Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाबांनो जरा जपूनच! यंदा पावसाचे प्रमाण कमी अन्…? ‘आढी वाचना’तून कोणते अंदाज आले समोर?

पिंगोरी हे गाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदार भिलोजी शिंदे यांच्याशी संबंधित असून येथे शिवपूर्व काळापासून पिंगळाई देवीची पूजा केली जाते. सध्या ही देवी वाघेश्वरी देवी म्हणून ओळखली जाते.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 20, 2026 | 02:42 PM
बाबांनो जरा जपूनच! यंदा पावसाचे प्रमाण कमी अन्…? ‘आढी वाचना’तून कोणते अंदाज आले समोर?
Follow Us
Follow Us:

हे वर्ष कमी पावसाचे व पाणी जपून वापरण्याचे
आढी वाचनातून व्यक्त केला गेला अंदाज 
पिंगोरी मध्ये करण्यात आले आढी वाचन आणि पंचाग पूजन

नीरा: हिंदू नववर्षाच्या प्रारंभी सर्वत्र पंचांग पूजनाची परंपरा पाळली जाते. याच अनुषंगाने पुरंदर तालुक्यातील शिंदे सरदारांचे गाव म्हणून ओळख असलेल्या पिंगोरी येथे पारंपरिक आढी वाचन व पंचांग पूजन मोठ्या उत्साहात पार पडले. या आढी वाचनातून यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

पिंगोरी येथे शेकडो वर्षांपासून आढी वाचनाच्या माध्यमातून पर्जन्यमान व पीक परिस्थितीचा अंदाज बांधण्याची परंपरा जपली जाते. यावर्षीच्या आढी वाचनानुसार निम्म्याहून अधिक नक्षत्रे कोरडी जाणार असून काही मोजक्याच नक्षत्रांत समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस अन्नधान्य पिकांसाठी पुरेसा ठरणार असला तरी एकूणच पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला.
या अंदाजानुसार बाजरी व ज्वारीचे उत्पादन बऱ्यापैकी होण्याची शक्यता असून धान्य पिकांना अनुकूल परिस्थिती राहील. मात्र कडधान्य पिकांचे उत्पादन कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पिंगोरी हे गाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदार भिलोजी शिंदे यांच्याशी संबंधित असून येथे शिवपूर्व काळापासून पिंगळाई देवीची पूजा केली जाते. सध्या ही देवी वाघेश्वरी देवी म्हणून ओळखली जाते. चैत्र पाडव्याच्या दिवशी या मंदिरात पंचांग वाचन केले जाते. त्याचबरोबर महादेव मंदिरासमोर आढी पूजन व वाचन करून वर्षभरातील पर्जन्यमान व पिकांचा अंदाज मांडला जातो.

आज गुरुवारी सकाळी ग्रामस्थांच्या उपस्थितीत आढी पूजन करण्यात आले. यावेळी पिंगोरीचे सरपंच संदीप यादव, पोलिस पाटील राहुल शिंदे, धनंजय शिंदे, सुरेश शिंदे, पोपट शिंदे, वसंत शिंदे, सुनील शिंदे, शशिकांत चौधरी, निलेश शिंदे, गोविंद शिंदे, राजेंद्र शिंदे, बाळासाहेब गायकवाड, मंगेश शिंदे, माणिक गायकवाड, कैलास गायकवाड, प्रवीण शिंदे, सागर सुतार, तुकाराम शिंदे, मच्छिंद्र शिंदे, शांताराम शिंदे आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Both aadhi readings and the traditional almanac forecast lower rainfall this year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 02:42 PM

Topics:  

  • Purandar
  • Rain News
  • water news

संबंधित बातम्या

Mumbai Rain : मुसळधार पावसात मुंबईत आणखी एक दुर्घटना; साकीनाक्यात 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू
1

Mumbai Rain : मुसळधार पावसात मुंबईत आणखी एक दुर्घटना; साकीनाक्यात 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू

एक तासाच्या पावसातच घरांमध्ये पाणी; केडीएमसीच्या नालेसफाईच्या दाव्यावर नगरसेवक कुणाल पाटील यांचा संतप्त ससंतप्
2

एक तासाच्या पावसातच घरांमध्ये पाणी; केडीएमसीच्या नालेसफाईच्या दाव्यावर नगरसेवक कुणाल पाटील यांचा संतप्त ससंतप्

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.