मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीत (Andheri East bypoll) भाजपाने अर्ज मागे घ्यावा, असं शरद पवार (Sharad Pawar) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात नागपूरमध्ये घोषणा केली. भाजपचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात ‘वर्षा’ बंगल्यावर बैठकही झाली होती. भाजपच्या नेत्यांच्या बैठकीनंतर मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, आता उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरुन राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असताना, भाजपाचा पराभव होणार हे कळल्यावर त्यांनी अर्ज मागे घेतला अशी टिका होत आहे. यावर शरद पवारांनी भाष्य केलं आहे.
[read_also content=”महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत, प्रोत्साहनपर लाभ योजनेचा 20 ऑक्टोबरपासून शुभारंभ https://www.navarashtra.com/maharashtra/mahatma-jyotirao-phule-farmers-debt-relief-scheme-incentive-benefit-scheme-launched-from-337184.html”]
दरम्यान, भाजपाला समोर पराभव दिसत असल्यामुळं, भाजपाने अर्ज मागे घेतला. अशी टिका महाविकास आघाडीतील नेत्यांकडून भाजपावर होत आहे. यावर शरद पवारांनी (Sharad Pawar) एक मोठं वक्तव्य केलं आहे. भाजपाने अर्ज मागे घेतला. यातून वेगळा अर्थ काढण्याची गरज नाहीय, त्यांच्या पक्षाने चांगली भूमिका घेतली. मी माझे काल मत मांडले. पण यातून कोणीही वेगळा अर्थ काढण्याची गरज नाहीय, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.