दादर नामांतर मुद्द्यावरून पुण्यात आठवले गटाचे आंदोलन (फोटो - टीम नवराष्ट्र)
Dadar name change : पुणे प्रतिनिधी : पुणे शहरात आरपीआय आठवले गटाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये आज (दि.१९ नोव्हेंबर) आंदोलन करण्यात आले आहे. पुणे शहरातील बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे आंदोलन करण्यात आले. दादर रेल्वे स्टेशनला चैत्यभूमी असे नाव देण्याची घोषणा करण्यात आली असा निर्णय देखील मुख्यमंत्र्यांसमोर घेण्यात आला बैठक झाली परंतु शिंदे सेनेच्या एका आमदाराने त्याला विरोध केल्यामुळे आणि मनसेच्या विरोधामुळे दहा मिनिटांमध्ये मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेच्या दबावाला बळी पडून बाबासाहेब आंबेडकरांचे नाव हे मेट्रो रेल्वे स्टेशनला द्यायचा असा निर्णय घेतला परंतु आंबेडकरी जनतेचा रोष उफळून आला.
संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात आले जरी आम्ही सत्तेमध्ये असेल तरी बाबासाहेब आंबेडकरांचे विरोधात कुठलाही निर्णय झाला तर अशा पदाला आम्ही जुमानत नसून त्यावर आम्ही थुंकतो अशी प्रतिक्रिया पुणे शहर अध्यक्ष संजय सोनवणे यांनी दिली. त्यावेळी बोलताना महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव म्हणाले, “यापुढे बाबासाहेबांचा अवमान सहन केला जाणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन केले जाईल याची दखल सरकारने घ्यावी. येत्या सहा डिसेंबर पर्यंत जर हा निर्णय नाही बदलला तर संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन केले जाईल हे लक्षात घ्यावं.”
“एकनाथ शिंदे आणि मनसेच्या दबावाला बळी पडून तुम्ही जर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत असाल तर याद राखा असा दम देखील आंबेडकरी जनतेतील महिला वर्गाने दिला आहे. प्रत्येक वेळी बाबासाहेबाचं नाव आल्यानंतर तुम्हाला व तुमच्या बुडाला आग लागते का अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी दिली. त्यावेळी श्याम सदाफुले, अर्जुन आल्हाट, सुनील गवळी, क्रिस्टोपर राजमनी, संतोष आरडे, लिंबा कावरे, चांदणी गायकवाड, डोरथी थॉमस, महीपाल वाघमारे, रामभाऊ कर्वे, बाबुराव घाडगे, मोहन जगताप, संतोष खरात, हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष विनोद टोपे, अविनाश कदम या सर्व आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी हजेरी लावली होती सूत्रसंचालन शाम सदाफुले यांनी केलं होतं.
दादर नामांतर प्रकरण
दादर नामांतर प्रकरणात संभ्रम निर्माण होण्यामागे डीजीआरपीआरने 18 नोव्हेंबर रोजी जारी केलेले प्रसिद्धीपत्रक कारणीभूत ठरले. या प्रसिद्धीपत्रकात दादर रेल्वे स्थानकाचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून चैत्यभूमी केले जाणार असल्याचा समज सर्वत्र पसरला. त्यानंतर या निर्णयावर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या. मात्र, आता प्रत्यक्षात दादर रेल्वे स्थानकाऐवजी दादर मेट्रो स्थानकाच्या नामांतराचा प्रस्ताव असल्याचे स्पष्ट होत आहे.






