Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 4 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: 25 दिवसांचा मुक्काम संपला, हत्तींचा कळप गडचिरोलीकडे परतला; परतीच्या वाटेवर शेतांचे नुकसान, एकाचा बळी

चंद्रपूर जिल्ह्यात तब्बल 25 दिवस मुक्काम केलेल्या 30 ते 32 जंगली हत्तींच्या कळपाने अखेर गडचिरोलीकडे परतीचा प्रवास सुरू केला. मात्र या प्रवासादरम्यान शेतपिकांचे नुकसान झाले असून, कळपापासून वेगळ्या झालेल्या एका हत्तीच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 04, 2026 | 01:23 PM
Chandrapur News: 25 दिवसांचा मुक्काम संपला, हत्तींचा कळप गडचिरोलीकडे परतला; परतीच्या वाटेवर शेतांचे नुकसान, एकाचा बळी

Chandrapur News: 25 दिवसांचा मुक्काम संपला, हत्तींचा कळप गडचिरोलीकडे परतला; परतीच्या वाटेवर शेतांचे नुकसान, एकाचा बळी

Follow Us
Follow Us:
  • २५ दिवस मुक्काम केल्यानंतर जंगली हत्तींचा कळप चंद्रपुरातून गडचिरोली जिल्ह्याकडे परतला.
  • परतीच्या मार्गावर हत्तींनी कापसी, सामदा आणि सोनापूर परिसरातील धानपिकांचे नुकसान केले.
  • कळपापासून भरकटलेल्या एका हत्तीच्या हल्ल्यात सोनापूर येथील अतुल गोहणे यांचा मृत्यू झाला.
चंद्रपूर: सावली तालुक्यातील उमरी तलाव परिसरात ५ जूनपासून ३० ते ३२ हत्तींच्या कळपाने मुक्काम ठोकला होता. तब्बल २५ दिवस या जंगल परिसरात वास्तव्य केल्यानंतर कळपाने परतीचा प्रवास सुरू केला. मात्र या हालचालींदरम्यान कापसी, सामदा व सोनापूर परिसरात शेतकऱ्यांच्या धानपिकांचे नुकसान झाले. सोबतच कळपापासून मागे राहिलेल्या एका जंगली हत्तीने सोनापूर येथील अतूल गोहणे या व्यक्तीला ठार केल्यामुळे जिल्ह्यातील हत्तींच्या कळपाचा परतीचा प्रवास महागडा ठरला.

Satara News : गुडघाभर खड्डे, पावसाचे पाणी अन् जीवघेणा प्रवास; व्याहाळी-धोम रस्त्याबाबत नागरिकांचा संताप

३० मे रोजी रात्रीच्या सुमारास बोरमाळा घाटावरून ३० ते ३२ जंगली हत्तींच्या कळपाने गडचिरोली जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश केला. दरम्यान सावली तालुक्यातील बोरमाळा, पाथरी परिसरात हत्तींनी काही दिवस भ्रमंती केली. त्यांनतर सावली शहराजवळ प्रवेश करीत सीर्सी, लोंढोली, साखरी मार्गे चामोर्शीकडे रवाना झाले. मात्र दुसऱ्याच दिवशी चामोर्शीकडून हत्तींनी पावले परत फिरवत उमरी परिसरातील जंगलात हत्तींनी बस्तान मांडले. ४ जून ते बुधवारपर्यंत हत्तींचा मुक्काम सावली तालुक्यातील उमरी परिसरात असलेल्या जंगलात होता. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे शेतामध्ये नागरिकांची वर्दळ नव्हती, मात्र मागील ८ दिवसापासून पाऊस पडत असल्याने, शेतीकामांना वेग आला.

दरम्यान अनेकांनी पऱ्हे व आवत्या टाकले. २५ दिवसांपासून थांबलेल्या हत्तींच्या कळपाने बुधवारी रात्री मात्र आपला मार्ग उपरी, कापसी, सामदामार्गे नदीपल्याड हलविला. त्यावेळी पेरणी करण्यात आलेल्या धानपिकांचे नुकसान झाले. हत्तींचा कळप सोनापूरवरून नदीच्या पलीकडे गडचिरोली जिल्ह्यात गेला. मात्र त्या कळपातील एक जंगली हत्ती कळपापासून भरकटला गेल्याने तो सोनापूर परिसरात फिरत होता.

गुरूवारी रात्री व्याहाडवरून सोनापूरकडे निघालेल्या तीन जणांच्या दृष्टीस तो जंगली हत्ती पडला. दरम्यान दुचाकीस्वार असलेल्या तिघांनीही पळ काढला. यात गोहणे (रा. सोनापूर) यांचा हत्तीच्च्या हल्ल्यात मृत्यू झाला. गेल्या २५ दिवसांपासून हत्तींच्या संरक्षणासाठी वनविभागाचे कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत होते. हत्तींनी गावात प्रवेश करू नये म्हणून वनविभागाकडून वेळोवेळी सूचना दिल्या जात होत्या. मात्र हत्तींच्या परतीच्या प्रवासाने शेतपिकांचे नुकसान केले. शिवाय एका व्यक्तीचा बळी घेतल्याची खंत नागरिक व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दैनिक नवराष्ट्रशी बोलताना व्यक्त केली.

‘ऑपरेशन टायगर’नंतर धावपळीचा परिणाम; उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल, सर्व कार्यक्रम रद्द

हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या गोहणे यांच्या कुटुंबियांना वनविभागाकडून ५० हजार रूपयांची तत्काळ मदत देण्यात आली. उर्वरीत रक्कम लवकरच देण्यात येणार आहे. ज्यांच्या धानपिकांचे नुकसान झाले त्यांनी वनविभागाकडे अर्ज द्यावे. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात येणार, असेही वनविभागाने सांगितले. हत्तीनी गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश केला असला तरी परतण्याची भीती कायम असल्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी व वनविभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. – राजन तलमले, विभागीय वन अधिकारी, चंद्रपूर

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Chandrapur elephant herd returns to gadchiroli after 35 days crops damaged one person killed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 01:23 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

कांद्याने नाही तर आता टोमॅटोने रडवलं, भाव पुन्हा कडाडले; काही दिवसांत 100 रुपये किलो होणार?
1

कांद्याने नाही तर आता टोमॅटोने रडवलं, भाव पुन्हा कडाडले; काही दिवसांत 100 रुपये किलो होणार?

‘या’ बँकेत तुमचं तर खातं नाही ना? RBI कडून मोठा दणका; ठोठावला लाखो रुपयांचा दंड, नेमकं प्रकरण काय?
2

‘या’ बँकेत तुमचं तर खातं नाही ना? RBI कडून मोठा दणका; ठोठावला लाखो रुपयांचा दंड, नेमकं प्रकरण काय?

‘मातृभूमी’ चित्रपटाच्या सेन्सॉर वादाच्या बातम्या खोट्या! सलमान खान फिल्म्सचे मोठं स्पष्टीकरण
3

‘मातृभूमी’ चित्रपटाच्या सेन्सॉर वादाच्या बातम्या खोट्या! सलमान खान फिल्म्सचे मोठं स्पष्टीकरण

International Abilympics 2027: फिनलंडमधील जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी भारताची तयारी सुरू; राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन
4

International Abilympics 2027: फिनलंडमधील जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी भारताची तयारी सुरू; राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.