Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur MLC Election: सोलापूर विधान परिषदेसाठी भाजपकडून राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर; परिचारकांचा पत्ता कट!

सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. १८ जून रोजी होणाऱ्या या निवडणुकीचे सविस्तर विश्लेषण वाचा.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 31, 2026 | 11:45 PM
सोलापूर विधान परिषदेसाठी भाजपकडून राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर

सोलापूर विधान परिषदेसाठी भाजपकडून राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर

Follow Us
Follow Us:
  • राजकीय चर्चांना पूर्णविराम; भाजपने राऊत यांच्या नावावर मारली मोहोर
  • बार्शीच्या नेतृत्वाला विधान परिषदेची संधी
  • स्थानिक स्वराज्य मतदारसंघात भाजपचा विजयाचा आत्मविश्वास अधिक दृढ
सोलापूर, प्रतिनिधी : सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. रविवारी रात्री उशिरा भाजपच्या केंद्रीय निवड समितीने विधान परिषदेच्या विविध जागांसाठी उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली असून त्यामध्ये सोलापूर मतदारसंघासाठी राजेंद्र राऊत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

सोलापूर विधान परिषद निवडणुकीसाठी येत्या १८ जून रोजी मतदान होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील संख्याबळ लक्षात घेता भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने पक्षाचा उमेदवार कोण असणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता होती. या उमेदवारीसाठी माजी आमदार राजेंद्र राऊत आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांची नावे चर्चेत होती. दोन्ही नेत्यांमध्ये चुरशीची स्पर्धा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र अखेर पक्षश्रेष्ठींनी राजेंद्र राऊत यांच्यावर विश्वास व्यक्त करत त्यांना उमेदवारी बहाल केली.

कोकणच्या जागेवरून नवा ट्विस्ट ! एकनाथ शिंदे आधी म्हणाले ‘युतीधर्म पाळा’, आता दिल्या अर्ज मागे न घेण्याच्या सूचना

राजेंद्र राऊत यांनी बार्शी नगरपालिका, कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांमध्ये केलेल्या कामामुळे जिल्ह्यात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांशी सातत्यपूर्ण संपर्क, स्थानिक प्रश्नांवरील अभ्यासू भूमिका आणि नेतृत्व क्षमता यामुळे त्यांची पक्षातील पकड अधिक मजबूत झाल्याचे मानले जाते.

भाजपच्या या निर्णयानंतर सोलापूर जिल्ह्यातील पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध भागांत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करत पक्ष नेतृत्वाच्या निर्णयाचे स्वागत केले. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विद्यमान संख्याबळ पाहता राजेंद्र राऊत यांच्या विजयाची शक्यता अधिक बळकट मानली जात असून, आगामी निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित करण्यासाठी पक्ष यंत्रणा कामाला लागली आहे. दरम्यान, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, विविध पक्षांच्या रणनीतींकडेही राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

अनिकेत तटकरेंना विधान परिषदेची लॉटरी, अदिती तटकरेंसह उमेदवारी अर्ज भरण्यास रवाना

Web Title: Bjp announces rajendra raut as candidate for solapur legislative council seat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 11:45 PM

Topics:  

  • MLC Election
  • Solapur
  • Solapur News
  • Solapur Politics

संबंधित बातम्या

प्रभारी शिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे अडचणीत? मुख्याध्यापक महांतेश्वर कट्टीमनी यांच्या तक्रारीची शिक्षणाधिकाऱ्यांकडून दखल
1

प्रभारी शिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे अडचणीत? मुख्याध्यापक महांतेश्वर कट्टीमनी यांच्या तक्रारीची शिक्षणाधिकाऱ्यांकडून दखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.