Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News: बांधावर महसूल-कृषी विभागाचे पंचनामे, पावसाअभावी खरीप पिके करपली; अमडापूर परिसरात सोयाबीनच्या पोकळ शेंगा

Buldhana crop damage panchnama: बुलढाणा तालुक्यात पावसाअभावी सोयाबीन आणि तूर पिकांचे मोठे नुकसान झाल्याने महसूल व कृषी विभागाने पीक नुकसानीचे सर्वेक्षण व पंचनामे सुरू केले आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 02, 2026 | 08:18 PM
Photo- Ai generated

Photo- Ai generated

Follow Us
Follow Us:
  • बुलढाण्यात शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
  • सोयाबीन-तुरीचे मोठे नुकसान
  • नुकसानीचे प्रत्यक्ष पंचनामे सुरू
बुलढाणा: पावसाने ओड दिल्याने खरीप हंगामातील सोयाबीन व तूर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महसूल व कृषी विभागाने बुधवारपासून तालुक्यात पीक नुकसानीचे सर्वेक्षण व पंचनामे सुरू केले आहेत. अमडापूर परिसरातील शेतांमध्ये प्रत्यक्ष पाहणी केली असता सोयाबीनच्या पोकळ शेंगा, खुंटलेली तूर आणि करपलेली पिके असे विदारक चित्र दिसून आले.

Washim: वाहन कायद्याची अंमलबजावणी करा, आरटीओ रवींद्र भुयार यांच्या सूचना; कार्यालयाच्या कामकाजाचा घेतला आढावा

पंचनामे प्रत्यक्ष शेताच्या बांधावर होतात को केवळ कागदोपत्री, याची पडताळणी करण्यासाठी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत अमडापूर परिसरातील विविध शेतांना भेट देण्यात आली. यावेळी अमडापूर भाग एकचे ग्राम महसूल अधिकारी गणेश खोडवे, भाग दोनचे राहुल जाधव, भाग तीनचे भूषण काळे, सहायक कृषी अधिकारी योगेश सरोदे व सुषमा गई, ग्रामपंचायत अधिकारी शरद काळे, उपसरपंच अजिस खा. बाचे खा. प्रशांत पाखरे, राम जाधव, गणेश माळोदे, राम देशमुख, मसुद भाई मेम्बर, अन्सार भाई, भागवत सोनुने, माधव धंदाळे, प्रताप कौसे आदी उपस्थित होते.पंचनाम्यामुळे नुकसानभरपाईची अपेक्षा हाताशी आलेला खरीप हंगाम पावसाअभावी वाया गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

सिंचन असूनही उत्पादनावर परिणाम

काही शेतक-यांकडे सिंचनाची सुविधा असल्याने त्यानी चिके कचविण्यासाठी प्रयत्न केले, त्यामुळे काही ठिकाणी पिके वरकरणी हिरवीगार दिसत असली तरी सोयाबीनच्या शैगामधील दाणे बारीक व कमकुवत आहेत, या क्षेत्रातून एकरी जास्तीत जास्त तीन पौली सोयाबीन उत्पादन मिळण्याचा अंदाज शेतक-यांनी व्यका केला. त्यातच रात्रीच्यावेळी कमी दाबाने होणारा वीजपुरवठा आणि वारंवार रोहित्रे जळायाच्या समस्येमुळे सिंचन करण्यातही अडथळे निर्माण झाले. परिणामी पाण्याची सुधिच्चा असतानाही अपेक्षित उत्पादन पेला आले नसल्याचे शेतक-यांनी सांगितले,

दोन हेक्टरवरील सोयाबीन करपले

अमडापूर भाग तीनमधील गट क्रमांक ११८५ मध्ये शेतकरी साहेबराव गवई यांनी दोन हेक्टर क्षेत्रात सोयाबीन व तुरीची पेरणी केली होती. मात्र पावसाअभावी सोयाबीनचे पीक पूर्णतः करपले आहे. उभ्या असलेल्या मोजक्या रोपांवरील शेंगांमध्ये दाणे भरलेले नसून केवळ शेंगांची पापडी उरली आहे. अशा परिस्थितीत पीक काढणीचा खर्चही निघणार नसल्याने सोंगणी करणे परवडणारे नाही. त्यामुळे या पिकावर नांगर फिरवण्याशिवाय पर्याय उरला नसल्याची व्यथा गवई यांनी व्यक्त केली.

५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

भाग दोनमधील गट क्रमांक २०११ मध्ये शेतकरी शाम बन्सी मानकर यांनी ५ हेक्टर १९ आर क्षेत्रात सोयाबीन व तुरीची लागवड केली होती. पावसाअभावी झालेल्या नुकसानीची माहिती देताना मानकर यांना अबू अनावर झाले. ‘साहेच, आमच्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचवा आणि नुकसानभरपाई मिळवून द्या.’ अशी आर्त मागणी त्यांनी केली.

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Web Title: Buldhana soybean tur crop damage panchnama amadapur farmers compensation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 08:18 PM

Topics:  

  • buldhana news
  • Crisis on farmers
  • Farmer Issue

संबंधित बातम्या

Buldhana: खरीप  ई- पीक पाहणी नोंदणीला प्रारंभ; १० नोव्हेंबरपर्यंत पीक पाहणी पूर्ण करा,जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
1

Buldhana: खरीप ई- पीक पाहणी नोंदणीला प्रारंभ; १० नोव्हेंबरपर्यंत पीक पाहणी पूर्ण करा,जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Buldhana: उद्योगपतींचे कर्ज माफ, मग शेतकऱ्यांचे पुनर्गठन का? खासदार अरविंद सावंत यांचा सवाल; दुष्काळ मदतीवरून शिवसेना आक्रमक
2

Buldhana: उद्योगपतींचे कर्ज माफ, मग शेतकऱ्यांचे पुनर्गठन का? खासदार अरविंद सावंत यांचा सवाल; दुष्काळ मदतीवरून शिवसेना आक्रमक

Maharashtra Drought: जावळीचा Trigger-1 मध्ये समावेश करा; दुष्काळी सवलतींसाठी शिवसेनेची मागणी
3

Maharashtra Drought: जावळीचा Trigger-1 मध्ये समावेश करा; दुष्काळी सवलतींसाठी शिवसेनेची मागणी

Buldhana: ३० टन कांद्याचा ट्रक पळवणारे गजाआड, ‘समृद्धी’वर चालकाला केली होती मारहाण; ट्रक अन् गुन्ह्यातील कार जप्त
4

Buldhana: ३० टन कांद्याचा ट्रक पळवणारे गजाआड, ‘समृद्धी’वर चालकाला केली होती मारहाण; ट्रक अन् गुन्ह्यातील कार जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.