Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘वरोशी ठरावावरून बोंब मारणाऱ्यांची लायकी काय?’; आंबेघर गणातील भाजप कार्यकर्ते आक्रमक

मागील आठवड्यात आतिश कदम यांनी जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्यावर एकतर्फी टीका केली होती. त्यामुळे आंबेघर गणातील भाजप कार्यकर्ते चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 20, 2026 | 12:08 PM
'वरोशी ठरावावरून बोंब मारणाऱ्यांची लायकी काय?'; आंबेघर गणातील भाजप कार्यकर्ते आक्रमक

'वरोशी ठरावावरून बोंब मारणाऱ्यांची लायकी काय?'; आंबेघर गणातील भाजप कार्यकर्ते आक्रमक

Follow Us
Follow Us:

मेढा : जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी कुसुंबी गटाच्या विकासावर भर दिला आहे. त्यामुळे वरोशी गावच्या सोसायटीवरून बोंब मारणाऱ्या पंचायत समिती सदस्य आतिश कदम यांनी प्रथम या सोसायटीचे सभासद होऊन दाखवावे. त्यांची लायकी काय? यापुढे जर रांजणेंवर बोलाल तर तुमचीही अंडीपिल्ली आमच्याकडे आहेत, असा सज्जड इशारा आंबेघर गणातील भाजप कार्यकर्त्यांनी अतिश कदमांना दिला.

मागील आठवड्यात आतिश कदम यांनी जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्यावर एकतर्फी टीका केली होती. त्यामुळे आंबेघर गणातील भाजप कार्यकर्ते चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले. पत्रकार परिषदेतून त्यांनी सदस्य कदमांवर चांगलेच तोंडसुख घेतले. यावेळी जेष्ठ नेते रामभाऊ शेलार, मोहन कासुर्डे, बबन बेलोशे, केळघर सोसायटी चेअरमन नाना जांभळे,विजय सपकाळ, हरिभाऊ बेलोशे, बळवंत पाडळे गुरुजी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

रामभाऊ शेलार म्हणाले, वरोशी सोसायटीत साधे सभासद नसलेल्या आतिश कदमांनी प्रथम या सोसायटीचे सभासद होऊन दाखवावे. मग ठरावाच्या गप्पा माराव्यात. तर मोहन कासुर्डे म्हणाले, काळेश्वरी सोसायटीची बदनामी थांबवा. ही सोसायटी आमच्या नेतृत्वाखाली काम करते. आमच्या गावच्या सोसायटीची बदनामी आम्ही सहन करणार नाही. तुमच्यात धमकच होती तर ठराव करून दाखवायला हवा होता. तर नाना जांभळे म्हणाले, अतिष कदम तू जर आमच्या नेत्यांवर खालच्या भाषेत बोलशील तर आम्हीही आमची पातळी सोडून वागू, बोलू आम्हाला हे करण्यास भाग पाडू नकोस.

सदस्यांविरोधात रिट पिटीशन दाखल

कुसूंबी गटातून जे काही सदस्य निवडून आलेले आहेत. त्यांच्या विरोधात आम्ही निकालानंतर रिटपिटीशन दाखल केलेले आहे. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व काही दिवसांचेच आहे. कदमांनी लय फडफड करू नये, असा दम बळवंत पाडळे यांनी भर पत्रकार परिषदेत भरला.

UPSC Notification : यूपीएससीची मोठी भरती! EPFO मध्ये ८० पदांसाठी भरती; ‘या’ तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

अंतिम मतदार यादीकडे लक्ष

जिल्ह्याच्या सहकाराची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदारयादी आज प्रसिद्ध झाल्याने सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना आता वेग येण्याची चिन्हे आहेत. विशेषतः ११ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीकडे संभाव्य उमेदवारांसह जिल्ह्यातील प्रमुख राजकीय गटांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Bjp workers from the ambeghar constituency take an aggressive stance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 12:08 PM

Topics:  

  • Medha News
  • Satara District Bank
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर
1

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर

Satara DCC Bank Election: रामराजे–शेखर गोरे भेटीने राजकीय समीकरणांना धक्का!; हॉटेलमध्ये ‘वन-टू-वन’ खलबते
2

Satara DCC Bank Election: रामराजे–शेखर गोरे भेटीने राजकीय समीकरणांना धक्का!; हॉटेलमध्ये ‘वन-टू-वन’ खलबते

भैरवनाथाच्या देवस्थानात ‘विकासा’च्या नावाखाली सिमेंटचा मारा? काँक्रीटीकरणावर ठाकरे गटाचा सवाल; ठेकेदारावर कारवाईची मागणी
3

भैरवनाथाच्या देवस्थानात ‘विकासा’च्या नावाखाली सिमेंटचा मारा? काँक्रीटीकरणावर ठाकरे गटाचा सवाल; ठेकेदारावर कारवाईची मागणी

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी
4

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.