
Divyang Monthly Pending Pension
सामाजिक न्याय विभागाकडून सर्व दिव्यांग लाभार्थ्यांचा डेटा आता स्वतंत्र दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या नवीन डिजीटल प्रणालीवर वर्ग केला जात आहे. या तांत्रिक बदलांमुळे अनेक महिने मानधनाची प्रणाली जनरेट होण्यास विलंब झाला. तसेच तात्पुरते अपंगत्व प्रमाणपत्र असलेल्या किंवा ज्यांचे यूडीआयडी कार्डची मुदत संपल्यामुळे ब्लॉक झाले होते. अशा लाभार्थ्यांची नावे पडताळणीसाठी तात्पुरती थांबवली गेली होती. परिणामी दिव्यांगाचे – मानधन गेल्या काही महीन्यापासून बंद होते. हे बंद झालेले मानधन सुरू करण्यासंदर्भात शिवसेनेचे आ. बच्चू कडू यांनी पाठपुरावा केला. मात्र, तरी देखील ऑगस्ट अखेरपर्यंत वाशिम जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांचे मानधन पुर्वरत सुरू झाले नाही. आ. भावना गवळी यांनी वाशिम येथे शुक्रवारी आयोजित केलेल्या जनता दरबारात दिव्यांग बांधवांनी मानधन बंद असल्यामुळे येत असलेल्या अडीअडचणी मांडल्या. यावेळी आ. गवळी यांनी अपंगाच्या मागणीसाठी पाठपुरावा करत त्यांना लवकरच मानधन मिळणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाने जारी केलेल्या निर्णयानुसार, जर आपल्याकडे सक्षम वैद्यकीय प्राधिकाऱ्याने दिलेले वैघ तात्पुरते अपंगत्व प्रमाणपत्र किवा यूडीआयडी कार्ड असेल, तर विशेष सहाय्य योजनांचे लाभ आणि मानधन अडवले जाणार नाही, ते सुरूच राहील. मात्र, जर तुमच्या तात्पुरत्या प्रमाणपत्राची मुदत संपली तर तुमचे मानधन बंद होऊ शकते. अशावेळी तुम्हाला मुदत संपण्यापूर्वी स्वावलंबन कार्ड पोर्टलवर जाऊन किंवा सरकारी रुग्णालयात प्रमाणपत्राचे नूतनीकरण करून घेणे आवश्यक आहे.