Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: ब्रह्मपुरी-आरमोरी महामार्गाची दुरवस्था; मोठ्या भेगांमुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात, नागरिक संतप्त

ब्रह्मपुरी-आरमोरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३-डीवर ठिकठिकाणी मोठ्या भेगा पडल्याने वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या या महामार्गाची काही वर्षांतच झालेली दुरवस्था पाहता, नागरिकांनी तातडीने रस्त्याची दुरुस्ती आणि कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 17, 2026 | 02:17 PM
Chandrapur News: ब्रह्मपुरी-आरमोरी महामार्गाची दुरवस्था; मोठ्या भेगांमुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात, नागरिक संतप्त

Chandrapur News: ब्रह्मपुरी-आरमोरी महामार्गाची दुरवस्था; मोठ्या भेगांमुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात, नागरिक संतप्त

Follow Us
Follow Us:
  • ब्रह्मपुरी-आरमोरी महामार्गावर मोठ्या भेगा पडल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
  • अचानक येणाऱ्या भेगांमुळे दुचाकीस्वारांचा तोल जाऊन किरकोळ अपघात होत असून मोठ्या दुर्घटनेची भीती व्यक्त केली जात आहे.
  • महामार्गाची तातडीने पाहणी करून दुरुस्ती न केल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
चौगान: ब्रह्मपुरी-आरमोरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३-डी हा ब्रह्मपुरीमार्गे नागपूर तसेच आरमोरीमार्गे गडचिरोलीला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा मार्ग आहे. या मार्गावर दररोज शेकडो लहान-मोठी वाहने धावत असतात. मात्र, काही वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून सिमेंट काँक्रिटचा तयार करण्यात आलेला हा महामार्ग आता ठिकठिकाणी मोठ्या भेगांनी विदीर्ण झाला असून, वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे.

Raigad News: महाड MIDC मध्ये विषारी वायूगळती; दोन कामगारांचा मृत्यू, कंपनीविरोधात ग्रामस्थांचा संताप

महामार्गावर अनेक ठिकाणी पडलेल्या भेगांमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः आणि लहान वाहनधारकांसाठी हा मार्ग जीवघेणा दुचाकीस्वार बनला आहे. अचानक समोर येणाऱ्या भेगांमुळे वाहनांचा तोल जाऊन किरकोळ अपघात घडत असून, भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नागरिक व्यक्त करीत आहेत. या महामार्गाची देखभाल आणि नियमित पाहणी करण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची असताना संबंधित अधिकारी आणि अभियंते या मार्गावरून वारंवार प्रवास करूनही रस्त्याची दयनीय अवस्था त्यांच्या निदर्शनास कशी येत नाही, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. या मार्गावर यापूर्वीही अनेक गंभीर अपघात घडले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.  (फोटो सौजन्य – AI Created)

तरीही प्रशासनाकडून रस्त्याच्या दुरुस्तीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. काही वर्षांतच कोट्यवधी रुपयांच्या महामार्गाची झालेली ही अवस्था कामाच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असल्याची चर्चा होत आहे. महामार्गावरील सर्व भेगांची तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करण्यात यावी व कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

राष्ट्रीय ब्रह्मपुरी-आरमोरी महामार्गावरील भेगा वाहनचालकांच्या जीवाशी खेळत आहेत. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी तातडीने रस्त्याची दुरुस्ती करणे अत्यावश्यक आहे. येत्या काही दिवसात आवश्यक कार्यवाही झाली नाही, तर नागरिकांना सोबत घेऊन तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल. -अण्णाजी ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते, रूई

Rukminibai Hospital: फ्रॅक्चर झालेल्या वृद्धाच्या पायाला प्लास्टरऐवजी पुठ्ठा, रुक्मिणीबाई रुग्णालयाचा आणखी एक धक्कादायक प्रकार

कोट्यवधी रुपये खर्च उभारण्यात आलेल्या या महामार्गाची काही वर्षांतच झालेली दुरवस्था अत्यंत गंभीर आहे. रस्त्यावर पडलेल्या भेगांमुळे दररोज हजारो वाहनचालक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करण्यात यावी, – प्रमोद चिमुरकर, माजी जि.प. सदस्य

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Brahmapuri armori highway develops major cracks vehicle drivers at risk urgent repairs demanded

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 02:17 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

AR Rahman Tamil Idol Auditions : गायक बनण्याची सुवर्णसंधी! ए. आर. रहमान शोधणार नवा तमिळ आवाज; ‘सोनी लिव’वर ऑनलाइन ऑडिशन्स सुरू
1

AR Rahman Tamil Idol Auditions : गायक बनण्याची सुवर्णसंधी! ए. आर. रहमान शोधणार नवा तमिळ आवाज; ‘सोनी लिव’वर ऑनलाइन ऑडिशन्स सुरू

Sony Vizha चा नवा प्लॅन, जागतिक पातळीवरील फॉरमॅट तमिळमध्ये! समंथा रुथ प्रभू होस्ट करणार ‘Celebrity MasterChef Tamil’
2

Sony Vizha चा नवा प्लॅन, जागतिक पातळीवरील फॉरमॅट तमिळमध्ये! समंथा रुथ प्रभू होस्ट करणार ‘Celebrity MasterChef Tamil’

Raigad News: महाड MIDC मध्ये विषारी वायूगळती; दोन कामगारांचा मृत्यू, कंपनीविरोधात ग्रामस्थांचा संताप
3

Raigad News: महाड MIDC मध्ये विषारी वायूगळती; दोन कामगारांचा मृत्यू, कंपनीविरोधात ग्रामस्थांचा संताप

Jalgaon News: पावसाळ्यात डासांचा वाढता धोका… अमळनेर नगरपरिषद अॅक्शन मोडवर
4

Jalgaon News: पावसाळ्यात डासांचा वाढता धोका… अमळनेर नगरपरिषद अॅक्शन मोडवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.