Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayander : शिवसेनेला धक्का देण्यासाठी भाजपचा ‘जनता दरबार ; मेहता-सरनाईक संघर्ष शिगेला

मिरा-भाईंदरच्या राजकारणात सध्या भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष उघडपणे समोर आला असून, आमदार नरेंद्र मेहता आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यातील वाद दिवसेंदिवस तीव्र होत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 19, 2026 | 03:50 PM
Mira Bhayander : शिवसेनेला धक्का देण्यासाठी भाजपचा ‘जनता दरबार ; मेहता-सरनाईक संघर्ष शिगेला
Follow Us
Follow Us:
  • शिवसेनेला धक्का देण्यासाठी भाजपचा ‘जनता दरबार
  • मेहता-सरनाईक संघर्ष शिगेला
भाईंदर/ विजय काते : मिरा-भाईंदरच्या राजकारणात सध्या भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष उघडपणे समोर आला असून, आमदार नरेंद्र मेहता आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यातील वाद दिवसेंदिवस तीव्र होत आहे. काही दिवसांपूर्वी सरनाईक यांनी आयोजित केलेल्या लोकदरबारात मेहता यांच्याविरोधात नागरिकांकडून विविध तक्रारी मांडण्यात आल्याने या वादाला ठिणगी पडली. त्या तक्रारींमध्ये विशेषतः मेहता यांच्या खासगी व्यावसायिक व्यवहारांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने राजकीय वातावरण अधिकच तापले.

या लोकदरबारावर “पूर्वनियोजित राजकीय कट” असल्याचा आरोप करत आमदार नरेंद्र मेहता यांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याची भूमिका घेतली. त्याचाच भाग म्हणून भाजपकडून 22 एप्रिल रोजी भाईंदर पश्चिम येथील जिल्हा कार्यालयात ‘जनता दरबार’ आयोजित करण्यात आला आहे. सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणाऱ्या या दरबारात नागरिकांना थेट उपस्थित राहून त्यांच्या समस्या मांडता येणार आहेत.

प्रशासकीय यंत्रणा प्रथमच थेट सहभागी

या जनता दरबाराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यावेळी विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. महापालिका, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, वीज, महसूल आदी विभागांतील अधिकारी नागरिकांच्या तक्रारी थेट ऐकून त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यामुळे नागरिकांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी वेगवेगळ्या कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत, असा दावा भाजपकडून करण्यात येत आहे.

Mira Bhayander : नवघर पोलीस ठाण्यात राजकीय संघर्ष शिगेला; व्हिडिओ वादातून भाजप-शिवसेना आमनेसामने

मेहता यांचा नियमित दरबार, पण यावेळी वेगळा अंदाज

नरेंद्र मेहता हे यापूर्वीही दर मंगळवारी आपल्या कार्यालयात ‘जनता दरबार’ घेऊन नागरिकांच्या समस्या ऐकत आले आहेत. मात्र त्या वेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती नसल्याने तक्रारींच्या निवारणाला वेळ लागत असल्याची टीका होत होती. यावेळी अधिकाऱ्यांच्या सहभागामुळे हा दरबार अधिक प्रभावी आणि परिणामकारक ठरेल, असा विश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे.सरनाईकांच्या लोकदरबारातील तक्रारींवरून वाददरम्यान, सरनाईक यांनी घेतलेल्या लोकदरबारात मेहता यांच्या विरोधात आलेल्या तक्रारींमुळे शहरात मोठा संभ्रम निर्माण झाला. या तक्रारी राजकीय हेतूने उभ्या करण्यात आल्याचा आरोप करत मेहता यांनी सरनाईक यांच्यावर थेट निशाणा साधला होता. “आपली प्रतिमा मलिन करण्यासाठी हा कट रचला गेला,” असा आरोप करत त्यांनी या सर्व आरोपांना फेटाळले.

त्याचवेळी, “शहरात सरनाईक यांच्याविरोधातही अनेक तक्रारी आहेत आणि त्या योग्य वेळी जनता दरबारातून समोर आणल्या जातील,” असा इशाराही मेहता यांनी दिला होता. त्यामुळे आता भाजपच्या या दरबारातून कोणते मुद्दे उघडकीस येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कार्यकर्त्यांमध्ये वाढता संघर्ष, युतीवर परिणाममेहता-सरनाईक वादाचा परिणाम आता दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्येही स्पष्टपणे दिसून येत आहे. सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू असून, काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये वादाचे प्रसंगही घडल्याची चर्चा आहे. या वाढत्या तणावामुळे शिवसेना-भाजप युतीतील समन्वयावरही परिणाम होत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

वरिष्ठ पातळीवरील नेत्यांसाठी ही परिस्थिती डोकेदुखी ठरत असून, स्थानिक पातळीवरील वाद नियंत्रित ठेवण्याचे मोठे आव्हान त्यांच्या समोर आहे. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवता या संघर्षाचा राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.जनता दरबार की शक्तीप्रदर्शन?भाजपकडून आयोजित करण्यात आलेला हा जनता दरबार केवळ नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आहे की तो शिवसेनेला राजकीय प्रत्युत्तर देण्यासाठीचे शक्तीप्रदर्शन आहे, याबाबतही चर्चा रंगल्या आहेत. मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती, अधिकाऱ्यांचा सहभाग आणि संभाव्य तक्रारींचा पाऊस यामुळे हा दरबार राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरणार आहे.

नजर 22 एप्रिलकडेएकूणच, ‘लोकदरबार विरुद्ध जनता दरबार’ असा थेट संघर्ष मिरा-भाईंदरच्या राजकारणात रंगत असून, 22 एप्रिल रोजी होणारा हा कार्यक्रम वादाला आणखी पेटवणार की काही प्रमाणात तो शांत करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नागरिकांच्या समस्या खऱ्या अर्थाने मार्गी लागतात की राजकारणाचा रंग अधिक गडद होतो, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Mira Bhayander : भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य; नवघर पोलीस ठाण्यात नगरसेवकांचे आंदोलन

Web Title: Bjps janata darbar to shock shiv sena the struggle between narendra mehta and pratap sarnaik is at its peak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 03:50 PM

Topics:  

  • BJP
  • mira bhayandar
  • Narendra Mehta
  • Pratap Saranaik

संबंधित बातम्या

Chandrshekhar Bavankule on CJP Protest: CJPचे आंदोलन केवळ नौटंकी; बावनकुळेंनी उडवली खिल्ली
1

Chandrshekhar Bavankule on CJP Protest: CJPचे आंदोलन केवळ नौटंकी; बावनकुळेंनी उडवली खिल्ली

पुणे महापालिकेची सुरक्षा ऐरणीवर; आंदोलक आतपर्यंत पोहोचल्याने नगरसेवकांकडून सवाल उपस्थित
2

पुणे महापालिकेची सुरक्षा ऐरणीवर; आंदोलक आतपर्यंत पोहोचल्याने नगरसेवकांकडून सवाल उपस्थित

‘दिल्ली पोलिसांनी व्यवस्थित पुठ्ठे सुजवले…’ भाजप नेता पुन्हा बरळला, CJP आंदोलनावरून भाजपकडून जहरी टीका
3

‘दिल्ली पोलिसांनी व्यवस्थित पुठ्ठे सुजवले…’ भाजप नेता पुन्हा बरळला, CJP आंदोलनावरून भाजपकडून जहरी टीका

आता थांबायचं नाय…! आंदोलकांवरील लाठीचार्ज पाहून Sonam Wangchuk यांचा मोठा निर्णय; 23 व्या दिवशी उपोषण सुरु ठेवण्याचा मेसेज
4

आता थांबायचं नाय…! आंदोलकांवरील लाठीचार्ज पाहून Sonam Wangchuk यांचा मोठा निर्णय; 23 व्या दिवशी उपोषण सुरु ठेवण्याचा मेसेज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.