Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: अग्निवीर भरतीसाठी बल्लारपूर सज्ज; तीन राज्यांतील उमेदवारांची गर्दी, प्रशासनाकडून जय्यत तयारी

२ ते १७ ऑक्टोबर दरम्यान बल्लारपूर येथील तालुका क्रीडा संकुलात अग्निवीर सैन्य भरती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी भरतीच्या तयारी संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 09, 2026 | 03:10 PM
Chandrapur News: अग्निवीर भरतीसाठी बल्लारपूर सज्ज; तीन राज्यांतील उमेदवारांची गर्दी, प्रशासनाकडून जय्यत तयारी

Chandrapur News: अग्निवीर भरतीसाठी बल्लारपूर सज्ज; तीन राज्यांतील उमेदवारांची गर्दी, प्रशासनाकडून जय्यत तयारी

Follow Us
Follow Us:
  • बल्लारपूरमध्ये २ ते १७ ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्यातील उमेदवारांसाठी अग्निवीर भरती रॅली होणार आहे.
  • उमेदवारांसाठी वाहतूक, स्वच्छतागृहे, खाद्यपदार्थांचे स्टॉल, वीजपुरवठा आणि सुरक्षा व्यवस्थेची तयारी करण्यात येत आहे.
  • आरोग्यसेवेसाठी रुग्णवाहिका, डॉक्टरांचे पथक आणि प्रथमोपचाराची व्यवस्था केली जाणार असून कागदपत्र पडताळणीसाठी शिक्षकांची नियुक्ती होणार आहे.
बल्लारपूर: महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या तीन राज्यांतील उमेदवारांसाठी बल्लारपूर येथील तालुका क्रीडा संकुलात २ ते १७ ऑक्टोबर दरम्यान अग्निवीर सैन्य भरती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. भरतीसाठी मोठ्या संख्येने उमेदवार येण्याची शक्यता असल्याने त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व विभागांच्या समन्वयातून सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी दिल्या.

Chandrapur News: विहिरींची कामे पूर्ण करूनही अनुदानाची प्रतीक्षा; ग्रामपंचायतीला निधी मिळाला, पण शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नाही

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी भरतीच्या तयारी संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी डॉ. व्यवहारे यांनी संबंधित विभागांना विविध जबाबदाऱ्या सोपवून कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम, विद्युत विभाग, पोलिस आणि राज्य परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी क्रीडा संकुलाची संयुक्त पाहणी करून आवश्यक कामांचे नियोजन करावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्ती व विद्युतीकरणाची कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश देण्यात आले.  (फोटो सौजन्य – AI Created) 

उमेद व माविमच्या बचत गटांच्या माध्यमातून स्टेडियमबाहेरील जागेत उमेदवारांसाठी सशुल्क खाद्यपदार्थ व आवश्यक वस्तूंचे स्टॉल उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेला देण्यात आली. पोलिस विभागाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच उमेदवारांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ तैनात करावे, असे सांगण्यात आले.

क्रीडा संकुल परिसरातील गवत व झुडपे हटवून स्वच्छता राखणे, पुरेशा स्वच्छतागृहांची व्यवस्था करणे, उमेदवारांच्या ने-आणीसाठी बसेस उपलब्ध करून देणे तसेच भरतीच्या काळात अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी शुभम दांडेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके, बल्लारपूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. अर्जुन पावरा, तहसीलदार रेणुका कोकाटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Raigad News: महाडमध्ये प्रथमच जिल्हा परिषदेचा भव्य शैक्षणिक सोहळा; १६ आदर्श शिक्षकांसह ३२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव

रुग्णवाहिका, डॉक्टरांचे पथक तैनात

अग्निवीर भरतीदरम्यान उमेदवारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी रुग्णवाहिका, प्रथमोपचार साहित्य आणि डॉक्टरांचे पथक सज्ज ठेवण्यात येणार आहे. कागदपत्रांची पडताळणी सुरळीत पार पडावी यासाठी शिक्षण विभागाकडून किमान दहा शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. तसेच क्रीडा संकुल परिसरात साप अथवा इतर वन्यप्राण्यांमुळे उमेदवारांना धोका निर्माण होऊ नये, यासाठी वनविभागाचे आवश्यक मनुष्यबळ तैनात ठेवण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी डॉ. व्यवहारे यांनी दिले आहेत.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Agniveer recruitment rally in ballarpur candidates from maharashtra gujarat and goa to appear from october 2 to 17

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Chandrapur News: विहिरींची कामे पूर्ण करूनही अनुदानाची प्रतीक्षा; ग्रामपंचायतीला निधी मिळाला, पण शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नाही
1

Chandrapur News: विहिरींची कामे पूर्ण करूनही अनुदानाची प्रतीक्षा; ग्रामपंचायतीला निधी मिळाला, पण शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नाही

Raigad News: महाडमध्ये प्रथमच जिल्हा परिषदेचा भव्य शैक्षणिक सोहळा; १६ आदर्श शिक्षकांसह ३२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव
2

Raigad News: महाडमध्ये प्रथमच जिल्हा परिषदेचा भव्य शैक्षणिक सोहळा; १६ आदर्श शिक्षकांसह ३२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव

Solapur Maratha Protest: आंदोलक २०० फूट उंच पाण्याच्या टाकीवर चढले
3

Solapur Maratha Protest: आंदोलक २०० फूट उंच पाण्याच्या टाकीवर चढले

Pune Dry Day in Ganesh Utsav 2026: गणेशोत्सवात पुणे प्रशासनचा मोठा निर्णय; १४ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ भागांत मद्यविक्रीवर बंदी
4

Pune Dry Day in Ganesh Utsav 2026: गणेशोत्सवात पुणे प्रशासनचा मोठा निर्णय; १४ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ भागांत मद्यविक्रीवर बंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.