farmers Protest Maharashtra: कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता
3

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…
4

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.