Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim News: ‘मत वाचवा, देश वाचवा!’ वाशिममध्ये महाविकास आघाडीचे आंदोलन, निवडणूक आयोगाविरोधात एल्गार

Washim Maha Vikas Aghadi Protest: वाशिममध्ये जिल्हा महाविकास आघाडीच्या वतीने ‘मत वाचवा, देश वाचवा’ अभियानांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत दुचाकी मोर्चा काढण्यात आला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 09, 2026 | 07:31 PM
Washim Maha Vikas Aghadi Protest

Washim Maha Vikas Aghadi Protest

Follow Us
Follow Us:
  • मतदान प्रक्रियेवरून राजकीय वातावरण तापले
  • वाशिममध्ये महाविकास आघाडी आक्रमक
  • आयोगाविरोधात विरोधकांचा मोर्चा
वाशिम: जिल्हा महाविकास आघाडीच्यावतीने राजुभाऊ चौधरी वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष यांच्या पुढाकाराने गुरुवारी दुपारी १ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथुन वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत दुचाकी मोर्चा काढण्यात आला. सदरचा कार्यक्रम हा महाराष्ट्र प्रदेश कतीस कमिटीकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्याविरोधात तात्काळ कार्यवाही करून अटक करण्यासाठी शुक्रवार ते गुरुवारदरम्यान जिल्हास्तरावर ‘लोकग्रही वाचवा सप्ताह’ आणि ‘मत वाचवा देश वाचवा मोर्चा जिल्ह्यातील समविचारी पक्षांना सोबत घेऊन भव्य मोर्चा काढण्यात आला.

बुलढाण्यात वर्षभरात ६६ बालक, १० मातांचा मृत्यू; प्रमाण चिंताजनक; आरोग्य यंत्रणेपुढील आव्हाने कायम

मोर्चातून ज्ञानेशकुमार हटाव देश बचाव, एसआयआर रद्द करा, अशा घोषणा देण्यात आल्या. तर वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाविकास आघाडीच्यावतीने सर्व पक्षाच्या संयुक्त सह्याचे निवेदन देण्यात आले. ज्ञानेश कुमारच्या पुतळ्यास जोडे मारण्यात आले व पायदळी तुडवून निषेध करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रगीत घेऊन या मोचांचा समारोप करण्यात आला. यावेळी मोर्चात काँग्रेस वाशिम जिल्हाध्यक्ष राजू चौधरी, उथाठा जिल्हाप्रमुख बालाजी वानखेडे, राकाँ शहराध्यक्ष अमित खडसे, मनसे जिल्हाध्यक्ष राजू किडसे, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष गजानन भोयर, जनता पार्टी समन्वयक गजानन धामणे, आप प्रकाश कांबळे, अॅड. दिलीपराव सरनाईक, डॉ. सिद्धार्थ देवळे, गजानन देशमुख वडजीकर, सुधीर कव्हर, किसनराव मस्के, कॅप्टन प्रशांत सुर्वे, राजू भांदुर्गे, एससी सेल जिल्हाध्यक्ष मनीष भालेराव आदी उपस्थित होते. संचालन जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उज्ज्वल देशमुख यांनी केले, तर आभार सचिव सुरेश रत्नपारखी यांनी मानले.

काँग्रेसच्या आंदोलनाने बुलढाणा दणाणले

निवडणूक आयोगाने चोरी आणि देशद्रोह केल्याचे सिद्ध झाले असतानाही दिल्लीश्वर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे संरक्षण करत आहे. याविरोधात मोठ्या संख्येने खासदार निवडणूक आयोगाविरोधात एकवटले असताना काँग्रेस नेते राहुल गांधींना ज्याप्रकारे पोलिसांनी अटक केली, ती अत्यंत क्लेशदायक आणि लोकशाहीला काळिमा फासणारी घटना आहे. संघ आणि भाजपचा कुटील डाव आता सर्वांसमोर आला. भ्रष्टाचारासाठी आणि स्वतःचे हित साधण्यासाठी संस्थांचा वापर केला जात असून, संविधानिक संस्था उद्धवस्त करण्याचा अधिकार राज्यकत्यांना कुणी दिला? असा संतप्त सवाल करीत ज्ञानेश्वर कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. बुलढाणा येथे गुरुवारी बुलढाणा जिल्हा काँग्रेसच्या वतीने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्ध सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही बचाव आंदोलन करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते.

वाशिममधील २९१ ‘शून्य निपुण’ शाळांवर विशेष लक्ष; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश, प्रभावी उपाययोजनांसाठी जिल्हा सुकाणू समितीची सभा

Web Title: Washim maha vikas aghadi mat vachva desh vachva protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 07:31 PM

Topics:  

  • buldhana news
  • Congress
  • Gyanesh Kumar

संबंधित बातम्या

Delhi Protest : ‘घाबरलेला माणूस आज नाहीतर उद्या मरेल’, खर्गेंचा केंद्रावर निशाणा, दिल्ली मेट्रो-रेल्वे निर्बंधांवरून राजकारण तापलं
1

Delhi Protest : ‘घाबरलेला माणूस आज नाहीतर उद्या मरेल’, खर्गेंचा केंद्रावर निशाणा, दिल्ली मेट्रो-रेल्वे निर्बंधांवरून राजकारण तापलं

Ravindra Chavan : ‘सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण’; रविंद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर निशाणा
2

Ravindra Chavan : ‘सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण’; रविंद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर निशाणा

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याचा मुद्दा आता थेट राष्ट्रपती भवनात! राहुल गांधी, ममता बॅनर्जींसह इतर खासदार घेणार राष्ट्रपतींची भेट
3

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याचा मुद्दा आता थेट राष्ट्रपती भवनात! राहुल गांधी, ममता बॅनर्जींसह इतर खासदार घेणार राष्ट्रपतींची भेट

बुलढाण्यात वर्षभरात  ६६ बालक, १० मातांचा मृत्यू; प्रमाण चिंताजनक; आरोग्य यंत्रणेपुढील आव्हाने कायम
4

बुलढाण्यात वर्षभरात ६६ बालक, १० मातांचा मृत्यू; प्रमाण चिंताजनक; आरोग्य यंत्रणेपुढील आव्हाने कायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.