Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wai Municipal Council: वाई नगरपालिकेला मोठा झटका!; ५ कोटींच्या बायोमायनिंग निविदेला जिल्हाधिकाऱ्यांची स्थगिती

Wai Municipal Council: माहिती अधिकारातून प्राप्त झालेल्या कागदपत्रांच्या आधारे, या निविदा प्रक्रियेत नियमानुसार केवळ दोन निविदा पात्र असताना तिसऱ्या निविदेलाही पात्र ठरवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामध्ये वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा सहभाग असल्याचा दावा तक्रारदार सुशांत मोरे यांनी केला.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 19, 2026 | 02:35 PM
Wai Municipal Council News

Wai Municipal Council News

Follow Us
Follow Us:
  • वाई नगरपालिकेच्या कचरा बायोमायनिंग निविदा प्रक्रियेला सातारा जिल्हाधिकाऱ्यांची स्थगिती.
  • मुख्याधिकाऱ्यांना सर्व नियम पाळून पुन्हा नवीन निविदा प्रक्रिया राबवण्याचे निर्देश.
  • RTI कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांची कडक कारवाई.
Wai Municipal Council: वाई नगरपालिकेच्या जुन्या साठलेल्या कचऱ्याची बायोमायनिंग पद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या कामाच्या निविदेवरून सुरू असलेला वादा आता नव्या वळणावर पोहचला आहे. निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याचे निर्देश वाई दिले आहेत.

सुशांत मोरेंनी दिलेल्या माहितीनुसार, वाई नगरपालिकेच्या साठलेल्या कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी अंदाज पत्रकात सुमारे पाच कोटी रुपयांची रक्कम निश्चित करण्यात आली होती. यासाठी विविध कंपन्यांकडून निविदा मागवण्यात आल्या होत्या.

Kupwad Double Murder Case: कुपवाड दुहेरी हत्याकांड प्रकरणी गोपीचंद पडळकर आक्रमक; सांगली-कुपवाडमध्ये बंदची हाक

तिसऱ्या निविदेला पात्र ठरवल्याचा आरोप

माहिती अधिकारातून प्राप्त झालेल्या कागदपत्रांच्या आधारे, या निविदा प्रक्रियेत नियमानुसार केवळ दोन निविदा पात्र असताना तिसऱ्या निविदेलाही पात्र ठरवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामध्ये वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा सहभाग असल्याचा दावा तक्रारदार सुशांत मोरे यांनी केला. या प्रक्रियेसाठी नेकॉफ, मुंबई, भाग्यदीप वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि सृष्टी कन्स्ट्रक्शन अँड एन्व्हायरमेंट फॅसिलिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या निविदा प्राप्त झाल्याचे कागदपत्रांमध्ये नमूद असल्याचे मोरे यांनी सांगितले.

तक्रारदारांच्या आरोपानुसार, तिसऱ्या कंपनीला पात्र ठरवण्यासाठी कागदपत्रांमध्ये फेरफार करून तिचा तुलनात्मक तक्त्यात समावेश करण्यात आला. संबंधित कंपनीशी नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा अप्रत्यक्ष संबंध असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करून निविदेला स्थगिती द्यावी, अशी मागणी मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.

जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीनंतर कारवाई

या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी वाई नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडून तक्रार आणि अहवाल मागवला. तसेच उपलब्ध कागदपत्रांची तपासणी करून संबंधित दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर निविदा प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच जुन्या साठलेल्या कचऱ्याच्या बायोमायनिंग विल्हेवाटीच्या कामासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्याचे आदेश वाई नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. ही कारवाई नगरपरिषद, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ३०८ अंतर्गत करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

Maharashtra Politics: मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा मुख्यमंत्र्यांना अधिकार! महायुती सरकारच्या नव्या नियमावलीने मंत्रिमंडळात खळबळ

अपात्रतेच्या सुनावणीकडेही लक्ष

दरम्यान, वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत तसेच नगरसेविका केतकी मोरे, नूतन मालुसरे आणि विजय ढेकाने यांच्या अपात्रतेसंदर्भातील प्रकरणाची सुनावणी जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयात सुरू आहे. त्यामुळे निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्याच्या आदेशानंतर या सुनावणीत दोन्ही बाजूंकडून कोणते दावे-प्रतिदावे केले जातात, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणातील आरोपांवर संबंधितांकडून अधिकृत भूमिका समोर आल्यानंतरच निविदा प्रक्रियेतील कथित अनियमिततेबाबतचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.

 

Web Title: Satara newswai municipal council biomining tender suspended by satara collector

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 02:34 PM

Topics:  

  • Satara News
  • Satara Politics
  • Wai News

संबंधित बातम्या

Wai News : दोन खोल्यांत आरोग्यसेवा; मालतपूरच्या सुसज्ज आरोग्य केंद्राचा प्रश्न रखडला, रोहित वाडकर यांचा आमरण उपोषणाचा इशारा
1

Wai News : दोन खोल्यांत आरोग्यसेवा; मालतपूरच्या सुसज्ज आरोग्य केंद्राचा प्रश्न रखडला, रोहित वाडकर यांचा आमरण उपोषणाचा इशारा

Satara News : साताऱ्याच्या ‘आझाद’ची राज्यात डरकाळी; तीन सुवर्णपदकांसह पटकावला ‘बेस्ट डॉग’चा किताब
2

Satara News : साताऱ्याच्या ‘आझाद’ची राज्यात डरकाळी; तीन सुवर्णपदकांसह पटकावला ‘बेस्ट डॉग’चा किताब

Wai News : मांढरगडावर आदिशक्तीचा जागर! काळूबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ
3

Wai News : मांढरगडावर आदिशक्तीचा जागर! काळूबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ

Satara News: शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाला गंडा; साताऱ्यात १ कोटी ७१ लाखांची फसवणूक
4

Satara News: शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाला गंडा; साताऱ्यात १ कोटी ७१ लाखांची फसवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.