Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BMC Election 2026 Swikrut Nagarsevak: मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच १० स्वीकृत नगरसेवक; इच्छुकांच्या लॉबिंगला वेग

भाजप सर्वात मोठा पक्ष, स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती प्रक्रिया सुरू झाली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या निकालात भाजप युतीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची २५ वर्षांची एकहाती सत्ता उलथवून लावली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 19, 2026 | 01:11 PM
BMC Election 2026 Swikrut Nagarsevak

BMC Election 2026 Swikrut Nagarsevak

Follow Us
Close
Follow Us:
  • नामनिर्देशित नगरसेवक पदांसाठी पक्षांमध्ये जोरदार लॉबिंग
  • स्वीकृत नगरसेवक हा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील एक विशेष सदस्य
  • निवडणूक निकालानंतर आता पाच स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीची प्रक्रिया
BMC Election Result 2026:  मुंबई महानगरपालिका निवडणुका पार पडल्यानंतर आता नामनिर्देशित नगरसेवक पदांसाठी पक्षांमध्ये जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे. निवडून आलेले २२७ नवनिर्वाचित नगरसेवक तर १० नामनिर्देशित सदस्य असे मिळून २३७ नगरसेवक सभागृहात उपस्थित राहणार आहेत. नामनिर्देशित सदस्यत्व मिळावे यासाठी आता इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे लॉबिंग करण्यास सुरूवात केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात पहिल्यांदाच तब्बल १० स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती केली जाणार आहे. २०२३ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेत एक विधेयक मंजूर करण्यात आले होते. या विधेयकानुसार, स्वीकृत नगरसेवकांची संख्या पाचवरून दहापर्यंत वाढवण्यात आली होती.

निवडून आलेल्या नगरसेवकांच्या आकडेवारीनुसार, भाजपला ४, शिवसेना शिंदे गटाला १, ठाकरेंना २ तर मनसेने पाठिंबा दिल्यास ३ आमि अपक्षांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्यास त्यांनाही ३ नामनिर्देशित नगरसेवक मिळू शकतात. पण त्याचवेळी सध्या पालिका मुख्यालयातील सभा गृहांची आसन व्यवस्था फक्त २२७ इतकी आहे. पण १० नामनिर्देशित सदस्य वाढल्यास त्यांची आसन व्यवस्था कुठे करायची असाही प्रश्न उपस्थित होत आहे. (Mumbai Municipal Corporation Election Result 2026)

BJP National President : भाजपचे नेतृत्व आता बिहारकडे? राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी नितीन नवीन दाखल करणार अर्ज

 

स्वीकृत नगरसेवक म्हणजे काय? (BMC Election 2026 Swikrut Nagarsevak)

स्वीकृत नगरसेवक हा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील एक विशेष सदस्य असतो. स्वीकृत नगरसेवकाची निवड थेट जनतेतून होत नसते. महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी शहरातील अनुभवी आणि कार्यकुशल तज्ज्ञांची नियुक्ती केली जाते. प्रशासकीय कामात गुणात्मक वाढ व्हावी, या उद्देशाने विविध क्षेत्रांतील योगदानासाठी ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तींना ही संधी दिली जाते.

पात्रता आणि क्षेत्रांचा समावेश: निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, खालील क्षेत्रांतील दिग्गजांचा स्वीकृत नगरसेवक म्हणून समावेश अपेक्षित आहे:

प्रशासन व कायदा: अनुभवी शासकीय अधिकारी आणि वकील.

आरोग्य व शिक्षण: तज्ज्ञ डॉक्टर, शिक्षक, प्राध्यापक आणि प्राचार्य.

तांत्रिक व सामाजिक: अनुभवी अभियंते आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती.

या तज्ज्ञांच्या अनुभवाचा उपयोग महापालिकेच्या शिक्षण, आरोग्य आणि अभियांत्रिकी अशा महत्त्वाच्या समित्यांमध्ये धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी केला जाणार आहे.

Sanjay Raut BMC Mayor 2026: भाजप-ठाकरेंमध्ये अंतर्गत खलबतं…; संजय राऊतांनी स्पष्टचं सांगितलं

मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६

भाजप सर्वात मोठा पक्ष, स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती प्रक्रिया सुरू झाली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या निकालात भाजप युतीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची २५ वर्षांची एकहाती सत्ता उलथवून लावली आहे. ८९ जागांसह भाजप मुंबईतील सर्वात मोठा पक्ष ठरला असून, महायुतीचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निकालात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ६५, शिंदेंच्या शिवसेनेला २९ आणि काँग्रेसला २४ जागा मिळाल्या आहेत.

निवडणूक निकालानंतर आता पाच स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीची प्रक्रिया पार पडणार आहे. आयुक्तांच्या शिफारशीनुसार आणि सभागृहाच्या संमतीने ही नियुक्ती होते. अंतिम शिक्कामोर्तब राज्य सरकार करते. स्वीकृत सदस्यांना निवडून आलेल्या नगरसेवकांप्रमाणेच मानधन, भत्ते आणि विकास निधी मिळतो. ते विविध समित्यांमध्ये काम करू शकतात आणि चर्चेत सहभागी होऊ शकतात. या सदस्यांना महापौर, उपमहापौर किंवा स्थायी समितीच्या निवडणुकांमध्ये मतदानाचा अधिकार नसतो.

 

Web Title: Bmc election 2026 nominated corporators for the first time 10 nominated corporators in the mumbai municipal corporation lobbying by aspirants gains momentum

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 01:09 PM

Topics:  

  • BMC Election
  • BMC Election 2026
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Mayor reservation draw date : महापौर पदासाठी आरक्षण सोडत ‘या’ दिवशी होणार जाहीर; तारीख आली समोर
1

Mayor reservation draw date : महापौर पदासाठी आरक्षण सोडत ‘या’ दिवशी होणार जाहीर; तारीख आली समोर

MIM मुळे कोणाची हानी तर कोणाचा लाभ! मिळालेली मते एमआयएमची जमेची बाजू तर ‘हिंदुत्व’ ही येणार पुढे
2

MIM मुळे कोणाची हानी तर कोणाचा लाभ! मिळालेली मते एमआयएमची जमेची बाजू तर ‘हिंदुत्व’ ही येणार पुढे

BMC महापौर पदासाठी भाजपनेही खेळला डाव! सावध भूमिका घेत नगरसेवकांना दिल्या खास सूचना
3

BMC महापौर पदासाठी भाजपनेही खेळला डाव! सावध भूमिका घेत नगरसेवकांना दिल्या खास सूचना

Dharashiv News: शिंदे सेनेतील एक गट भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत…; तानाजी सावंतांचे खळबळजनक विधान
4

Dharashiv News: शिंदे सेनेतील एक गट भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत…; तानाजी सावंतांचे खळबळजनक विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.