Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: चंद्रपूरच्या आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर? दरवर्षी 99 कोटींचा खर्च, तरी विद्यार्थ्यांना पलंग

गडचिरोलीतील सर्पदंशाच्या घटनेनंतर चंद्रपूर जिल्ह्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना अद्याप पलंगाची सुविधा नसल्याने त्यांना जमिनीवरच झोपावे लागत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 14, 2026 | 03:31 PM
Chandrapur News: चंद्रपूरच्या आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर? दरवर्षी 99 कोटींचा खर्च, तरी विद्यार्थ्यांना पलंग नाही

Chandrapur News: चंद्रपूरच्या आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर? दरवर्षी 99 कोटींचा खर्च, तरी विद्यार्थ्यांना पलंग नाही

Follow Us
Follow Us:
  • चंद्रपूरमधील ३२ आश्रमशाळांतील ८,७८६ विद्यार्थ्यांपैकी ८,४४२ विद्यार्थ्यांना पलंग उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.
  • अनेक विद्यार्थी जमिनीवर गाद्या किंवा चटई टाकून झोपत असून, काही आश्रमशाळांमध्ये पक्क्या वसतिगृहाची सुविधाही नाही.
  • आश्रमशाळांवर दरवर्षी सुमारे ९९ कोटी रुपये खर्च होत असतानाही विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
चंद्रपूर: गडचिरोली जिल्ह्यात आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याची घटना समोर आल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील आश्रमशाळांमध्येही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासन व संस्थाचालकांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना जमिनीवर झोपविण्याऐवजी त्यांच्यासाठी स्वतंत्र बेडची व्यवस्था करण्यासाठी आश्रमशाळा प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. बेड खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात आर्डर येत असल्याची माहिती चंद्रपूरातील एका फर्निचर व्यावसायिकाने दिली आहे.

Raigad News: माथेरानच्या शारलोट लेकचा गाळ नेमका कुठे गेला? 1000 ब्रास मातीवरून खळबळ, आरोप-प्रत्यारोपांना उधाण

चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी अनुदानित अशा ३२ आश्रमशाळांतील ८ हजार ७८६ विद्याध्यपैिकी तब्बल ८ हजार ४४२ विद्यार्थ्यांना पलंगच उपलब्ध नसल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. अवघ्या ३४४ विद्यार्थ्यांच्या नशिबी पलंग असून, उर्वरित विद्यार्थ्यांना जमिनीवर गाद्या, चटई टाकून रात्र काढावी लागत आहे. विशेष म्हणजे, या विद्यार्थ्यांच्या शिक्षण, निवास आणि शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासन दरवर्षी तब्बल ९९ कोटी रुपयांच्या आसपास खर्च करीत असताना, विद्यार्थ्यांच्या डोक्यावर सुरक्षित छप्पर आणि झोपण्यासाठी साधा पलंगही उपलब्ध नसल्याचे चित्र आहे.  (फोटो सौजन्य – AI Created) 

शासनाच्या कोट्यवधींच्या खर्चाची हीच काय फलश्रुती, असा सवाल या आकडेवारीमुळे उपस्थित झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एका आदिवासी आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आजवर निद्रावस्थेत असलेली प्रशासकीय यंत्रणा जागी झाली. मात्र, मागील तीन-चार दशकांपासून सुरू असलेल्या या आश्रमशाळांतील दुरवस्था आजवर यंत्रणेला का दिसली नाही? याचे उत्तर अधिकाऱ्यांकडे नाही. परंतु, आश्चर्याची बाब अशी की, जवळपास २४ शाळांमध्ये वसतिगृहच नाही. शाळेला पक्की इमारत नाही. शाळेलगतच्या टिनाच्या शेडमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या निवासाची व्यवस्था केली आहे.

नियमाप्रमाणे वसतिगृहात विद्यार्थ्यांना स्वतंत्र पलंग असावा, असा नियम आहे. परंतु, या नियमांकडे खासगी संस्थाचालकांनी सपशेल पाठ फिरवली. अनुदानित एकूण २४ आश्रमशाळांत आजच्या घडीला ६ हजार ६७२ विद्यार्थी आहेत. त्यातील ६ हजार ५५२ विद्यार्थी खाली गाद्या टाकून रात्र काढत आहेत. जिल्ह्यातील आठ शासकीय आश्रमशाळांची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. येथे एकूण २ हजार ११४ विद्यार्थी आहेत. त्यातील १ हजार ८९० विद्यार्थ्यांना गाद्या टाकून झोपावे लागत आहे. विशेष म्हणजे, या बहुतांश शाळा जंगलालगत आहेत. शाळेला आणि वसतिगृहाला पक्की इमारत नाही. टिनशेडच्या वसतिगृहांना खिडक्या नाहीत. त्यामुळे ऊन, वारा, पाऊस आणि विषारी जीव-जंतूंच्या सान्निध्यातच या विद्यार्थ्यांना आपले ज्ञानार्जनाचे काम करावे लागत आहे.

आश्रमशाळांच्या खर्चावर प्रश्नचिन्ह

खासगी आणि शासकीय अनुदानित आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्यांमागे वर्षाकाठी जवळपास ३० हजार रुपयांचा खर्च येतो. या शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या पाहता शासन त्यांच्यावर वर्षाकाठी २६ कोटी ३५ लाखांवर खर्च करते. तर शाळेतील शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या वेतनावर वर्षाचा खर्च ७३ कोटी ३५ लाख ८० हजार एवढा आहे. जवळपास ९९ कोटींचा वार्षिक खर्च असतानाही आदिवासी विद्यार्थ्यांना साधा पलंगही मिळत नाही. इतर सुविधांची स्थिती तर आणखी भयावह आहे.

भेसळ करताय? मग सावधान! रत्नागिरीत FDA ची अस्वच्छता आणि बेकायदेशीर व्यवसायांविरोधात कडक मोहीम

अनुदानित आश्रमशाळांवर कारवाईचे अधिकार आमच्याकडे नाहीत. आम्ही कारवाईसाठी अहवाल आयुक्तांकडे पाठवितो, मात्र, कारवाई होत नाही. जिल्ह्यातील अनेक आश्रमशाळांना यापूर्वी नोटीस दिलेल्या आहेत.- विकास राचेलवार, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Chandrapur ashram schools over 8400 students still without beds despite 99 crore rupees annual spending

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 03:31 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Apollo Hospital FDA Raid : एक्सपायर्ड जेवण देत होतं हॉस्पिटल, बंगळुरुमधील धक्कादायक प्रकार! FDA च्या कारवाईत उघड
1

Apollo Hospital FDA Raid : एक्सपायर्ड जेवण देत होतं हॉस्पिटल, बंगळुरुमधील धक्कादायक प्रकार! FDA च्या कारवाईत उघड

Mirzapur The Movie Release : ‘मिर्झापूर’चा भौकाल आता थेट थिएटरमध्ये! PVR INOX बनणार ‘मिर्झाPVR’;  चाहत्यांसाठी खास सरप्राइज
2

Mirzapur The Movie Release : ‘मिर्झापूर’चा भौकाल आता थेट थिएटरमध्ये! PVR INOX बनणार ‘मिर्झाPVR’; चाहत्यांसाठी खास सरप्राइज

Raigad News: माथेरानच्या शारलोट लेकचा गाळ नेमका कुठे गेला? 1000 ब्रास मातीवरून खळबळ, आरोप-प्रत्यारोपांना उधाण
3

Raigad News: माथेरानच्या शारलोट लेकचा गाळ नेमका कुठे गेला? 1000 ब्रास मातीवरून खळबळ, आरोप-प्रत्यारोपांना उधाण

‘मराठी’चा डिजिटल दबदबा वाढणार! ZEE5 च्या नव्या कंटेंटमध्ये कथा, वैविध्य आणि भरपूर मनोरंजन
4

‘मराठी’चा डिजिटल दबदबा वाढणार! ZEE5 च्या नव्या कंटेंटमध्ये कथा, वैविध्य आणि भरपूर मनोरंजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.