Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: कागदावर क्रीडांगण पूर्ण, प्रत्यक्षात काम अपूर्ण? खडसंगी ग्रामपंचायतीत 24 लाखांच्या कामावर प्रश्नचिन्ह

खडसंगी येथील क्रीडांगणाचे काम सन २०२३-२४ मध्ये मंजूर करण्यात आले होते. मात्र, मंजूर काम पूर्णत्वास न जाता कागदोपत्री ते पूर्ण दाखविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणात अंदाजपत्रकाबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 26, 2026 | 03:14 PM
Chandrapur News: कागदावर क्रीडांगण पूर्ण, प्रत्यक्षात काम अपूर्ण? खडसंगी ग्रामपंचायतीत 24 लाखांच्या कामावर प्रश्नचिन्ह

Chandrapur News: कागदावर क्रीडांगण पूर्ण, प्रत्यक्षात काम अपूर्ण? खडसंगी ग्रामपंचायतीत 24 लाखांच्या कामावर प्रश्नचिन्ह

Follow Us
Follow Us:
  • सुमारे २४ लाख रुपयांचे पेमेंट झाल्याचा दावा असून, प्रत्यक्षात क्रीडांगणाचे काम अपूर्ण असल्याचा आरोप आहे.
  • बास्केटबॉल आणि कबड्डी मैदान कागदोपत्री दाखवले, मात्र प्रत्यक्षात केवळ मुरूमाचा थर टाकण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
  • मंजुरी आदेश, अंदाजपत्रक, मोजमाप पुस्तिका आणि देयकांची चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई व निधीवसुलीची मागणी करण्यात आली आहे.’
चिमूर: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) मंजूर झालेल्या क्रीडांगणाच्या कामात मोठा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप खडसंगी ग्रामपंचायतीतून समोर आला आहे. प्रत्यक्षात काम अपूर्ण असतानाही ते पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र काढण्यात आल्याचा आरोप होत असून, या प्रकारामुळे ग्रामपंचायत व संबंधित प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खडसंगी येथील क्रीडांगणाचे काम सन २०२३-२४ मध्ये मंजूर करण्यात आले होते. मात्र, मंजूर काम पूर्णत्वास न जाता कागदोपत्री ते पूर्ण दाखविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. विशेष म्हणजे, काम अपूर्ण असतानाही पूर्णत्व प्रमाणपत्र कसे देण्यात आले? असा सवाल उपस्थित होत आहे.

Raigad News: माथेरानमध्ये राजकीय भूकंपाची चाहूल! शिंदे गटात बड्या नेत्यांचा प्रवेशाची चर्चा, अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

या प्रकरणात अंदाजपत्रकाबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. क्रीडांगणाच्या कामाचे मूळ अंदाजपत्रक ग्रामपंचायतीकडे उपलब्ध नसल्याचा दावा करण्यात आला आहे. निविदा प्रक्रिया कशी राबविण्यात आली? कामाची प्रत्यक्ष मोजणी झाली का? तसेच देयके कोणत्या आधारावर मंजूर करण्यात आली? याची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देताना प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करण्यात आली होती का? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. मैदानावर काम अपूर्ण असताना अधिकाऱ्यांच्या संगनमताने कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करण्यात आली का? याबाबत संशय व्यक्त होत आहे.  (फोटो सौजन्य – AI Created) 

या प्रकरणाची चौकशी करून मंजुरी आदेश, मूळ अंदाजपत्रक, मोजमाप पुस्तिका, ऑनलाइन नोंदी, देयके आणि संबंधित कागदपत्रांची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दोषी आढळणाऱ्या सरपंच, ग्रामसेवक व संबंधित अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करून निधीची वसुली करावी, अशीही मागणी पुढे आली आहे. ग्रामीण भागातील विकासकामांसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात असताना तो निधी प्रत्यक्ष कामांवर खर्च होतो की केवळ कागदोपत्री विकास दाखविला जातो? हा प्रश्न खडसंगीतील या प्रकरणामुळे पुन्हा ऐरणीवर आला. आता या गंभीर आरोपांची प्रशासनाकडून निष्पक्ष चौकशी होऊन सत्य बाहेर येणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

प्रत्यक्षात क्रीडांगणाच्या ठिकाणी केवळ नाममात्र काम करण्यात आले आहे. कागदोपत्री बास्केटबॉल व कबड्डी मैदान दाखविण्यात आले असून, प्रत्यक्षात मुरूमाचा थर टाकून काम पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आले. बोगस बिले जोडून निधीचा गैरवापर झाल्याची शंका असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे.- रुपचंद शास्त्रकार, ग्रामपंचायत सदस्य, खडसंगी

मुंबईची ग्लोबल झेप! ‘वर्क फ्रॉम एनिव्हेअर’मध्ये लंडन-मियामीला टाकलं मागे

क्रीडांगणाच्या कामासाठी इस्टीमेटनुसार सुमारे २४ लाख रुपयांचे पेमेंट झालेले आहे, मात्र, हे काम माझ्या कार्यकाळात झालेले नसल्यामुळे त्या कामाच्या प्रक्रियेबाबत मला माहिती नाही.- कवड्डू तरारे, ग्रामपंचायत अधिकारी, खडसंगी

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

 

Web Title: Chimur khasdangi mgnrega scam allegation rs 24 lakh sports ground work shown complete despite being incomplete

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 03:14 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Raigad News: माथेरानमध्ये राजकीय भूकंपाची चाहूल! शिंदे गटात बड्या नेत्यांचा प्रवेशाची चर्चा, अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
1

Raigad News: माथेरानमध्ये राजकीय भूकंपाची चाहूल! शिंदे गटात बड्या नेत्यांचा प्रवेशाची चर्चा, अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

Pune Municipal Corporation : विकासनिधीवरून BJP-NCP आमनेसामने, धीरज घाटेंचे सुनेत्रा पवार यांना पत्र
2

Pune Municipal Corporation : विकासनिधीवरून BJP-NCP आमनेसामने, धीरज घाटेंचे सुनेत्रा पवार यांना पत्र

भावाला राखी पाठवायची राहिली? आता देश-विदेशात अवघ्या १५ मिनिटांत पोहोचवता येईल राखी
3

भावाला राखी पाठवायची राहिली? आता देश-विदेशात अवघ्या १५ मिनिटांत पोहोचवता येईल राखी

Sangli Plot Scam : सांगली महापालिकेत भूखंड घोटाळ्याचा आरोप; ‘आठ दिवसांत परत घ्या, अन्यथा आंदोलन’
4

Sangli Plot Scam : सांगली महापालिकेत भूखंड घोटाळ्याचा आरोप; ‘आठ दिवसांत परत घ्या, अन्यथा आंदोलन’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.