
Cabinet ministers political leaders expressed grief over the death of DCM Ajit Pawar.
Ajit Pawar Passed Away : पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे अपघाती निधन झाले आहे. बारामतीमध्ये विमान लॅंडिंगवेळी अजित पवार यांच्या विमानाचा बारामतीमध्ये अपघात झाला. आज सकाळी 9 ते 9.15 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असल्याचे समोर आले आहे. बारामतीमध्ये लॅंडिंगदरम्यान अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला असून यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. अजित पवार यांच्या अकाली मृत्यूवर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे.
अजित पवार यांच्या दुर्दैवी मृत्यूवर मंत्री जयकुमार रावल यांची प्रतिक्रिया दिली आहेय. ते म्हणाले की, “महाराष्ट्रात उंच, कर्तव्यदक्ष आणि रोखठोक नेतृत्व असलेल्या व्यक्तिमत्व आपल्यात नाही यावर विश्वास बसत नाही.. कालच कॅबिनेटच्या बैठकीत अजित दादांसोबत चर्चा झाली माझ्या पणन खात्याचा विषय कॅबिनेटमध्ये घेतला असता त्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली. राजकारणातील कर्ता नेता आपल्यात नाही हा विश्वास बसत नाही,” असं म्हणत जयकुमार रावल यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
हे देखील वाचा : प्रशासनावर वचक, राजकारणातही दबदबा…! असा होता महाराष्ट्राच्या राजकारणातला ताकदवान चेहरा
मंत्री भरत गोगावले म्हणाले की, “विमान अपघाताची बातमी अत्यंत धक्कादायक आणि दुःखद आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. आदरणीय अजितदादा पवार हे निर्भीड व्यक्तिमत्त्व आणि स्पष्ट वक्ता म्हणून ओळखले जात होते. जनतेच्या प्रश्नांसाठी ते कायम ठामपणे उभे राहत. रायगड जिल्हा, माझा मतदारसंघ आणि तमाम जनतेच्या वतीने या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त करतो. अशी दुर्दैवी घटना कुणाच्याही आयुष्यात येऊ नये, मात्र विधिलिखित टाळता येत नाही. या घटनेत बाधित झालेल्या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करतो,” असे भरत गोगावले म्हणाले आहेत.
हे देखील वाचा : अजित पवारांचे विमान ‘मृत्यूचा सापळा’, याच Chartered Plane ने जगभरात झालेत 200 अपघात; तरीही वापर सुरूच
त्याचबरोबर वैभव नाईक यांनी देखील अजित पवार यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, “महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत समोर आलेल्या धक्कादायक घटनेनंतर वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार हे अत्यंत कर्तव्यनिष्ठ आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले नेते होते. सामान्यांच्या प्रश्नांची त्यांना चांगली जाण होती. मी जवळपास दहा वर्षे त्यांच्यासोबत विधानसभेत काम केले आहे. विधानसभेत तसेच विधानसभेबाहेर त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मला मिळाली. या घटनेत माझे कुटुंबीय आणि शिवसेना पक्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने भावना व्यक्त करतो,” असे वैभव नाईक म्हणाले आहेत.