File Photo : Chandrakant-Patil
मुंबई – ”निधींसाठी सरकारवर अवलंबुन का राहता? या देशात शाळा कुणी सुरू केल्या. महात्मा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू केल्या. या सर्व शाळा सुरू करताना शासनाने त्यांना अनुदान दिले नाही. त्यांनी लोकांकडे भीक मागितली शाळा चालवतोय मला मला पैसे द्या असे वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पैठण येथे एका कार्यक्रमात केले.
चंद्रकांत पाटील यांनी विधान केले की, ”इमारतींना निधी कसा द्यायचा हे रस्तोगी आम्हाला शिकवतील. परंतु चांगल्या कामासाठी मी आणि संदीपान भुमरे चांगल्या कामांसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मिळून गेलो तर पैशांना अडचण येणार नाही. सरकारवर अवलंबुन का राहता? या देशात शाळा कुणी सुरू केल्या. महात्मा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू केल्या. या सर्व शाळा सुरू करताना शासनाने त्यांना अनुदान दिले नाही. त्यांनी लोकांकडे भीक मागितली शाळा चालवतोय मला मला पैसे द्या. त्या काळात दहा रुपये देणारे होते, दहा – दहा कोटी रुपये देणारेही आहेत.”
काँग्रेसच्या संगिता तिवारी यांनी टीका केली की, गेले कित्येक दिवस आपल्या महाराष्ट्रात भाज्यपाल कोश्यारी, सुधांशू त्रिवेदी, पडलकर, लाड , दानवे सगळे भाजपा चे नेते हे आपल्या देशाच्या महापुरुषां न च्या बाबत वादग्रस्त आणि अपमान कारक वक्तव्य करीत आहेत, हा छत्रपती शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांचा देश आहे आणि तिथेच हे भाजपाई जाणून बुजून त्यांचा अपमान करीत आहेत. परंतु आम्ही आता हे सहन करणार नाही. आज भाजप नेते चंद्रकांत पाटील ह्यांनी पण महात्मा फुले, डाॅ. आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले.