Buldhana health department report
Washim: आठवड्यात दोनवेळा पाणीपुरवठा करा, तंटामुक्त समिती अध्यक्षांचे ग्रामपंचायतला निवेदन
दुसरीकडे, जिल्ह्यात १० मातांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामध्ये प्रसूतीनंतर होणारा तीव रक्तस्त्राव हे ५ मातांच्या मृत्यूचे सर्वात मोठे कारण ठरले, तर ३ मातांचा मृत्यू इतर गंभीर आजारांमुळे आणि उर्वरित प्रकरणांमध्ये संसर्ग व प्रसूतीपूर्व रक्तस्त्रावामुळे झाला आहे. विशेष म्हणजे, ४ मातांचा मृत्यू उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना प्रवासादरम्यान झाला असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले.
आरोग्य यंत्रणेकडून उपाययोजनांवर भर हे मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून विशेष प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. गरोदर मातांमधील कुपोषण आणि रक्तक्षय रोखण्यासाठी प्रथिनयुक्त आहार, औषधोपचार आणि नियमित तपासण्यांवर भर दिला जात आहे. तसेच, १०२ व १०८ आपत्कालीन रुग्णवाहिकांचा वापर वेळेवर करणे, प्रसूती कक्षातील कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देणे आणि स्त्री रुग्णालय बुलढाणा येथे (विशेष नवजात काळजी कक्ष) स्थापन करण्यात आले.
बुलढाण्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी, रणजीत मंडाले म्हणाले की, गतवर्षी आणि यावर्षीच्या तुलनेत ६६ बालमायूचे प्रमाण है. राज्य आणि देशातील सरासरी बालमृत्यूच्या प्रमाणात कमी आहे. जिल्हयातील हा बाल मृत्यु दर आणखी कमी होण्यासाठी आरोग्य विभागांकडून विविध उपाय योजना राबविण्यात येत आहेत.
बालमृत्यूंमागे मुख्यत्वे मुदतपूर्व जन्म, कमी वजन, जन्मतः गुदमरणे, जन्मजात व्यंग, जन्माला विलंब होणे, रक्तातील संसर्ग ही कारणे प्रामुख्याने आढळून येत आहेत.
Buldhana: सोयाबीन काढणीला वेग; मध्य प्रदेशातून हजारो मजूर दाखल, स्थानिक मजुरांसमोर रोजगाराचा प्रश्न






