Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhiwandi News : कामगाराच्या मृत्यूनंतर श्रमजीवी संघटनेचे तीव्र आंदोलन; पालिका अधिकारी आणि दोषी कंत्राटदारावर गुन्हा दाखल

भिवंडी महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीने नालेसफाई करणारे कामगार सुभाष नवशा दिघे (वय 44, रा. मिठपाडा, शेलार) यांचा नाल्यात पडून मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे शहरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 22, 2026 | 06:11 PM
Bhiwandi News : कामगाराच्या मृत्यूनंतर श्रमजीवी संघटनेचे तीव्र आंदोलन; पालिका अधिकारी आणि दोषी कंत्राटदारावर गुन्हा दाखल
Follow Us
Follow Us:

Bhiwandi News : भिवंडी महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीने नालेसफाई करणारे कामगार सुभाष नवशा दिघे (वय 44, रा. मिठपाडा, शेलार) यांचा नाल्यात पडून मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे शहरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. मृत कामगाराला न्याय मिळवून देण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने आज भिवंडी महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जोरदार घोषणाबाजी आणि लढाऊ गाणी म्हणत ठिय्या आंदोलन करण्यात आले.श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्षा सीता घाटाळ आणि श्रमजीवी रयत कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष सुलतान पटेल यांच्या नेतृत्वाखाली हे आक्रमक आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या या आक्रमक पवित्र्यामुळे अखेर प्रशासनाला नमते घ्यावे लागले असून, शांतीनगर पोलिसांनी संबंधित महापालिका अधिकारी आणि दोषी कंत्राटदारावर गुन्हा दाखल केला आहे.

​नेमकी घटना काय?
​शांतीनगर पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मयत कामगार सुभाष दिघे हे केजीएन हॉस्पिटलच्या मागे नालेसफाईचे काम करत असताना नाल्यात पडले आणि गुदमरून त्यांचा मृत्यू झाला.सुरक्षा साधनांचा अभाव: कंत्राटदार बाळू खरात यांनी कामगारांना लाईफ जॅकेट, हेल्मेट, बूट यांसारखी कोणतीही सुरक्षा साधने पुरवली नव्हती, असा गंभीर आरोप मृत कामगाराच्या मुलीने केला आहे.

​संघटनेचा सवाल: प्राथमिक माहितीनुसार कामगार नशेत असल्याचे सांगितले जात असले, तरी कंत्राटदाराने त्याच्या सुरक्षेची पुरेशी काळजी का घेतली नाही? असा रोखठोक सवाल संघटनेने उपस्थित केला.​”ही घटना केवळ अपघात नसून, कायद्याने प्रतिबंधित असलेल्या ‘मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग’ (हाताने नालेसफाई) प्रथेमुळे व्यवस्थेने घेतलेला बळी आहे. आदिवासी समाज ढोर नाही, माणूस आहे. माणसाला माणसासारखे जगण्याचा आणि सुरक्षिततेचा अधिकार आहे. जनावरासारखे जिणे आम्ही सहन करणार नाही.”

Thane Station News: ठाणे रेल्वे स्थानक होणार ‘हायटेक’; प्रवाशांसाठी वाढणार अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाच्या सुविधा!

सीता घाटाळ (अध्यक्षा, श्रमजीवी संघटना)
​दिघे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून  सुभाष यांच्या  पश्चात आता 24 वर्षांची मुलगी शुभांगी आणि 15 वर्षांचा मुलगा रितेश असा परिवार आहे. कुटुंबातील एकमेव कर्ता पुरुष गेल्यामुळे ही दोन्ही मुले आता पूर्णपणे अनाथ झाली आहेत.

​आंदोलनाची दखल: 10लाखांची तात्काळ मदत जाहीर
​आंदोलनाची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्तांच्या वतीने अतिरिक्त आयुक्त नयना ससाणे यांनी आंदोलनस्थळी येऊन संघटनेच्या शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा केली आणि ​तात्काळ आर्थिक मदत: संघटनेच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनाने मृत सुभाष दिघे यांच्या अनाथ मुलांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत तात्काळ सुपूर्द केली.​

कारवाईचे आश्वासन: दोषी कंत्राटदारावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासनही प्रशासनाने दिले आहे.

​आंदोलनातील प्रमुख उपस्थिती: ​या आंदोलनात संघटनेचे उपाध्यक्ष दत्तात्रेय कोळेकर, कार्याध्यक्ष बाळाराम भोईर,जिल्हाध्यक्ष अशोक सापटे,जिल्हा सचिव दशरथ भालके, ठाणे जिल्हा महिला प्रमुख जया पारधी, भिवंडी तालुका उपाध्यक्ष सागर देसक, श्रमजीवी कामगार संघटना चिटणीस महेंद्र निरगुडा, तालुका अध्यक्ष प्रदीप चौधरी, सचिव तानाजी लहांगे, जिल्हा उपाध्यक्ष मुकेश भांगरे (अंबरनाथ), भिवंडी शहर तालुका उपाध्यक्ष गुरुनाथ जाधव, गुलाब म्हसकर, कविता कदम, ठाणे तालुका सचिव नंदा वाघे, वाडा तालुका सचिव सूरज दळवी यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ​श्रमजीवी संघटनेने पीडित कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहून प्रशासनाला तात्काळ निर्णय घेण्यास भाग पाडल्यामुळे, परिसरात संघटनेचे कौतुक होत आहे.

Web Title: Bhiwandi news intense agitation by shramjeevi organization after death of worker case registered against municipal officer and guilty contractor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 06:11 PM

Topics:  

  • Bhiwandi News
  • kalyan news
  • Marathi News

संबंधित बातम्या

ITR Portal Down: Income Tax e-Filing साईट ठप्प! रिटर्न भरताना एरर येत असल्याने करदात्यांच्या अडचणीत वाढ
1

ITR Portal Down: Income Tax e-Filing साईट ठप्प! रिटर्न भरताना एरर येत असल्याने करदात्यांच्या अडचणीत वाढ

आता कागदपत्रांशिवाय उघडणार खातं? 1 ऑगस्टपासून बदलणार KYC चा नियम! येतोय CKYC 2.0, काय आहे प्रकार?
2

आता कागदपत्रांशिवाय उघडणार खातं? 1 ऑगस्टपासून बदलणार KYC चा नियम! येतोय CKYC 2.0, काय आहे प्रकार?

Dharmendra Pradhan तब्बल किती कोटींचे मालक? राजीनाम्यानंतर आता Networth चर्चेत, जाणून घ्या बँकांमध्ये किती शिल्लक?
3

Dharmendra Pradhan तब्बल किती कोटींचे मालक? राजीनाम्यानंतर आता Networth चर्चेत, जाणून घ्या बँकांमध्ये किती शिल्लक?

EPF Interest Rate: अजूनपर्यंत तुमच्या खात्यात PF व्याजाचे पैसे नाही आलेत? लगेच करा तक्रार; जाणून घ्या प्रोसेस
4

EPF Interest Rate: अजूनपर्यंत तुमच्या खात्यात PF व्याजाचे पैसे नाही आलेत? लगेच करा तक्रार; जाणून घ्या प्रोसेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.