Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News: कोवळ्या पिकावर वन्यप्राण्यांचा ताव; पिकाच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांची रखवाली, संकटात आणखी भर

Buldhana farmers Kharif crop damage: बुलढाणा जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात उशिरा झालेला पाऊस आणि त्यानंतरची उघडीप यामुळे पिकांच्या वाढीवर मोठा परिणाम झाला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 14, 2026 | 05:37 PM
Buldhana farmers Kharif crop damage

Buldhana farmers Kharif crop damage

Follow Us
Follow Us:
  • पावसाने दगा दिला, आता वन्यप्राण्यांचा हल्ला
  • पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची रखवाली
  • पिके वाचवण्याची शेतकऱ्यांची धडपड
बुलढाणा: यंदाचा खरीप हंगाम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी फारसा दिलासादायक अद्याप पर्यंत तरी राहाल नाही. रोहिणी व मृग नक्षत्रात वरून राजाने जिल्ह्यावर वक्रदृष्टी केली. परिणामी उशिराने आलेल्या पावसाने खरीप पेरण्यांना देखील विलंब झाला. प्रारंभी समाधानकारक वाटणारा पाऊस ऐन पिके जोमात असताना उघडीप देऊन गेला. फुलोरा आणि शेंगा अवस्थेत असलेल्या पिकांना जगण्यासाठी शेतकऱ्यांनी उपलब्ध सिंचन साधनाद्वारे पिके जगण्यासाठी धडपड सुरू केली. एकीकडे पिके जगवण्याची धडपड तर दुसरीकडे शेतशिवारात वन्यप्राण्यांचा कोवळ्या पिकांवर समूहाने होणारा हल्ला शेतकऱ्यांच्या संकटात भर टाकणारा ठरत आहे.

Buldhana News: पावसाअभावी शेती संकटात,आर्थिक वर्ष पूर्णतः कोलमडले; कोरड्या दुष्काळाच्या छायेत ‘बळीराजा’

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. शेती हा व्यवसाय पूर्णतः निसर्गाच्या भरवशावर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांना कधी चांगले दिवस बघायला मिळतात तर कधी निसर्गाचा प्रकल्पामुळे संकटाचा देखील सामना करावा लागतो. यंदाचा खरीप हंगाम देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी संकट घेऊन आलेला आहे. अगोदरच मान्सूनच्या पावसाचे दोन आठवड्यानंतर झालेले आगमन, खरीप पेरणीला झालेला विलंब, त्यातच गत दीड महिन्यापासून दडी मारून बसलेला पाऊस. सोबतच किडींचा वाढता प्रादुर्भाव शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू लागला आहे. पाऊस येईना, किडीचा प्रादुर्भाव थांबता थांबेना, हेच संकट जणू काही कमी झाले की काय? असे वाटत असतानाच कोवळ्या पिकात रोही, नीलगाय, हरीण आणि माकड या प्राण्यांचा होत असलेला मुक्त संचार कोवळ्या पिकांची नासाडी करीत आहे.

शासनाकडून नुकसानीची मिळते तुटपुंजी मदत

शेतकरी राबराब राबून शेतमाल पिकवतो. एकीकडे बाजारातही योग्य भाव मिळत नाही. तर दुसरीकडे वन्यप्राणी पिकांचे अतोनात नुकसान करतात. पीक नुकसानभरपाई मिळण्यासाठी वनविभागाकडे अर्ज केल्यानंतर कागदांचा ससेमिरा मागे लावला जातो. तरीदेखील तूटपुंजी मदत देऊन वनविभाग शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसतो, अशी संतप्त प्रतिक्रिया पांगरी उबरहंडे येथील शेतकरी गणेश देशमुख यांनी व्यक्त केली.

मेरा खुर्दचे शेतकरी, रामदास मुजुमले म्हणाले की, ८८ दोन ते तीन वर्षापासून शेतीतून पाहिजे तितके उत्पन्न होऊन राहिले नाही. जे काही उत्पन्न होते त्याला बाजारात भाव मिळत नाही. त्यामुळे दरवर्षीच कर्ज काढून शेतीची पेरणी करावी लागते. कधी निसर्ग साथ देतो तर कधी हिरावून घेतो. पीक पाणी चांगले आले तर शेत शिवारात रोह्यांचे कळप धुडगूस घालत असल्याने पिकांचे नुकसान होते. शेतशिवारात येणाऱ्या या वन्यप्राण्यांचा वनविभागाने बंदोबस्त केला पाहिजे.

Buldhana News: ३१ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम; पीएम किसान लाभासाठी KYC करा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन

Web Title: Buldhana farmers kharif crop damage wild animals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 05:37 PM

Topics:  

  • buldhana news
  • Crisis on farmers
  • Farmers Issues

संबंधित बातम्या

Buldhana News: ५१ प्रकल्पांत ६० टक्के जलसाठा; खरिपासोबतच रब्बीच्याही सिंचनाची काळजी
1

Buldhana News: ५१ प्रकल्पांत ६० टक्के जलसाठा; खरिपासोबतच रब्बीच्याही सिंचनाची काळजी

कोरडा दुष्काळ तत्काळ जाहीर करा, शेतकरी मदतीसाठी शिवसेनेचा एल्गार; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
2

कोरडा दुष्काळ तत्काळ जाहीर करा, शेतकरी मदतीसाठी शिवसेनेचा एल्गार; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Buldhana News: पावसाअभावी शेती संकटात,आर्थिक वर्ष पूर्णतः कोलमडले; कोरड्या दुष्काळाच्या छायेत ‘बळीराजा’
3

Buldhana News: पावसाअभावी शेती संकटात,आर्थिक वर्ष पूर्णतः कोलमडले; कोरड्या दुष्काळाच्या छायेत ‘बळीराजा’

Buldhana News: ३१ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम; पीएम किसान लाभासाठी KYC करा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन
4

Buldhana News: ३१ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम; पीएम किसान लाभासाठी KYC करा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.