Sangrampur Fake Currency Notes
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एका संशयित चारचाकी वाहनाची तपासणी करण्यात आली. यावेळी वाहनातील व्यक्तींकडे भारतीय चलनाच्या ५०० रुपयांच्या तीन नोटा आढळून आल्या. त्याचबरोबर भारतीय बच्चों का बैंक पाँच सी’ असा उल्लेख असलेल्या कागदी नोटांचे १६ बंडलही आढळले, पोलिसांनी भारतीय चलनाच्या तीन ५०० रुपयांच्या नोटांची किंमत १ हजार ५०० रुपये, कागदी नोटांच्या १६ बंडलांची किंमत ८०० रुपये आणि पांढऱ्या रंगाची एमपी ०९/ बीएल-४९१० क्रमांकाची कार, असा एकूण ४ लाख २ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक गजानन देविदास शिंदे यांच्या फिर्यादीवरून तामगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात हुसेन अब्बास मिर्झा (३५, रा. टुनकी, ता. संग्रामपूर), हरर्जीदर सिंह देवेंद्रसिंह कपूर (५०, रा. सनावद, जि. खरगोन, मध्य प्रदेश), संजय बावरिया सिटोले (३२, रा. रमाणा, ता. बड़वा, जि. खरगोन) आणि लोकेंद्रसिंह बलवंतसिंह सोलंकी (६२, रा. सनावद, जि. खरगोन) यांचा समावेश आहे.
Washim News: पैसे कमावण्याचा उद्देश, अश्लील क्यूआर; तिघांना अटक, एलसीबी अन् वाशिम पोलिसांची कारवाई






