Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशात पुन्हा गोध्रा व मणिपूर प्रकरणे घडण्याची शक्यता ; अॅड प्रकाश आंबेडकर यांचा साताऱ्यात गंभीर आरोप

  • By Aparna
Updated On: Oct 08, 2023 | 03:28 PM
देशात पुन्हा गोध्रा व मणिपूर प्रकरणे घडण्याची शक्यता ; अॅड प्रकाश आंबेडकर यांचा साताऱ्यात गंभीर आरोप
Follow Us
Follow Us:

सातारा : आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिटलरने केले ते सगळे करण्याची शक्यता आहेत. दिवाळीपूर्वी अटकसत्र सुरु होणार असून, ते निवडणुकीपर्यंत राहिल. गोध्रा हत्याकांड, मणिपूर दंगल घडली त्याप्रमाणे पुन्हा घडण्याची शक्यता आहे, असा गंभीर आरोप ‘वंचित’चे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. ‘इंडिया’मध्ये दुफळी असून, त्याचा फायदा नरेंद्र मोदी यांनी घेतल्याचे त्यांनी सांगितले .

सर्वांनाच स्वतंत्र निवडणूका लढवण्यास भाग पाडतील, असेही ॲड. आंबेडकरांनी सूचित केले. संविधान जनजागृती विचारमंचतर्फे ॲड. प्रकाश आंबेडकर यांची येथे सभेचे आयोजन केले आहे. त्यानिमित्त येथे आले असता त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, २०२४ च्या लोकसभा निवडणूक जिंकावी, यासाठी नरेंद्र मोदी हे हिटलरने जे केले तेच करणार आहेत. जो विरोधात जाईल त्याचा आवाज दाबला जाईल. देशातील पाच हिंदू मंदिरांवर कारवाया करण्याचे प्रयत्न सुरु होते. त्यासाठी मिलिटरीच्या ताब्यात द्यावी, अशी मागणी मी केली. तेथे बॉम्ब फोडून हिंदू- मुस्लिम दंगल घडवण्याचा प्रयत्न होता. मात्र, तो बॉम्ब निशस्त्र केला. सध्या मुस्लिम घरात हिंदू मुलगी, हिंदू घरात मुस्लिम मुलगी आहे का, याचा शोध आरएसएस घेत आहेत. प्रेम विवाह न राहता ते आता धार्मिक विवाह झाला आहेत. लोकांची डोकी भडकवण्याची राजकीय खेळी सुरु आहेत.

गलवान खोऱ्यात भारतीय आणि चीन सैन्य भिडले तेव्हाच चीनमधून पैसे येवून देशविरोधी कारवया केल्या जात होत्या. युध्द सुरु असताना कोणता निधी येत होता, याचा खुलासा नरेंद्र मोदी यांनी करावा. तो न्यायालयात सिध्द होईल की नाही, हा वेगळा भाग आहे, असेही आंबेडकरांनी सांगितले.

आंबेडकर म्हणाले, ‘इंडिया’ आघाडी शेवटपर्यंत टिकावी, ही अपेक्षा आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि आमच्यावर कोणत्याही चौकशी नाहीत. त्यामुळे आम्ही बेधडक भूमिका घेत आहोत. ‘इंडिया’च्या बैठकीत खा. राहूल गांधी यांनी अदाणीमुळे अर्थव्यवस्था धोक्यात आहे, अशी भूमिका मांडली. राष्ट्रवादी त्या भूमिकेबरोबर आहे, असे दिसत नाही. त्याबाबत अधिकृत निर्णय होणे आवश्यक आहे. अन्यथा त्याचा मोठा फायदा नरेंद्र मोदी घेतली. ‘इंडिया’ने ‘वंचित’ला घेतले नाही, तर मोदी ‘इंडिया’ला संपवतील.

राज्यात खासगीकरण सुरू झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदेही कंत्राटी पद्धतीने भरावीत. बेरोजगारासाठी रोजगार देण्यासाठी शासनाकडे योजना नाही. कंत्राटी कर्मचारी भरले आहेत. लोकसभा आणि विधानसभेत ‘वंचित’ला सत्ता मिळाल्यास कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी कर्मचारी करणार आहे. ग्रामसेवक पदभरतीत टीसीआय कंपनीने १२० कोटींचा नफा कमवला. राज्यातील शासकीय भरती प्रक्रिया एमपीएससीमार्फत राबविली पाहिजे. हे चोरांचे राज्य आहे. कंत्राटी पध्दतीला घटनेने वाव दिला नाही. कंत्राटदार कामगारांना दिला जाणारा पगार बेकायदेशीरपणे दिला जात आहे. राज्यात खासगीकरण सुरू झाले आहे. एकनाथ, अजितदादा आणि फडणवीस यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे कंत्राटी पद्धतीने भरावीत, अशी टीका आंबेडकरांनी केली.

नांदेड येथील घटना दुर्दैवी आहे. अधिकाऱ्यांवर कारवाई करणार नाहीत. अधिकारी, लोकप्रतिनिधी, मंत्र्यांमध्ये मिलीभगत आहेत. भ्रष्ट आमदार व खासदारांना बदलून नवी पिढी आली पाहिजे, असेही ते म्हणाले.

सनातन धर्माविरोधात समाजामध्ये प्रचंड मोठी लाट आहे. महाराष्ट्रात सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर भागात ब्राह्मणविरोधी मोहिम सुरु झाली होती. सनातन धर्मात शुद्रता, अतिशुद्रता का आहे, हे जाहीर करावे. हिंदू धर्मातील वारकरी संप्रदाय सनातनविरोधात आहे, असा आरोपही त्यांनी केला.

नांदेड येथील घटना दुर्दैवी आहे. अधिकाऱ्यांवर कारवाई करणार नाहीत. मिलीभगत आहेत. भ्रष्ट आमदार व खासदार नवीन लॉट येऊद्या. परिस्थिती गलिच्छ सुरू आहे. ठेकेदार, आमदार, मंत्री यांच्यात मिलीभगत आहे, असा आरोप आंबेडकरांनी केला.

मोदी हुशार आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्र घेवून एकनाथ शिंदे, फडणवीस, अजित पवार यांना आपल्याबरोबर जोडून घेणार नाहीत, असे सांगत त्यांनी एकत्रित निवडणुकीचा मुद्दा फेटाळला. दरम्यान, साताऱ्यातील भिमाई स्मारक रखडलेले आहे. ते करण्याची सरकारची मानसिकता नाही. त्यामुळे काही मुद्दे हाती न घेण्याचे आम्ही ठरविले असल्याची कबुलीही आंबेडकरांनी दिली.

आंबेडकर म्हणाले…

कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी करणार

सीएम, डीसीएम पदे कंत्राटी भरावीत

वारकरी संप्रदाय सनातन धर्माच्या विरोधात

एमआयएमला दरवाजे बंद; सर्वात मुर्ख पक्ष

ठेकेदार, आमदार, मंत्री यांच्यात मिलीभगत

कोण बावनकुळे? सोनिया गांधी त्यांचे ऐकतात का?

आरक्षण हे सरकारला धोकादायक होणार आहे

Web Title: Chances of godhra and manipur cases happening again in the country adv prakash ambedkar serious allegations in satara nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2023 | 03:28 PM

Topics:  

  • Adv Prakash Ambedkar
  • Adv Prakash Ambedkar news
  • maharashtra
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
1

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Mhaswad Accident News: म्हसवड–शिंगणापूर मार्गावर अपघाताचा थरार! दोन कारची समोरासमोर धडक, सहा जखमी; धोकादायक वळण पुन्हा चर्चेत
2

Mhaswad Accident News: म्हसवड–शिंगणापूर मार्गावर अपघाताचा थरार! दोन कारची समोरासमोर धडक, सहा जखमी; धोकादायक वळण पुन्हा चर्चेत

Prakash Ambedkar Urges : दलित,ओबीसी आणि आदिवासींच्या अस्तित्वासाठी स्वतःचे मीडिया उभारा; अँड.प्रकाश आंबेडकर
3

Prakash Ambedkar Urges : दलित,ओबीसी आणि आदिवासींच्या अस्तित्वासाठी स्वतःचे मीडिया उभारा; अँड.प्रकाश आंबेडकर

Gondiya News: गोंदियात ६२१ सर्वजनिक दुर्गामूर्तीची स्थापना! गरबा-दांडियाचा उत्साह; नवरात्रोत्सवासाठी पोलिसांचा बंदोबस्त
4

Gondiya News: गोंदियात ६२१ सर्वजनिक दुर्गामूर्तीची स्थापना! गरबा-दांडियाचा उत्साह; नवरात्रोत्सवासाठी पोलिसांचा बंदोबस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.