Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोळसा प्रकल्पग्रस्तांना मिळणार मोबदला? मुख्यमंत्र्यांकडून दखल; केंद्राकडे फेरविचाराचा प्रस्ताव सादर

Chandrapur Coal Projects Compensation : चंद्रपूरमधील कोळसा प्रकल्पांसाठी अधिग्रहित होणाऱ्या शेतजमिनीला योग्य मोबदला मिळावा, यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे फेरविचाराचा प्रस्ताव पाठवला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 20, 2026 | 06:38 PM
कोळसा प्रकल्पग्रस्तांना मिळणार मोबदला? मुख्यमंत्र्यांकडून दखल; केंद्राकडे फेरविचाराचा प्रस्ताव सादर
Follow Us
Follow Us:
  • कोळसा प्रकल्पग्रस्तांना मिळणार मोबदला?
  • मुख्यमंत्र्यांकडून दखल
  • केंद्राकडे फेरविचाराचा प्रस्ताव सादर
चंद्रपूर: कोळसा प्रकल्पांसाठी अधिग्रहित होणाऱ्या शेतजमिनीला योग्य आणि न्याय्य मोबदला मिळावा, यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या मागणीला आता महत्त्वाचे वळण मिळाले आहे. त्यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवून कोळसा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मोबदल्याचा फेरविचार करण्याची विनंती केली आहे. शेतकऱ्यांना प्रति एकर ३० लाख रुपये मोचदला देण्याची मागणी मुनगंटीवार यांनी केली असून, पात्र जमीनमालकांना रोजगार देण्याची मागणीही करण्यात आली.

Buldhana News: कर्जमुक्ती योजना; पालकमंत्र्यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा, नुकसानीचे पंचनामे अचूक व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश

आ. मुनगंटीवार यांनी ५ जून रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र देऊन वेस्टर्न कोलफिल लिमिटेडमार्फत अध्तिाहित होणाऱ्या कृषी जमिनीच्या मोबदल्यात सुधारणा करण्याची मागणी केली होती. सच्या लागू असलेले दर २०१२ मध्ये निश्चित करण्यात आले असून, त्यावेळच्या तुलनेत जमिनीच्या बाजारमूल्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे जुन्या दरांऐवजी सध्याच्या परिस्थितीशी सुसंगत मोबदला देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. २५ मे २०१२ रोजीच्या शासन निर्णयानुस्वर कोळसा खाणींसाठी अधिग्रहित होणाऱ्या – जमिनीला पडीत जमिनीस्खठी ६ लाख, जिरायती जमिनीसाठी ८ लाख आणि ओलित जमिनीसाठी १० लाख रुपये प्रति एकर असे दर निश्चित करण्यात आले होते. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यातील खासगी जमीन व्यवहारांमध्ये यापेक्षा मोठ्या रकमेचे व्यवहार होत असल्याने कोळसा प्रकल्पग्रस्तांना बाजारातील सद्यस्थितीचा विचार करून न्याय्य मोबदला मिळावा, अशी भूमिका मुनगंटीवार यांनी घेतली. दरम्यान, वणी परिसरातील कोलगाव विस्तार प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या जमिनीच्या पात्र जमीनमालकांना रोजगार देण्याची मागणीही त्यांनी २७ जून रोजी केली होती.

योग्य मोबदला मिळेपर्यंत पाठपुरावा सुरुच राहणार

मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शेतक-यांना प्रति एकर ३० लाख रुपये मोबदला देण्याचा मुद्दा आता केंद्र सरकारच्या स्तरावर पोहोचला आहे. त्यामुळे कोळसा प्रकल्पांसाठी जमीन गमावणाऱ्या शेतकऱ्याच्या मोबदल्याचा प्रश्न नव्याने धर्खेत आला असून, केंद्र सरकारच्या निर्णयाकडे प्रकल्पग्रस्तांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्र्यानी या मागणीची दखल घेत केंद्राकडे विषय मांडल्याबद्दल आ. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले. जमीनमालकांना योग्य मोबदला आणि पात्र कुटुंबीयांना रोजगार मिळेपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली.

Buldhana News: दोन कोटींचा ‘डिजीटल गंडा’; २ आरोपी अटकेत सायबर पोलिसांची कारवाई, ज्येष्ठाची फसवणुक प्रकरण

Web Title: Chandrapur coal project farmer compensation 30 lakh per acre

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 06:38 PM

Topics:  

  • buldhana news
  • CM Devendra Fadanvis
  • Sudhir Mungantiwar

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : २०२७ हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे वक्तव्य
1

Devendra Fadnavis : २०२७ हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे वक्तव्य

Buldhana: परतीच्या पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा, रखरखत्या उन्हात सोयाबीन काढणीला वेग; रब्बी पिकांसाठी महत्त्वाचे
2

Buldhana: परतीच्या पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा, रखरखत्या उन्हात सोयाबीन काढणीला वेग; रब्बी पिकांसाठी महत्त्वाचे

Buldhana PM Awas Yojana: ८४ हजार घरकुलांचे स्वप्न अधुरे! ३२४ कोटींचे अनुदान रखडले; हक्काच्या घराची प्रतीक्षा कधी संपणार?
3

Buldhana PM Awas Yojana: ८४ हजार घरकुलांचे स्वप्न अधुरे! ३२४ कोटींचे अनुदान रखडले; हक्काच्या घराची प्रतीक्षा कधी संपणार?

कर्ज फेडण्यासाठी जमीन विकली, वावर गहाण अन् पत्नीचे मंगळसूत्रही ठेवले; अखेर तरुण शेतकऱ्याने जीवन संपवले
4

कर्ज फेडण्यासाठी जमीन विकली, वावर गहाण अन् पत्नीचे मंगळसूत्रही ठेवले; अखेर तरुण शेतकऱ्याने जीवन संपवले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.