Washim RTO News
वाशिम: नागरिकांना कार्यक्षम, पारदर्शक आणि कालबद्ध सेवा उपलब्ध करून देण्यासोवतच रस्ता सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी. मोटार वाहन कायदा आणि त्याअंतर्गत असलेल्या नियमांचे प्रभावी पालन सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचना प्रादेशिक परिवहन अधिकारी अकोला रवींद्र भुवार यांनी दिल्या. रवींद्र भुयार यांनी बुधवारी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, वाशिम येथे भेट देऊन कार्यालयीन कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी विविध विभागांची पाहणी करून नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा, प्रलंबित कामे, वाहन तपासणी तसेच मोटार वाहन कायद्याच्या अंमलबजावणीसंदभर्भातील कार्यवाहीची माहिती घेतली.
भेटीदरम्यान वायूवेग पथकाच्या कामगिरीचाही आढावा घेण्यात आला. रस्त्यांवर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर करण्यात येणारी कारवाई, वाहनांची तपासणी, कागदपत्रांची पडताळणी आणि रस्ता सुरक्षेशी संबंधित उपाययोजनांची माहिती त्यांनी घेतली. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक असून, नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.रस्ता अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक नियमांची अंमलबजावणी प्रभावीपणे होणे आवश्यक आहे. त्यासाठी वाहन तपासणी, चालकांची कागदपत्रे, वाहनांची स्थिती तसेच अन्य सुरक्षा निकषांकडे गांभीयनि लक्ष देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम, मोटार वाहन निरीक्षक अर्चना घनवट, गजानन हरणे, साधना दुधमाळे, रवींद्र विनकरे यांच्यासह कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ऑटोमेटेड फिटनेस सेंटरचाही आढावा ऑटोमेटेड फिटनेस सेंटरच्या कामकाजाचीही त्यांनी माहिती घेतली. वाहनांची योग्यता तपासणी अधिक प्रभावी, पारदर्शक आणि नियमबद्ध पद्धतीने राबविण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. रस्त्यावर धावणारी वाहने सुरक्षित स्थितीत असणे आवश्यक असून, वाहनांच्या फिटनेस तपासणीत कोणतीही तडजोड होऊ नये, याची दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
यानंतर रवींद्र भुयार यांनी ऑटोमैटिक ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅकच्या सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी केली. प्रकल्पाच्या प्रगतीची माहिती घेत त्यांनी कामाची सद्यस्थिती जाणून घेतली. ट्रॅकचे बांधकाम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासोबतच आवश्यक तांत्रिक निकष आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कामाची गुणवत्ता राखण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या. ऑटोमेटिक ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक कार्यान्वित झाल्यानंतर वाहनचालक परवाना प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि शिस्त येण्यास मदत होणार असल्याने प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.






