Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिरूर लोकसभा मतदारसंघातून ‘गायब’ खासदार मिसळ पार्टीत? आढळराव पाटलांच्या कार्यपद्धतीची पुन्हा चर्चा

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे मतदारसंघातून गायब असल्याची चर्चा रंगत असतानाच ते ‘मिसळ पार्टी’त दिसल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात खमंग पण तितकीच संतप्त चर्चा रंगली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 16, 2026 | 01:41 PM
शिरूर लोकसभा मतदारसंघातून ‘गायब’ खासदार मिसळ पार्टीत? आढळराव पाटलांच्या कार्यपद्धतीची पुन्हा चर्चा

शिरूर लोकसभा मतदारसंघातून ‘गायब’ खासदार मिसळ पार्टीत? आढळराव पाटलांच्या कार्यपद्धतीची पुन्हा चर्चा

Follow Us
Follow Us:

रांजणी /रमेश जाधव : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे मतदारसंघातून गायब असल्याची चर्चा रंगत असतानाच ते ‘मिसळ पार्टी’त दिसल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात खमंग पण तितकीच संतप्त चर्चा रंगली आहे. अवकाळी पावसाने होरपळलेल्या शेतकऱ्यांकडे पाठ फिरवून खासदारांनी ‘मिसळीचा आस्वाद’ घेतल्याची टीका होत असून, “हीच का जनतेप्रती जबाबदारी?” असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.

 

३१ मार्च रोजी उत्तर पुणे जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिठीने थैमान घालत शेतीचे प्रचंड नुकसान केले. आंबेगावच्या पूर्व भागापासून शिरूरच्या पश्चिमेकडील गावांपर्यंत शेतकऱ्यांची उभी पिके जमीनदोस्त झाली. अशा बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांच्या बांधावर धाव घेणे अपेक्षित असताना खासदार मात्र मतदारसंघात फिरकलेच नाहीत, अशी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

याउलट माजी मंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रशासनासह नुकसानग्रस्त भागांची पाहणी करत तातडीने पंचनाम्यांचे आदेश दिले. शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन देत दिलासा देण्याचा प्रयत्न केला. भीमाशंकर साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम व जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनीही प्रत्यक्ष भेटी देत परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र खासदार कोल्हे यांची अनुपस्थिती ठळकपणे जाणवत राहिली.

लोकसभा निवडणुकीनंतर खासदारांचा मतदारसंघाशी संपर्क तुटल्याची भावना अधिकच तीव्र होत आहे. निवडणुकीपूर्वी ‘मतदारसंघ पिंजून काढणारे’ कोल्हे विजयानंतर मात्र जनतेपासून दूर गेल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. अधिवेशनाच्या कारणावर ढाल उभी केली जात असली तरी “शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी पुसायला वेळ नाही, पण मिसळ पार्टीला वेळ आहे?” असा संतप्त सवाल गावागावातून ऐकू येत आहे.

विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीत कोल्हे यांच्या प्रचारासाठी झटलेल्या कार्यकर्त्यांमध्येही प्रचंड नाराजी आहे. “वापर करून विसरले” अशी उघड नाराजी व्यक्त होत असून, आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नाराजी धोक्याची घंटा मानली जात आहे.

दरम्यान, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या कार्यपद्धतीची पुन्हा चर्चा रंगू लागली आहे. “आढळराव पाटील हे सुख-दुःखात कायम सोबत उभे राहायचे; सध्याचे खासदार मात्र दिसतच नाहीत,” अशी तुलना नागरिक करत आहेत. त्यामुळे “आढळराव पाटील यांना डावलणे ही चूक ठरली का?” हा प्रश्न आता मतदारसंघात उघडपणे विचारला जाऊ लागला आहे.

एकंदरीत, अवकाळी पावसाच्या संकटात शेतकरी हवालदिल असताना खासदारांच्या अनुपस्थितीने आणि ‘मिसळ पार्टी’च्या चर्चेने राजकारणाचा पारा चढला असून, जनतेचा रोष येत्या काळात कोणत्या दिशेने वळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा : गॅसही संपला अन् केरोसीनही मिळेना! सामान्यांचे हाल, वितरकांमध्ये संभ्रम

Web Title: Citizens have expressed strong displeasure with mp amol kolhe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 01:41 PM

Topics:  

  • amol kolhe
  • Farmers
  • Shirur News

संबंधित बातम्या

Purandar Airport : …ही जबाबदारी आमची नाही; पुरंदर विमानळाच्या जागा निवडीवरून अधिकाऱ्यांमध्ये टोलवाटोलवी
1

Purandar Airport : …ही जबाबदारी आमची नाही; पुरंदर विमानळाच्या जागा निवडीवरून अधिकाऱ्यांमध्ये टोलवाटोलवी

पुरंदर विमानतळासाठी 40 हेक्टर जमीन सक्तीने संपादित करणार; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती
2

पुरंदर विमानतळासाठी 40 हेक्टर जमीन सक्तीने संपादित करणार; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती

पुरंदर विमानतळाच्या जागेत बदल करताना कोणते निकष लावले? मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारला स्पष्टीकरण देण्याचे निर्देश
3

पुरंदर विमानतळाच्या जागेत बदल करताना कोणते निकष लावले? मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारला स्पष्टीकरण देण्याचे निर्देश

Nashik News: शेतकऱ्यांवर तिहेरी संकट! उत्पादन खर्च वाढला, भाजीपाल्याचे दर घसरले अन् पावसानेही दडी मारली
4

Nashik News: शेतकऱ्यांवर तिहेरी संकट! उत्पादन खर्च वाढला, भाजीपाल्याचे दर घसरले अन् पावसानेही दडी मारली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.