Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : अंतिम मतदार यादीकडे लक्ष; सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे पडघम सुरू

जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीवर १८ ते २७ ऑगस्ट या कालावधीत कार्यालयीन वेळेत हरकती व आक्षेप दाखल करता येणार आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 18, 2026 | 02:54 PM
सातारा बँकेच्या राजकारणात ‘वरिष्ठां’च्या बैठकांनी वाढवली उत्सुकता; रामराजे, शिवेंद्रसिंहराजे, मकरंद पाटील यांची खलबतं

सातारा बँकेच्या राजकारणात ‘वरिष्ठां’च्या बैठकांनी वाढवली उत्सुकता; रामराजे, शिवेंद्रसिंहराजे, मकरंद पाटील यांची खलबतं

Follow Us
Follow Us:

सातारा : जिल्ह्याच्या सहकाराची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदारयादी आज प्रसिद्ध झाल्याने सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना आता वेग येण्याची चिन्हे आहेत. विशेषतः ११ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीकडे संभाव्य उमेदवारांसह जिल्ह्यातील प्रमुख राजकीय गटांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीवर १८ ते २७ ऑगस्ट या कालावधीत कार्यालयीन वेळेत हरकती व आक्षेप दाखल करता येणार आहेत. त्यामुळे पात्र मतदार संस्था, प्रतिनिधित्व आणि मतदारांच्या नावांवरून सहकार क्षेत्रातील पडद्यामागील राजकीय गणिते तपासली जाण्याची शक्यता आहे.

प्राप्त हरकती व आक्षेपांची छाननी करून त्यावर निर्णय घेण्यासाठी ७ सप्टेंबर ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करून ११ सप्टेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतरच निवडणुकीच्या प्रत्यक्ष राजकीय हालचालींना आणखी वेग येण्याची शक्यता आहे.

निवडणूक समीकरणांची दिशा स्पष्ट होणार

जिल्हा बँकेची निवडणूक ही केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित राहत नाही. जिल्ह्यातील विविध सहकारी संस्था, विकास सेवा सोसायट्या, साखर कारखाने, दूध संस्था आणि अन्य सहकारी संस्थांशी जोडलेले राजकीय हितसंबंध या निवडणुकीत प्रभावी ठरतात. त्यामुळे अंतिम मतदार यादीत कोणत्या संस्था आणि प्रतिनिधींना स्थान मिळते, यावर पुढील निवडणूक समीकरणांची दिशा काही प्रमाणात स्पष्ट होणार आहे.

प्रारूप मतदार यादी उपलब्ध

प्रारूप मतदार यादी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा यांच्या कार्यालयात तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयासह सर्व शाखांमध्ये पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

राजकीय डावपेचांची दिशा ठरविणारा महत्त्वाचा टप्पा ठरणार

जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर प्रभाव असलेल्या विविध राजकीय गटांकडून आतापासूनच संभाव्य उमेदवारांची चाचपणी, मतदारसंस्थांची जुळवाजुळव आणि निवडणूक समीकरणांचा अंदाज घेण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ११ सप्टेंबरची अंतिम मतदार यादी ही जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील पुढील राजकीय डावपेचांची दिशा ठरविणारा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. हा निवडणूक कार्यक्रम जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर डॉ. महेश कदम यांनी जाहीर केला आहे.

Satara : प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडवा; शिवेंद्रसिंहराजेंचे प्रशासनाला निर्देश, ठोसेघर-कुसूंबी पर्यटन विकासाचाही आढावा

Web Title: Preparation started of satara district bank election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 02:54 PM

Topics:  

  • Bank Election
  • Satara District Bank Election
  • Satara News

संबंधित बातम्या

Sangli Bank Election : सातारा बँकेच्या निकालाने सांगलीत खळबळ; चार संचालकांच्या उमेदवारीवर टांगती तलवार?
1

Sangli Bank Election : सातारा बँकेच्या निकालाने सांगलीत खळबळ; चार संचालकांच्या उमेदवारीवर टांगती तलवार?

Satara News : सातारा जिल्हा बँक निवडणुकीत न्यायालयीन ट्विस्ट! १० उमेदवारांच्या पात्रतेची चर्चा; २१ ऑक्टोबरकडे लक्ष
2

Satara News : सातारा जिल्हा बँक निवडणुकीत न्यायालयीन ट्विस्ट! १० उमेदवारांच्या पात्रतेची चर्चा; २१ ऑक्टोबरकडे लक्ष

Satara News : उसाला प्रतिटन ५ हजारांचा दर द्या; अन्यथा उपोषणाचा इशारा, प्रकाश साबळे आक्रमक
3

Satara News : उसाला प्रतिटन ५ हजारांचा दर द्या; अन्यथा उपोषणाचा इशारा, प्रकाश साबळे आक्रमक

Wai News : दोन खोल्यांत आरोग्यसेवा; मालतपूरच्या सुसज्ज आरोग्य केंद्राचा प्रश्न रखडला, रोहित वाडकर यांचा आमरण उपोषणाचा इशारा
4

Wai News : दोन खोल्यांत आरोग्यसेवा; मालतपूरच्या सुसज्ज आरोग्य केंद्राचा प्रश्न रखडला, रोहित वाडकर यांचा आमरण उपोषणाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.