
Pune News, Pune Dry Day, Ganesh Utsav 2026 Pune,
Ganesh Utsav Pune Liquor Shop Closed Rules: शहरातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाने काही निर्बंध घातले आहेत. 14 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर 2026 या कालावधीत मद्यविक्रीवर निर्बंध घालत विविध भागांमध्ये ड्राय डे लागू राहणार आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी केले आहेत.
काही भागांमध्ये 14 ते 25 सप्टेंबरदरम्यान पूर्णपणे मद्यविक्री बंद राहणार आहे, तर काही भागांमध्ये गणेश चतुर्थी, गणेशोत्सवातील पाचवा व सातवा दिवस तसेच अनंत चतुर्दशी आणि विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत मद्यविक्रीवर निर्बंध राहणार आहेत.
Pune News: दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; आई-वडिलांनी सांगितले धक्कादायक कारण
14 सप्टेंबरला संपूर्ण दिवस ड्राय डे
14 सप्टेंबर 2026 ला म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी पुणे-1 राज्य उत्पादन शुल्क कार्यक्षेत्रात संपूर्ण दिवस मद्यविक्री बंद राहतील. त्यामुळे या दिवशी संबंधित क्षेत्रातील मद्यविक्रीची सर्वे दुकाने बंद राहणार आहेत.
25 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी
25 सप्टेंबर 2026 रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशीही संपूर्ण दिवस मद्यविक्री बंद राहणार आहे. पुण्यात याच दिवशी गणेश विसर्जनाच्या मुख्य मिरवणुका निघणार असल्याने कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
26 सप्टेंबरलाही मद्यविक्री बंद
विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर 26 सप्टेंबर 2026 रोजी मिरवणूक संपेपर्यंत संबंधित भागात मद्यविक्री बंद राहणार आहे. विशेषतः गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील मद्यविक्रीची आस्थापने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पाचवा आणि सहावा दिवसही निर्बंध
गणेशोत्सवाच्या पाचव्या आणि सहाव्या दिवशी काही ठराविक भागांमध्ये आणि मर्यादित कालावधीसाठी मद्यविक्रीवर निर्बंध राहणार आहेत. ज्या भागातून गणेश विसर्जनाच्या मिरवणुका जाणार आहेत, त्या मिरवणूक मार्गावरील मद्यविक्रीची आस्थापने मिरवणूक संपेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
गणेशोत्सवात ड्राय डे कधी?
14 सप्टेंबर : गणेश चतुर्थी — संपूर्ण दिवस
गणेशोत्सवातील 5वा/6वा दिवस : संबंधित मिरवणूक मार्गावर मिरवणूक संपेपर्यंत निर्बंध
25 सप्टेंबर : अनंत चतुर्दशी — संपूर्ण दिवस
26 सप्टेंबर : संबंधित विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत निर्बंध
गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, या उद्देशाने हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
पुण्यातील कोणत्या भागांत विशेष निर्बंध?
पुणे पोलिसांनी जारी केलेल्या निर्देशानुसार, पुणे पोलीस आयुक्तालयातील खडक, विश्रामबाग आणि फरासखाना पोलीस ठाण्यांच्या हद्दीचा विशेष उल्लेख केला आहे. या तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत १४ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०२६ पर्यत या काळात विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत मद्यविक्री बंदीचे निर्बंध लागू राहणार आहेत.
शहरात गणेशोत्सवाची तयारी सुरू असून पुणे महापालिका प्रशासनानचे अधिकारी आढावा घेण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. महापालिका आयुक्तंसह, पुणे पोलिस आयुक्त आणि मेट्रोचे अधिकारी रस्त्यावर उतरून पाहणी करताना दिसत आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था , रस्त्यावरील खड्डे, गणपती मंडळांचे मंडप आणि लाईटनिंगची पाहणी करण्यात आली. दुसरीकडे जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, यांच्याकडून एकत्र आढावा घेण्यात आला आहे.
गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणावर भाविक आणि नागरिकांची गर्दी होत असल्याने कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित परिसरातील मद्यविक्री आस्थापनांनी आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे.
ड्राय झोनच्या आदेशाचे उल्लंघन करून मद्यविक्री केल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिला आहे.
याशिवाय गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील विविध भागांत 14 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर 2026 या कालावधीत टप्प्याटप्प्याने ड्राय डे लागू करण्यात आला आहे.
14 सप्टेंबरला गणेश चतुर्थी आणि 25 सप्टेंबरला अनंत चतुर्दशीच्या दिवशी संपूर्ण दिवस मद्यविक्री बंद राहणार आहे. तर 26 सप्टेंबरला संबंधित विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत मिरवणूक मार्गावरील मद्यविक्री बंद ठेवण्यात येणार आहे.
त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात पुण्यातील मद्यविक्रीवर प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर निर्बंध राहणार असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.