Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बुलढाण्यात १३ तालुके दुष्काळग्रस्त, शेतकऱ्यांना विविध सवलतींचा दिलासा; पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश

Buldhana Drought Relief Measures :खरीप २०२६ मधील पर्जन्यमानातील तूट, पिकांची प्रतिकूल स्थिती आणि उपलब्ध पाण्याची परिस्थिती लक्षात घेता बुलढाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यांचा दुष्काळसदृश परिस्थितीच्या (ट्रिगर-१) यादीत समावेश करण्यात आला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 27, 2026 | 07:14 PM
Pentakli Dam Water Supply

Pentakli Dam Water Supply

Follow Us
Follow Us:
  • शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी
  • १३ तालुके दुष्काळसदृश यादीत
  • कर्जवसुलीपासून वीजबिलापर्यंत मिळणार सवलती
बुलढाणा: खरीप हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि पिकांच्या प्रतिकूल परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यांचा (ट्रिगर-१) समावेश दुष्काळसदृश परिस्थितीच्या यादीत करण्यात आला. याचावत राज्य शासनाने आज शासन निर्णय निर्गमित केला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी उपाययोजनांचा लाभ मिळावा, यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यामुळे यश आले.

खरीप २०२६ मधील पर्जन्यमानातील तूट, पिकांची स्थिती आणि उपलब्ध पाणी परिस्थितीचा विचार करून कृषी आयुक्तांच्या अहवालाच्या आधारे राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती आढळून आली आहे. त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा, चिखली, मलकापूर, मेहकर, खामगाव, शेगाव, लोणार, देऊळगाव, राजा, सिंदखेड राजा, मोताळा, नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यांचा समावेश करण्यात आला.

शासन निर्णयानुसार दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर झालेल्या भागात नागरिक व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना लागू करण्यात येणार आहेत. यामध्ये जमीन महसूल वसुलीस सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषिपंपाच्या वीजबिलात सवलत यांचा समावेश आहे. तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कामांच्या निकषांमध्ये शिथिलता, आवश्यकतेनुसार पिण्याच्या पाण्याचे टैंकर, शेतीपंपाची वीजजोडणी खंडित न करणे, शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी व मजुरांसाठी अन्नधान्याची उपलब्धता, जनावरांसाठी चारा व्यवस्था, जलसंधारणाची कामे प्राधान्याने हाती घेणे आणि पिण्याचे तसेच जनावरांच्या पाण्याचे नियोजन करण्याच्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. “या संकटकाळात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्ण पाठबळ देणे ही आमची प्राथमिकता आहे. शासन स्तरावर केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील १३ तालुक्यांचा दुष्काळसदृश यादीत समावेश झाला आहे.

पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश

शासन निर्णयानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी बाधित भागातील पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले. सर्वेक्षणादरम्यान पिकांची स्थिती दर्शविणारी छायाचित्रे तसेच जीपीएस कोऑर्डिनेट संकलित करून पिकांच्या परिस्थितीचा अहवाल शासनाला सादर करण्यात येणार आहे. पिकांच्या नुकसानीबाबतची मदत विहित कार्यपद्धतीची पूर्तता केल्यानंतर स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे जाहीर करण्यात येणार आहे.

Wai News: बजाज चेतक खरेदीचा आनंद ठरला मनस्ताप! साडेतीन महिने उलटले, तरी पासिंग नाही; ग्राहक महिलेची फरफट

Web Title: Buldhana drought 13 talukas farmers relief 2026 makarand patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 07:14 PM

Topics:  

  • Aid to Farmers
  • buldhana news
  • Crisis on farmers

संबंधित बातम्या

Buldhana News: निवृत्तीवेतनधारकांसाठी दिलासा! आता घरबसल्या सादर करा हयातीचा दाखला; लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. देवरांचे आवाहन
1

Buldhana News: निवृत्तीवेतनधारकांसाठी दिलासा! आता घरबसल्या सादर करा हयातीचा दाखला; लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. देवरांचे आवाहन

Washim News: कर्ज काढून हळद लावली, पण पाण्याअभावी पीक उद्ध्वस्त! कंझरात २०० पैकी १०० एकर हळद वाळली; शेतकरी हवालदिल
2

Washim News: कर्ज काढून हळद लावली, पण पाण्याअभावी पीक उद्ध्वस्त! कंझरात २०० पैकी १०० एकर हळद वाळली; शेतकरी हवालदिल

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघातांची मालिका! कंटेनरची एकापाठोपाठ  १६ कारला धडक; अनेक जखमी
3

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघातांची मालिका! कंटेनरची एकापाठोपाठ १६ कारला धडक; अनेक जखमी

Khamgaon: निराधार महिलांसाठी मोठा दिलासा! आता वयाच्या पुराव्यासाठी आधारकार्ड ग्राह्य; गणेश चौकसे यांच्या पाठपुराव्याला यश
4

Khamgaon: निराधार महिलांसाठी मोठा दिलासा! आता वयाच्या पुराव्यासाठी आधारकार्ड ग्राह्य; गणेश चौकसे यांच्या पाठपुराव्याला यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.