Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News: मृद व जलसंधारण अधिकाऱ्यांची कार जप्त; पाझर तलाव भूसंपादनप्रकरणी कोर्टाची कारवाई

Buldhana Soil and Water Conservation Department : बुलढाण्यात पाझर तलावासाठी भूसंपादनाचा मोबदला न मिळाल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार मृद व जलसंधारण अधिकारी अमोल मुंढे यांची शासकीय कार जप्त करण्यात आली. या कारवाईमुळे प्रशासकीय यंत्रणेची मोठी नामुष्की झाल्याचे पाहायला मिळाले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 18, 2026 | 04:30 PM
Buldhana News: मृद व जलसंधारण अधिकाऱ्यांची कार जप्त; पाझर तलाव भूसंपादनप्रकरणी कोर्टाची कारवाई
Follow Us
Follow Us:
  • मृद व जलसंधारण अधिकाऱ्यांची कार जप्त
  • पाझर तलाव भूसंपादनप्रकरणी कोर्टाची कारवाई
  • दुचाकीवरून प्रवास करण्याची नामुष्की
बुलढाणा: पाझर तलावासाठी भूसंपादन प्रकरणात शासनातर्फे मोबदला मिळाला नसल्याने एका न्यायप्रविष्ट प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. प्रशासकीय यंत्रणेवर नामुष्की ओढावल्याचे पाहायला मिळाले. न्यायालयाच्या आदेशानुसार बुलढाण्यात चक्क मृद व जलसंधारण अधिकारी अमोल मुंढे यांचे शासकीय कार जप्त करण्यात आली.

Buldhana News: कर्जमुक्ती योजना; पालकमंत्र्यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा, नुकसानीचे पंचनामे अचूक व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश

कोर्टाचा बेलीफ, पीडित शेतकरी व त्यांच्या वकील सोमवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास चिखली रोडवरील मृद व जलसंधारण अधिकारी कार्यालयात धडकले व कार जप्तीची ही कारवाई करण्यात आली. मोताळा तालुक्यातील गोतमारा कोऱ्हाळा शिवारात पाझर तलावाच्या निर्मितीसाठी २००९ मध्ये अनेक शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली होती. परंतु, शासनातर्फे संबंधित शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नसल्याने त्यांनी मलकापूर दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. यासंदर्भात न्यायालयाने २०२३ मध्ये निकाल देत बुलढाणा जिल्हाधिकारी, लघु सिंचन अधिकारी आणि विशेष भूसंपादन अधिकारी कार्यालयाला ५ लाख ५८ हजार १० रुपये अदा करण्याचे आदेश दिले होते. परंतु, बराच काळ उलटूनही पीडित शेतकऱ्याना मोबदला मिळाला नसल्याने न्यायालयाने कडक भूमिका घेत मृद व जलसंधारण अधिकाऱ्याचे शासकीय वाहन जप्त करण्याचे आदेश दिले.

दुचाकीवरून प्रवास करण्याची नामुष्की

कार जप्तीची कारवाई झाल्यानंतर मृद व जलसंधारण अधिकारी अमोल मुंढे यांना सहकारी कर्मचाऱ्याच्या दुचाकीने प्रवास करावा लागल्याचे पहायला मिळाले.

Washim News: विकासकामे वेळेत पूर्ण करा, पालकमंत्री भरणे यांचे निर्देश; जिल्हा वार्षिक योजनेची बैठक

Web Title: Buldhana land acquisition case government car seized court order

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 04:29 PM

Topics:  

  • buldhana news
  • Court orders
  • Farmer Issue

संबंधित बातम्या

Buldhana: परतीच्या पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा, रखरखत्या उन्हात सोयाबीन काढणीला वेग; रब्बी पिकांसाठी महत्त्वाचे
1

Buldhana: परतीच्या पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा, रखरखत्या उन्हात सोयाबीन काढणीला वेग; रब्बी पिकांसाठी महत्त्वाचे

Parbhani Suicide News : सहलीसाठी नवीन कपडे मिळाले नाहीत; परभणीत शेतकऱ्याच्या मुलाची आत्महत्या
2

Parbhani Suicide News : सहलीसाठी नवीन कपडे मिळाले नाहीत; परभणीत शेतकऱ्याच्या मुलाची आत्महत्या

Buldhana PM Awas Yojana: ८४ हजार घरकुलांचे स्वप्न अधुरे! ३२४ कोटींचे अनुदान रखडले; हक्काच्या घराची प्रतीक्षा कधी संपणार?
3

Buldhana PM Awas Yojana: ८४ हजार घरकुलांचे स्वप्न अधुरे! ३२४ कोटींचे अनुदान रखडले; हक्काच्या घराची प्रतीक्षा कधी संपणार?

कर्ज फेडण्यासाठी जमीन विकली, वावर गहाण अन् पत्नीचे मंगळसूत्रही ठेवले; अखेर तरुण शेतकऱ्याने जीवन संपवले
4

कर्ज फेडण्यासाठी जमीन विकली, वावर गहाण अन् पत्नीचे मंगळसूत्रही ठेवले; अखेर तरुण शेतकऱ्याने जीवन संपवले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.