बीड भाजपमध्ये सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंनी पक्षाचे काम केले नसल्याचा आरोप केला (फोटो - सोशल मीडिया)
बीड : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. आता हिवाळी अधिवेशन सुरु झाले असून निवडणुकीनंतर हे पहिलेच अधिवेशन आहे. यामुळे विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांविरोधात जोरदार टीका करत आहेत. यामध्ये मंत्रिमंडळ विस्तारामुळे महायुतीमध्ये नाराजीचा महापूर आला आहे. अनेक जेष्ठ नेते नाराज आहेत. आता भाजप पक्षातील आणखी एक नाराजी उघड झाली आहे. पंकजा मुंडे यांच्याविरोधात भाजप पक्षामध्येच नाराजी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महायुतीमधून भाजप व अजित पवार गट हे एकत्र आले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणूक व विधानसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांनी एकत्रितपणे काम केले आहे. बीडमध्ये मुंडे भावंडे एकत्रितपणे लढताना दिसली. यामुळे अनेक मुंडे समर्थकांनी समाधान व्यक्त केले होते. मात्र आता पंकजा मुंडे यांच्या विरोधात भाजपमधील विद्यमान आमदाराची नाराजी असल्याचे दिसले आहे. बीडमधील आष्टी मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांनी भाजपचे काम केले नसल्याचा गंभीर आरोप केला आहे.
नागपूर हिवाळी अधिवेशनासंबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मंत्रिमंडळ विस्तारामध्ये विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांचा समावेश आहे. भाजप पक्षश्रेष्ठींनी त्यांची निवड देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये केली असली तरी पक्षामध्ये त्यांच्याबाबत नाराजी आहे. बीडमधील भाजपमध्ये अंतर्गत कलह असून विधानसभा निवडणुकीनंतर नवा वाद उफाळून आला आहे. बीडमध्ये पंकजा मुंडे यांनी काम केले नसल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला आहे.
आमदार सुरेश धस यांनी विधीमंडळामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे यांच्याबाबत विधान केले. यामुळे सर्वांनी आश्चर्य वक्तव्य केले आहे. सुरेश धस यांनी मंत्री पंकजा मुंडे यांनी निवडणुकीत माझ्या मतदारसंघात भाजपचे काम केले नसल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे थेट तक्रार केली आहे. विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना सांगितले. कर नाहीतर डर कशाला असा थेट पवित्रा घेतला आहे. मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरच आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाला आहे.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
राजकीय वर्तुळामध्ये सध्या आहे. बीडमधील आष्टी मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुरेश धस हे चर्चेमध्ये आले आङे. बीडमध्ये सध्या सरपंच संजय देशमुख यांच्या खून प्रकरणामध्ये त्यांनी आवाज उठवला आहे. बीडमध्ये या प्रकरणामुळे आधीच वातावरण तापलेले आहे. विरोधक या प्रकरणात धनंजय मुंडेवर आरोप करीत आहे. या प्रकरणात सुरेश धस यांनीही कणखर भूमिका घेतली असून, या हत्ये प्रकरणात विष्णू चाटे व त्याच्या टोळीचा मोरक्या कोण आहे याचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाईची मागणी धस यांनी केली आहे. तसेच धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट देखील घेतली आहे. सुरेश धस यांनी आता पंकजा मुंडे यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे.