Raigad News: माथेरानमध्ये राजकीय भूकंपाची चाहूल! शिंदे गटात बड्या नेत्यांचा प्रवेशाची चर्चा, अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
Ratnagiri: आता थेट कोकणात लँडिंग! रत्नागिरी विमानतळावरून लवकरच सुरू होणार प्रवासी सेवा
माथेरान हे पर्यटन स्थळ असून पर्यटनाचे दृष्टीने महत्वाचे समजले जाते. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना सुविधा मिळवून देण्यासाठी राजकीय पक्ष आपले राजकीय आयुष्य पणाला लावत असतात. त्यामुळे सध्या विजनवासात असलेले नेते मंडळी पक्ष बदलून आपल्या शहराच्या विकासात साथ देण्यासाठी शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
माथेरानमध्ये कायम गावाच्या विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून सत्ताधारी आपआल्याला नेतेमंडळी यांच्याकडे जाऊन निधी खेचून आणत असतात. त्यात सध्या राज्यात आणि केंद्रात भाजप सत्तेवर असल्याने भाजपचे मित्र पक्ष वगळता अन्य ही विकासाच्या बाजूला पडले आहेत. ही बाब लक्षात घेऊन माथेरानमध्ये एका पक्षाचे काही प्रमुख नेते शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)
दरम्यान, संबंधित नेत्याकडून किवा शिंदे गटाकडून याबाबत अधिकृत घोषणा झाल्यानंतरच या चर्चेला उधान येणार आहे. त्यामुळे माथेरानमध्ये लवकरच राजकीय भूकंप होणार का? याकडे संपूर्ण कर्जत तालुक्याचे लक्ष लागले आहे. तर जाहीरपणे कोणीही बोलण्यास तयार नसल्याचे दिसून येत असून कदाचित एक पक्ष माथेरानच्या राजकारणात अस्तित्वहीन होऊ शकतो असे बोलले जात आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांत ठाकरे गटातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे शिंदे गटात प्रवेश झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे माथेरानमधील या संभाव्य पक्षांतराकडेही कर्जत तालुक्यातील राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. संबंधित काही नेत्यांच्या शिवसेना शिंदे गटातील प्रवेश झाल्यास माथेरानमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का ठरू शकतो.
Nagpur News : मुलींच्या स्वच्छतागृहासाठी विद्यार्थ्यांचा आक्रोश; मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
माथेरानच्या राजकीय वर्तुळात सध्या एका संभाव्य पक्षांतराची जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील काही प्रमुख नेत्याकडून लवकरच शिंदे गटात प्रवेश केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संभाव्य पक्षांतरामुळे माथेरानच्या स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात बोलली जात आहे. संपर्कात शिंदे गटातील वरिष्ठ नेते असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्याकडून वरिष्ठ स्तरावर शिंदे पक्षात प्रवेश करून घेण्यासाठी हालचाली सुरू आहेत. भेटीगाठी आणि चर्चाबाबत राजकीय चर्चा सुरू आहे. मात्र या पक्ष प्रवेशाबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे नेमका कोणता नेता शिंदे गटात जाणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.






