Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: महाडमध्ये प्रथमच जिल्हा परिषदेचा भव्य शैक्षणिक सोहळा; १६ आदर्श शिक्षकांसह ३२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव

प्रथमच दक्षिण रायगडातील ऐतिहासिक महाड नगरीत रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण आणि शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे. १० सप्टेंबर रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 09, 2026 | 02:40 PM
Raigad News: महाडमध्ये प्रथमच जिल्हा परिषदेचा भव्य शैक्षणिक सोहळा; १६ आदर्श शिक्षकांसह ३२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव

Raigad News: महाडमध्ये प्रथमच जिल्हा परिषदेचा भव्य शैक्षणिक सोहळा; १६ आदर्श शिक्षकांसह ३२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव

Follow Us
Follow Us:
  • महाडमध्ये १० सप्टेंबरला १६ आदर्श शिक्षक आणि ३२२ शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
  • रायगड जिल्ह्यात ३५० हून अधिक शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार असून, दक्षिण रायगडातील रिक्त पदांना प्राधान्य दिले जाणार आहे.
  • जिल्ह्यातील १०० हून अधिक शाळांमध्ये सौरऊर्जा व्यवस्था उभारण्याला प्राधान्य देण्याचा विचार जिल्हा परिषदेने सुरू केला आहे.
महाड: रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण आणि शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ प्रथमच दक्षिण रायगडातील ऐतिहासिक महाड नगरीत आयोजित करण्यात आला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या नाट्यगृहात गुरुवार दि. १० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे यांनी मंगळवारी महाड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

Raigad News: स्मार्ट मीटरच्या नावाखाली ग्राहकांवर आर्थिक बोजा? शेकापचा सरकार-महावितरणवर हल्लाबोल, ऑक्टोबरमध्ये आंदोलनाचा इशारा

या कार्यक्रमात जिल्ह्यातील १६ आदर्श शिक्षकांसह ३२२ शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे. आगामी काळात जिल्हा परिषदेला विविध उपक्रमांसाठी सहकार्य करणाऱ्या संस्थांचाही सन्मान करण्यात येणार असल्याचे कळंबे यांनी सांगितले. जिल्ह्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी येत्या काही दिवसांत ३५० पेक्षा अधिक शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार आहे.  (फोटो सौजन्य – AI Created) 

दक्षिण रायगडातील रिक्त पदांना यामध्ये प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. महाडमधील रिक्त असलेल्या १२५ पदांपैकी जवळपास १०० पदे समायोजन प्रक्रियेतून भरली जातील, अशी माहितीही त्यांनी दिली. रायगड भूषण पुरस्कार पुन्हा सुरू करू ! याच अनुषंगाने १२ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सुमारे १२०० भजनी मंडळांना भजन साहित्याचे वाटप महाडमध्ये करण्यात येणार आहे. बंद असलेला रायगड भूषण पुरस्कार पुन्हा सुरू करून त्याचा कार्यक्रम महाडमध्ये घेण्याबाबत विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

शाळांमध्ये सौरऊर्जा व्यवस्था उभारण्याला प्राधान्य

शाळांच्या वीज बिलांबाबत बोलताना कळंबे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील शाळांना सध्या व्यावसायिक दराने वीज बिले आकारली जात आहेत. याबाबत शासनाशी चर्चा सुरू असून जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक शाळांमध्ये सौरऊर्जा व्यवस्था उभारण्याला प्राधान्य देण्याचा विचार आहे. महाड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दालनात झालेल्या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद सदस्य निलेश ताटरे, स्थानिक प्रभारी गटशिक्षणाधिकारी राजन सुर्वे, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, अधिकारी उपस्थित होते.

रायगड जिल्हा परिषदेच्या अनेक कार्यक्रमांचे आयोजन आतापर्यंत अलिबाग, पेण आणि पनवेल परिसरात प्रामुख्याने होत होते. मात्र, पालकमंत्री भरत गोगावले यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील महत्त्वाचे कार्यक्रम दक्षिण रायगडात, विशेषतः ऐतिहासिक महाडमध्येही आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.- चंद्रकांत कळंबे, शिक्षण सभापती, राजिप

Raigad News: तुकडेबंदीच्या कचाट्यात अडकलेल्या जमीनधारकांना मोठा दिलासा! जुन्या व्यवहारांना आता मिळणार कायदेशीर मान्यता

बंद झालेला क्रीडा निधी पुन्हा सुरू करणार आहे!

मैदानी स्पर्धादरम्यान विद्याथ्यर्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न तसेच होणाऱ्या अपघातांबाबत आगामी काळात उपाययोजनांचा विचार केला जाईल. बंद झालेला क्रीडा निधी पुन्हा सुरू करण्याबाबतही शासनस्तरावर विचार केला जाईल, असे कळंबे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. धान्यपुरवठ्यात अयोग्य प्रकार आढळल्यास संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Raigad zp to hold first major education event in mahad more than 350 teachers to be adjusted 322 scholarship students to be felicitated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Chandrapur News: अग्निवीर भरतीसाठी बल्लारपूर सज्ज; तीन राज्यांतील उमेदवारांची गर्दी, प्रशासनाकडून जय्यत तयारी
1

Chandrapur News: अग्निवीर भरतीसाठी बल्लारपूर सज्ज; तीन राज्यांतील उमेदवारांची गर्दी, प्रशासनाकडून जय्यत तयारी

Chandrapur News: विहिरींची कामे पूर्ण करूनही अनुदानाची प्रतीक्षा; ग्रामपंचायतीला निधी मिळाला, पण शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नाही
2

Chandrapur News: विहिरींची कामे पूर्ण करूनही अनुदानाची प्रतीक्षा; ग्रामपंचायतीला निधी मिळाला, पण शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नाही

Solapur Maratha Protest: आंदोलक २०० फूट उंच पाण्याच्या टाकीवर चढले
3

Solapur Maratha Protest: आंदोलक २०० फूट उंच पाण्याच्या टाकीवर चढले

Pune Dry Day in Ganesh Utsav 2026: गणेशोत्सवात पुणे प्रशासनचा मोठा निर्णय; १४ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ भागांत मद्यविक्रीवर बंदी
4

Pune Dry Day in Ganesh Utsav 2026: गणेशोत्सवात पुणे प्रशासनचा मोठा निर्णय; १४ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ भागांत मद्यविक्रीवर बंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.