Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News: १३ लाख ज्येष्ठांना ‘अमृत’ लाभ; मोफत प्रवासामुळे ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर हसू फुलले

Amrut ST Bus Free Travel Scheme : बुलढाणा आगारातून ‘अमृत’ मोफत प्रवास पास योजनेला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, गेल्या आठ महिन्यांत १३ लाख ४३ हजार १७२ प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 15, 2026 | 04:10 PM
Amrut ST Bus Free Travel Scheme

Amrut ST Bus Free Travel Scheme

Follow Us
Follow Us:
  • १३ लाख ज्येष्ठांना ‘अमृत’ लाभ
  • मोफत प्रवासामुळे ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर हसू फुलले
  • देवदर्शनाचा प्रवास झाला सुलभ व सुखकर
बुलढाणा: ‘बहुजन हिताय,बहुजन सुखाय’ हे ब्रीद वाक्य असलेल्या राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने व सुखकर प्रवास करता यावा, या उद्देशाने ‘अमृत’ मोफत प्रवास पास योजना सुरू करण्यात आली. या योजनेला ज्येष्ठ नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे सुखद चित्र दिसून येत आहे. बुलढाणा आगारातून गत ८ महिन्यात तब्बल १३ लाख ४३ हजार १७२ प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेतल्याची नोंद झाली. ‘अमृत’ मोफत योजनेमुळे अनेकांना धार्मिकस्थळांना भेटी देता आल्यामुळे ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.

ज्येष्ठ नागरिकांना अनेकदा वाढत्या वयामुळे देवदर्शनाला, नातेवाईकांना भेटण्यासाठी जाण्याची इच्छा निर्माण होऊन देखील आर्थिक बजेटमुळे प्रवास खर्च परवडत नसल्याने मनातली इच्छा मनातच ठेवावी लागत होती. मात्र, राज्य परिवहन महामंडळाने ७५ वर्षावरील ज्येष्ठांसाठी ‘अमृत’ मोफत प्रवास योजना अमलात आणून, एकप्रकारे त्यांना दिलासा देण्याचे काम केले. परिवहन मंडळाच्या या ‘अमृत’ मोफत प्रवास योजनेमुळे आता ज्येष्ठांना नातेवाईकांना भेटणे, धार्मिकस्थळांना जाणे तसेच विविध वैयक्तिक कामांसाठी प्रवास करणे अधिक सोयीचे झाले, राज्य परिवहन महामंडळाच्या ‘लालपरी’ बसमधून मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध झाल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण झाले आहेत.

विशेषतः ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना मोठा आधार ठरत आहे. गावातून तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी एसटी बस हा अनेकांचा प्रमुख प्रवासाचा पर्याय आहे. या योजनेअंतर्गत बुलढाणा आगारातून १३ लाख ४३ हजार १७२ प्रवाशांनी अमृत योजनेचा लाभ घेतल्याची नोंद झाली. ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक दिलासा देतानाच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडून ठेवण्याचे महत्त्वपूर्ण काम या योजनेतून होत आहे. मोफत प्रवासामुळे ज्येष्ठ नागरिक अधिक आत्मविश्वासाने प्रवास करत असून, त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि आनंद हीच या योजनेच्या यशाची खरी पावती ठरत आहे.

देवदर्शनाचा प्रवास झाला सुलभ व सुखकर

७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना राज्यात कुठेही देवदर्शनाला जाण्याची इच्छा निर्माण झाल्यास, आता कुठलीही चिंता करायचे कारण राहिले नाही, परिवहन विभागाच्या ‘अमृत’ मोफत प्रवास योजनेअंतर्गत धार्मिकस्थळांना जाण्यासाठी मोफत प्रवास करण्यास मिळत असल्याने पैशाची चिंता राहिली नसल्याने, एसटीच्या सुखकर प्रवासाला ज्येष्ठांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

प्रवासासाठी एनसीएमसी कार्ड आवश्यक

राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये महिला सन्मान, अमृत ज्येष्ठ योजनांचा समावेश असून, या योजनांचा फायदा घेण्यासाठी प्रवाशांना एनसीएमसी कार्ड आवश्यक आहे. एसटीच्या मोफत योजनांमुळे महिला आणि वृद्धांची गर्दी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.

ज्येष्ठ नागरिक, जनार्दन पवार म्हणाले की, देवदर्शनाला खाजगी वाहनाने जाण्यासाठी अतिरिक्त खर्च येत होता. आर्थिक बजेट नसल्याने धार्मिकस्थळांना जाण्याची इच्छा असून, देखील जाता आले नाही. मात्र परिवहन विभागाच्या अमृत’ मोफत प्रवास योजनेमुळे देवदर्शनाला जाण्याचा मार्ग सुलभ झाला आहे.

बुलढाण्याचे विभागीय नियंत्रक, शुभांगी शिरसाट म्हणाले की, राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवाशांसाठी सन्मान, अमृत योजना, ज्येष्ठांसाठी योजना या माध्यमातून नागरिकांच्या प्रवासावर झालेला खर्च शासनाच्या वतीने प्रतिपूर्ती म्हणून दिल्या जातो.

Buldhana News: कोवळ्या पिकावर वन्यप्राण्यांचा ताव; पिकाच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांची रखवाली, संकटात आणखी भर

Web Title: Buldhana amrut free travel scheme senior citizens

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 04:08 PM

Topics:  

  • buldhana news
  • Maharashtra ST Buses
  • st bus news

संबंधित बातम्या

अकोल्यात 26 लाख 57 हजार ज्येष्ठांना ‘अमृत’ लाभ’; अनुदानाचा प्रस्ताव शासनाकडे सादर
1

अकोल्यात 26 लाख 57 हजार ज्येष्ठांना ‘अमृत’ लाभ’; अनुदानाचा प्रस्ताव शासनाकडे सादर

NCMC कार्ड नसेल तरीही सवलतीच्या दरात करता येणार प्रवास; पुन्हा मिळाली मुदतवाढ
2

NCMC कार्ड नसेल तरीही सवलतीच्या दरात करता येणार प्रवास; पुन्हा मिळाली मुदतवाढ

Buldhana News: कोवळ्या पिकावर वन्यप्राण्यांचा ताव; पिकाच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांची रखवाली,  संकटात आणखी भर
3

Buldhana News: कोवळ्या पिकावर वन्यप्राण्यांचा ताव; पिकाच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांची रखवाली, संकटात आणखी भर

Buldhana News: ५१ प्रकल्पांत ६० टक्के जलसाठा; खरिपासोबतच रब्बीच्याही सिंचनाची काळजी
4

Buldhana News: ५१ प्रकल्पांत ६० टक्के जलसाठा; खरिपासोबतच रब्बीच्याही सिंचनाची काळजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.