मुंबई : मुंबई महानगरपालिकेने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी कोरोना लसीच्या दुसऱ्या आणि बूस्टर डोसमधील अंतराबाबत केंद्राच्या निर्णयाची अंमलबजावणी करायचे ठरविले आहे. केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवाशांना नऊ महिन्यांऐवजी तीन महिन्यांतच बूस्टर डोस घेण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार आता मुंबईहून परदेशात जाणाऱ्यांना दुसऱ्या डोसनंतर किमान ९० दिवसांनी बूस्टर डोस घेता येणार आहे(BMC takes big decision regarding booster dose for international travelers).
केंद्र सरकारने यापूर्वी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेऊन ९ महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यावरच बूस्टर डोस घेण्याचे आवाहन केले होते. मात्र शुक्रवारी केंद्राने जाहीर केले की, शिक्षण आणि व्यवसायानिमित्त परदेशात जाणारे नागरिक कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर तीन महिन्यांनी बूस्टर डोस घेऊ शकतात. त्यासाठी कोविन ऍपमध्ये आणि संबंधित संगणकीय प्रणालीत आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत.
आता याबाबत मुंबई महानगरपालिकेने आपल्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व खासगी आणि सरकारी लसीकरण केंद्रांना आदेश जारी केले आहेत. त्यामुळे परदेशी जाणाऱ्या मुंबईकरांना ९० दिवसांच्या अंतराने बूस्टर डोस घेता येईल. दरम्यान, आंतरराष्ट्रीय प्रवाशांना लसीकरण करण्यापूर्वी व्हिसा, विमान तिकीट, नोकरीचे पत्र, अभ्यासाची पात्रता किंवा परदेशी जाण्याचे खरे कारण यांसारखे पुरावे जिल्हा लसीकरण कार्यालयात सादर करावे लागणार आहेत.
महत्त्वाचे म्हणजे मुंबई महानगरपालिकेने कोरोना लसीच्या बूस्टर डोसमधील अंतर कमी करण्याचा निर्णय केवळ आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी असून सामान्य नागरिकांसाठी लागू नसल्याचे सांगितले आहे.
[read_also content=”लग्नानंतर वधू-वराने स्वत:ला पेटवून घेतलं आणि…. पाहा भयानक व्हिडिओ https://www.navarashtra.com/viral/bride-and-groom-set-themselves-on-fire-nrvk-280519.html”]
[read_also content=”‘येथे’ आजही धडधडते भगवान कृष्णाचे हृदय! वैज्ञानिकांनाही याचे रहस्य उमगले नाही https://www.navarashtra.com/viral/the-story-of-lord-jagannath-and-krishnas-heart-nrvk-280509.html”]
[read_also content=”एक महिला तब्बल 36 वर्षांपासून पुरुष म्हणून वावरली पण शेवटी… https://www.navarashtra.com/viral/woman-lives-in-the-guise-of-man-for-36-years-nrvk-280502.html”]