Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: अडीच महिने उलटले, तरी करार रखडला; चंद्रपुरातील शाळांमध्ये पोषण आहारासाठी शिक्षकांची उधारी

चंद्रपूर जिल्ह्यात शालेय पोषण आहार योजनेच्या अन्नधान्य पुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन अडीच महिने उलटले तरी पुरवठादारांशी करारनामा पूर्ण न झाल्याने काही शाळांमध्ये अन्नधान्याचा साठा संपला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 12, 2026 | 03:14 PM
Chandrapur News: अडीच महिने उलटले, तरी करार रखडला; चंद्रपुरातील शाळांमध्ये पोषण आहारासाठी शिक्षकांची उधारी

Chandrapur News: अडीच महिने उलटले, तरी करार रखडला; चंद्रपुरातील शाळांमध्ये पोषण आहारासाठी शिक्षकांची उधारी

Follow Us
Follow Us:
  • चंद्रपुरातील अनेक शाळांमध्ये तांदूळ, कडधान्य आणि इतर साहित्याचा साठा संपुष्टात आला आहे.
  • विद्यार्थ्यांचे भोजन बंद पडू नये म्हणून काही शिक्षक स्थानिक दुकानदारांकडून उधारीवर अन्नधान्य घेत आहेत.
  • राज्यस्तरावर करारनामा झाल्याने येत्या दोन-तीन दिवसांत सर्व शाळांना पोषण आहाराचे साहित्य मिळेल, असे शिक्षण विभागाने सांगितले आहे.
चंद्रपूर: राज्य शासनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सकस व पौष्टिक आहार मिळावा, या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहार योजनेलाच पुरवठ्याच्या नियोजनाअभावी अडचणींचा सामना करावा लागत आहे. शैक्षणिक सत्र सुरू होऊन तब्बल अडीच महिन्यांचा कालावधी उलटूनही मध्यान्ह भोजनासाठी अन्नधान्य पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांशी नव्या शैक्षणिक वर्षाचा करारनामा पूर्ण झाला नसल्याने जिल्ह्यातील अनेक शाळांमधील तांदूळ, कडधान्य आणि इतर साहित्याचा साठा संपुष्टात आला आहे. परिणामी विद्यार्थ्यांना नियमित भोजन देण्यासाठी शिक्षकांना उधारीचा आधार घ्यावा लागत असून, काही शाळांमध्ये शाळा व्यवस्थापन समित्यांकडून तात्पुरती व्यवस्था केली जात आहे.

विनाहेल्मेट शासकीय कर्मचाऱ्यांवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राइक! १२ कार्यालयांसमोर कारवाई; ३०३ जणांना ३ लाखांचा दणका

जिल्हा परिषद, महानगरपालिका तसेच नगर परिषद क्षेत्रातील शासकीय, खासगी, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना राबविण्यात येते. विद्यार्थ्यांना शाळेतच सकस आहार मिळावा, त्यांची उपस्थिती वाढावी आणि कुपोषणाला आळा बसावा, हा या योजनेमागील प्रमुख उद्देश आहे. मात्र, अन्नधान्याच्या पुरवठ्यात निर्माण झालेल्या अडथळ्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मध्यान्ह भोजनासाठी आवश्यक असलेले तांदूळ, कडधान्य व अन्य अन्नधान्य राज्यस्तरावरून पुरविले जाते. त्यासाठी दरवर्षी निविदा प्रक्रिया राबवून संबंधित पुरवठादाराची नियुक्ती केली जाते आणि त्याच्याशी वर्षभराचा करारनामा केला जातो.  (फोटो सौजन्य – AI Created) 

मागील वर्षीच्या पुरवठादाराचा करार नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच संपुष्टात आला. त्यामुळे नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वीच नवीन करारनामा होऊन शाळांना पुरेसा अन्नधान्यसाठा उपलब्ध होणे अपेक्षित होते. मात्र, शैक्षणिक सत्र सुरू होऊन अडीच महिने उलटले तरी करारनाम्याची प्रक्रिया लांबली. परिणामी मागील वर्षी शाळांना उपलब्ध करून देण्यात आलेला राखीव साठाच वापरावा लागला. मोठ्या पटसंख्येच्या शाळांमध्ये हा साठा लवकर संपला, तर तुलनेने कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील अन्नधान्यही आता संपुष्टात येऊ लागले आहे.

दीड हजारांवर जि.प. शाळांवर परिणामाची शक्यता

चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दीड हजारांहून अधिक प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. याशिवाय खासगी, अनुदानित आणि इतर शाळांची संख्या दोन हजारांहून अधिक आहे. या सर्व शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचा लाभ मिळतो.

उधारीवर ‘स्वयंपाकाची’ कसरत

अन्नधान्याचा साठा संपल्याने विद्यार्थ्यांचे भोजन बंद पडू नये, यासाठी काही शाळांतील शिक्षकांनी स्थानिक किराणा दुकानदारांकडून उधारीवर तांदूळ, कडधान्य आणि अन्य साहित्य घेण्यास सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांना उपाशी ठेवण्यापेक्षा स्वतःच्या जबाबदारीवर व्यवस्था करण्याचा मार्ग शिक्षकांनी स्वीकारला आहे. मात्र, ही व्यवस्था किती दिवस चालणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही शाळांमध्ये शाळा व्यवस्थापन समित्यांच्या माध्यमातून तात्पुरता अन्नधान्य पुरवठा केला जात आहे. त्यामुळे एका शाळेत योजना सुरू असताना दुसऱ्या शाळेत अन्नधान्याची कमतरता, अशी विसंगत परिस्थिती निर्माण झाली आहे.

अकोल्यातील नागरिकांवर मोठं जलसंकट; काटेपूर्णात 5 वर्षांच्या तुलनेत निम्म्याहून कमी साठा

मध्यान्ह भोजन योजनेसाठी पुरवठा करण्यासंदर्भात राज्यस्तरावरून आता करारनामा झाला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत जिल्ह्यातील सर्वच शाळांमध्ये शालेय पोषण आहाराचे साहित्य उपलब्ध होईल.- विशाल देशमुख, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, चंद्रपूर

अनेक शाळांमधील अन्नधान्याचा साठा संपला आहे. त्यामुळे शिक्षक उधारीवर साहित्य घेऊन योजना सुरू ठेवत आहेत. मागील वर्षीचा साठाही आता संपला आहे. विद्यार्थ्यांना भोजन मिळावे म्हणून उधारीवर अन्नधान्य घेऊन गुजराण सुरू आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा.- हरीश ससनकर, राज्य सरचिटणीस, पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Chandrapur school midday meal scheme faces food grain shortage teachers buy rations on credit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 03:14 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.