
Washim Drought Crop Loss News
जिल्ह्यात तब्बल ४५ दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिके पूर्णपणे करपून गेली आहेत. यामुळे जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने सोमवारी शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले. यावेळी शिवसेना पक्षाचे आमदार व उपनेते नितीन बापू देशमुख, जिल्हाप्रमुख बालाजी वानखेडे, डॉ. सुधीर कव्हर, डॉ. सिद्धार्थ देवळे, गजानन देशमुख, आणि प्रशांत सुर्वे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेनेच्यावतीने वाशिम जिल्ह्यात तत्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५० हजार रुपयांची मदत देण्यात यावी, जिल्ह्यातील – परिस्थितीचे तत्काळ पंचनामे करून जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त म्हणून घोषित – करण्यात यावा, मागील वर्षीच्या पीकविमा – योजनेतील चार ट्रिगर पूर्ववत करण्यात यावेत व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना – नियमानुसार विमा भरपाई द्यावी.
यावेळी शिवसेना (उबाठा) पक्षाचे आमदार व उपनेते नितीन बापू देशमुख, वाशिम जिल्हाप्रमुख बालाजी वानखेडे, जिल्हासह संपर्क प्रमुख डॉ. सुधीर कव्हर, जिल्हा समन्वयक डॉ. सिद्धार्थ देवळे, जिल्हा संघटक गजानन देशमुख, आणि लोकसभा संघटक सुर्वे यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी च शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासनाने या मागण्यांवर तातडीने व गांभीर्यान विचार करून सकारात्मक निर्णय न घेतल्यास तीव्र आदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला, शेतकरी जनआक्रोश मोर्चा जिल्ह्यातील शेतक-यांनी उत्स्फूत प्रतिसाद मोठ्हा संख्येने सहभाग घेतला, शिवसेना पदाधिका-यांनी बैलगाडीवर बसून मोर्चाचे नेतृत्व केले.
Washim News: पैसे कमावण्याचा उद्देश, अश्लील क्यूआर; तिघांना अटक, एलसीबी अन् वाशिम पोलिसांची कारवाई