Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana: परतीच्या पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा, रखरखत्या उन्हात सोयाबीन काढणीला वेग; रब्बी पिकांसाठी महत्त्वाचे

Buldhana Farmers Soybean Crop Harvesting: बुलढाण्यात ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा वाढल्याने शेतकरी सोयाबीनची काढणी घाईने करत असून, पीक वाचविण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 05, 2026 | 06:45 PM
Photo- Ai generated

Photo- Ai generated

Follow Us
Follow Us:
  • बुलढाण्यात उन्हाचा तडाखा वाढला
  • सोयाबीन काढणीची घाई
  • शेतकऱ्यांच्या नजरा परतीच्या पावसाकडे
बुलढाणा: ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात उन्हाचा तडाखा कमालीचा वाढला. एकीकडे रखरखत्या उन्हाच्या झळा आणि दुसरीकडे हातातोंडाशी आलेले पीक वाचविण्याची धडपड, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला, सोयाबीनचे पीक काढणीला आले असून, शेंगा फुटून दाणे वाया जाऊ नयेत म्हणून शेतकरी कडक उन्हाची पर्वा न करता काढणीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिसून येत आहे. यंदाचा खरीप हंगाम अपेक्षेप्रमाणे न गेल्याने आता शेतकऱ्यांच्या नजरा परतीच्या पावसाकडे लागल्या आहेत.

Buldhana PM Awas Yojana: ८४ हजार घरकुलांचे स्वप्न अधुरे! ३२४ कोटींचे अनुदान रखडले; हक्काच्या घराची प्रतीक्षा कधी संपणार?

यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीला पावसाने ओढ दिली, तर त्यानंतर पडलेल्या पावसातही सातत्य राहिले नाही.त्यामुळे खरिपातील पिकांवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. जिल्ह्यात सरासरी ७५० ते ८१० मिमी पाऊस पडतो. यंदा मात्र आतापर्यंत सुमारे ४५० मिमी पावसाची नोंद झाल्याने अनेक भागांत पिकांची वाढ खुंटली आहे. सोयाचीनचे दाणे बारीक राहिल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत. त्यातच गेल्या काहीदिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने सोयाबीनचे पीक झपाट्याने वाळत आहे.

कडक उन्हामुळे शेंगा फुटून दाणे शेतातच गळण्याची भीती निर्माण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणीला वेग दिला. मजुरांची टंचाई आणि वाढलेली मजुरी यामुळे अनेक ठिकाणी यंत्राच्या साहाय्याने सोयाबीनची काढणी केली जात आहे, तर काही शेतकरी कुटुंबीयांच्या मदतीने काढणीची कामे उरकताना दिसत आहेत. दरम्यान, पावसाच्या अनियमिततेमुळे भूजलपातळीवरही परिणाम झाला. खरिपातील नुकसान भरून काढण्यासाठी आता रब्बी हंगाम तरी चांगला जावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. त्यासाठी परतीचा पाऊस होणे अत्यंत गरजेचे आहे. सोयाबीन, मका आणि ज्वारीची काढणी झाल्यानंतर परतीचा पाऊस वेळेवर आणि समाधानकारक झाल्यास हरभरा, गहू आदी रब्बी पिकांची पेरणी करता येणार आहे. खरिपातील कमी पाऊस, घटलेले उत्पादन आणि वाढत्या उन्हामुळे बळीराजा चिंतेत आहे. आता परतीचा पाऊस बरसून कोरड्या पडलेल्या शेतांना संजीवनी मिळणार का, याकडे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील शेतकन्यांचे लक्ष लागले आहे.

Washim: ‘रीलस्टार’ तहसीलदारांची पथकाकडून झाडाझडती, रील प्रकरणासह संपूर्ण प्रशासकीय कामकाजाची चौकशी; अहवालाकडे जिल्ह्याचे लक्ष

Web Title: Buldhana farmers soybean harvesting return monsoon rabi crops

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 06:32 PM

Topics:  

  • buldhana news
  • Crisis on farmers
  • soyabin news

संबंधित बातम्या

Washim: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी शेतकऱ्यांच्या जाणल्या समस्या, रणथम शिवारात अंधारात टॉर्चच्या उजेडात केली पीक पाहणी
1

Washim: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी शेतकऱ्यांच्या जाणल्या समस्या, रणथम शिवारात अंधारात टॉर्चच्या उजेडात केली पीक पाहणी

Buldhana PM Awas Yojana: ८४ हजार घरकुलांचे स्वप्न अधुरे! ३२४ कोटींचे अनुदान रखडले; हक्काच्या घराची प्रतीक्षा कधी संपणार?
2

Buldhana PM Awas Yojana: ८४ हजार घरकुलांचे स्वप्न अधुरे! ३२४ कोटींचे अनुदान रखडले; हक्काच्या घराची प्रतीक्षा कधी संपणार?

कर्ज फेडण्यासाठी जमीन विकली, वावर गहाण अन् पत्नीचे मंगळसूत्रही ठेवले; अखेर तरुण शेतकऱ्याने जीवन संपवले
3

कर्ज फेडण्यासाठी जमीन विकली, वावर गहाण अन् पत्नीचे मंगळसूत्रही ठेवले; अखेर तरुण शेतकऱ्याने जीवन संपवले

Farmers Crop Loan Issue : कागदपत्रांवर सह्या घेतल्या कर्ज दिलंच नाही! खोडाळा आदिवासी सेवा सोसायटीतील शेतकरी संतप्त, पोलिसांत धाव
4

Farmers Crop Loan Issue : कागदपत्रांवर सह्या घेतल्या कर्ज दिलंच नाही! खोडाळा आदिवासी सेवा सोसायटीतील शेतकरी संतप्त, पोलिसांत धाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.