PM Kisan Samman Nidhi
Washim News: पैनगंगा नदीची पाणीपातळी घटली; रिसोडच्या मसलापेन परिसरावर दुष्काळाचे सावट
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार, या विशेष मोहिमेच्या कालावधीतही अनिवार्य बाबींची पूर्तता न करणाऱ्या लाभार्थ्यांना विहित प्रक्रियेनुसार नव्याने अर्ज करून आवश्यक पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागू शकते. त्यामुळे सर्व पात्र शेतकऱ्यांनी ३१ ऑक्टोबरपूर्वी प्रलंबित असलेल्या सर्व अनिवार्य बाबींची पूर्तता करून घ्यावी, असे आवाहन कृषी प्रशासनातर्फे करण्यात आले.
योजनेचा लाभ खऱ्या व जिवंत लाभार्थ्यांपर्यंतच पोहोचावा यासाठी ई- केवायसी अनिवार्य आहे. जिल्ह्यातील २ हजार २८ लाभार्थ्यांचे ई-केवायसी अद्याप प्रलंबित आहे. याशिवाय, २०२६-२७साठी वार्षिक ई-केवायसी प्रलंबित असलेल्या २ लाख ६३ हजार ८०७लाभार्थ्यांनीही ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी नजीकच्या सामाईक सुविधा केंद्रात जाऊन बायोमेट्रिक प्रमाणीकरण करणे. किंवा पीएम- किसान मोबाइल अॅपद्वारे माध्यमातून करावे.
जिल्ह्यातील सुमारे ४ हजार १०१ लाभार्थ्यांची बँक खाती अद्याप आधारशी संलग्न झालेली नाहीत. अशा लाभार्थ्यांनी ज्या बँकेत खाते आहे, त्या बँकेच्या शाखेत जाऊन बँक खाते आधार क्रमांकांशी संलग्न करून घ्यावे. तसेच इंडिया पोस्ट पेमेंट्स बैंक मार्फत आधार संलग्न बैंक खाते उघडण्याची सुविधाही उपलब्ध आहे. अडचणी आल्यास संबंधित बँक, सहाय्यक कृषी अधिकारी अथवा कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा.






