Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खामगावात ढगफुटीसदृश पाऊस; जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव, खामगाव तालुक्यांना फटका

Khamgaon Rain News: खामगावसह बुलढाणा जिल्ह्यात ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे नुकसान झाले असून शेती आणि वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 01, 2026 | 05:06 PM
खामगावात ढगफुटीसदृश पाऊस; जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव, खामगाव तालुक्यांना फटका
Follow Us
Follow Us:
  • खामगावात ढगफुटीसदृश पाऊस
  • जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव, खामगाव तालुक्यांना फटका
  • प्रशासनातर्फे मदतकार्य सुरू
खामगाव: गुरुवारपासून सुरू असलेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसाने अभूतपूर्व परिस्थिती निर्माण केली आहे. जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव आणि खामगाव तालुक्यांना या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. नद्या-नाल्यांना पूर आला असून रस्ते पाण्याखाली गेल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, शेतीचेही मोठे नुकसान झाले असून मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

मुख्यमंत्र्यांच्या शहरात वर्ल्ड क्लास कन्वेंशन सेंटर; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आणखी एक अनोखी भेट

शेगाव- मनसगाव वरवट संग्रामपूर –जळगाव जामोद हा महत्त्वाचा मुख्य रस्ता रात्री ३ वाजतापासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला. तसेच कालखेड येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. अनेक सखल भाग जलमय झाले असून प्रशासनाने पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. परिस्थितीची तीव्रता लक्षात घेऊन महसूल, पोलिस, आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक प्रशासनाने बचावकार्य हाती घेतले आहे. पूरग्रस्त भागातील २०० ते ३०० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून त्यांच्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे.

प्रशासनातर्फे मदतकार्य सुरू

प्रशासनाने जिल्ह्यातील पूरग्रस्त भागावर सतत लक्ष ठेवले असून मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. नुकसानग्रस्तांचे पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत, अन्नधान्य, निवारा आणि इतर जीवनावश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. हवामान विभागाने पुढील काही तासही मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने प्रशासनाने नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

खामगावात १४६ मिमी पाऊस

बाजार समितीच्या पर्जन्यमापन केंद्रात १४६ मिमी पावसाची विक्रमी नोंद झाली असून गत ७० वर्षांतील सर्व विक्रम मोडीत निघाल्याचा दावा करण्यात येत आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भाग जलमय झाले, नदी-नाल्यांना पूर आला आणि जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून बचाव व मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

शेगावात भिंत कोसळून वृद्धा ठार

शेगाव शहरातील फुलेनगर परिसरात घराची भिंत कोसळून सरस्वतीबाई गोटीराम पल्हाडे (८६) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री ९.२० वाजता त्यांच्या राहत्या घरी घडली. घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून प्रशासनाने पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

सोयाबीन, कापूस, तूर पिकांचे नुकसान

खामगाव तालुक्यातील सुटाळा येथे पुराच्या पाण्यात जनावरे वाहून गेल्याची घटना घडली. अनेक शेतांमध्ये पाणी साचल्याने सोयाबीन, कापूस, तूर व व इतर खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. अन्नधान्य, कपडे, घरगुती साहित्य आणि व्यापाऱ्यांच्या दुकानांतील मालाचे मोठे नुकसान झाले आहे. काही भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला असून मोबाईल नेटवर्कवरही परिणाम झाला आहे.

शेतकरी कर्जमुक्ती योजना; शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण करा,जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांचे निर्देश

Web Title: Khamgaon heavy rain flood buldhana maharashtra 146 mm rain update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 05:06 PM

Topics:  

  • buldhana news
  • Khamgaon News
  • maharashtra rain news

संबंधित बातम्या

Buldhana News: सोयाबीनची झाडे फेकले जिल्हा कचेरीपुढे, शेतकरी संघटनेचा एल्गार; हेक्टरी १ लाखाच्या नुकसानभरपाईची मागणी
1

Buldhana News: सोयाबीनची झाडे फेकले जिल्हा कचेरीपुढे, शेतकरी संघटनेचा एल्गार; हेक्टरी १ लाखाच्या नुकसानभरपाईची मागणी

दुष्काळसदृश यादीत बुलढाण्याचा समावेश करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची विनंती
2

दुष्काळसदृश यादीत बुलढाण्याचा समावेश करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची विनंती

Buldhana News: १३ लाख ज्येष्ठांना ‘अमृत’ लाभ; मोफत प्रवासामुळे ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर हसू फुलले
3

Buldhana News: १३ लाख ज्येष्ठांना ‘अमृत’ लाभ; मोफत प्रवासामुळे ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर हसू फुलले

Buldhana News: कोवळ्या पिकावर वन्यप्राण्यांचा ताव; पिकाच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांची रखवाली,  संकटात आणखी भर
4

Buldhana News: कोवळ्या पिकावर वन्यप्राण्यांचा ताव; पिकाच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांची रखवाली, संकटात आणखी भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.