Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: ‘लाडकी बहीण’ योजनेत गोंधळ! 2100 रुपयांचे आश्वासन हवेतच, 50 हजार महिला अपात्र

‘लाडकी बहीण’ योजनेत मानधन 1500 वरून 2100 रुपये करण्याचे आश्वासन दिले असले तरी त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यातच सुमारे 50 हजार महिलांचे अर्ज अपात्र ठरल्याने लाभार्थींमध्ये नाराजी वाढली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 13, 2026 | 11:24 AM
Chandrapur News: ‘लाडकी बहीण’ योजनेत गोंधळ! 2100 रुपयांचे आश्वासन हवेतच, 50 हजार महिला अपात्र

Chandrapur News: ‘लाडकी बहीण’ योजनेत गोंधळ! 2100 रुपयांचे आश्वासन हवेतच, 50 हजार महिला अपात्र

Follow Us
Close
Follow Us:
  • 2100 रुपयांचे आश्वासन अपूर्ण, सरकारने मानधन वाढवण्याची घोषणा केली, पण अंमलबजावणी नाही
  • 50 हजार महिला अपात्र, ई-केवायसी आणि इतर कारणांमुळे मोठ्या संख्येने अर्ज बाद
  • लाभार्थींमध्ये नाराजी, 3-4 महिन्यांपासून हप्ता न मिळाल्याने महिलांमध्ये असंतोष
चंद्रपूर: विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेच्या मानधन १५०० वरून २१०० करण्याची मागणी होत आहे. सरकारही त्यासाठी सकारात्मक आहे. मार्च महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी मानधन वाढविण्याची घोषणा केली. मात्र ते कधीपासून देणार हे सांगितले नाही. तर दुसरीकडे ४ लाख ९२ हजार लाडक्या बहिणींपैकी ई-केवायसी व इतर कारणांमुळे ५० हजारांच्या जवळपास महिलांचे अर्ज बाद करण्यात आले. त्यामुळे २१०० रुपयांचा पत्ता नाही आणि शासनाकडून महिलांचे अर्ज बाद करण्याचे कार्य सुरू असल्यामुळे लाडक्या बहिणींच्या पदरी निराशाच पडली आहे.

Ahilyanagar News: हक्काच्या जमिनीसाठी लढा! शेतकरी संसारासह पोलिस ठाण्यात दाखल, प्रशासनाची उडाली दाणादाण

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ही योजना जुलै २०२४ ला सुरू केली. योजनेच्या प्रमुख उद्दिष्टानुसार आर्थिक स्वावलंबन अंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दरमहा १५०० (वर्षाला १८ हजार रुपये) देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर करण्याचे उदिष्ट होते. महागाईच्या काळात घरखर्च, मुलांचे शिक्षण आणि आरोग्य यासारख्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी कुटुंबाला आधार म्हणून हे पाऊल राज्य शासनाने उचलले. या योजनेचा लाभ आर्थिकदृष्ट्या दुर्बल, विधवा, घटस्फोटित, आणि निराधार महिलांना मिळत आहे. असे असले तरी गत २. ३ महिन्यांपासून अनेक महिलांना लाभा मिळालेला नसल्याने व शासनाकडून मिळालेल्या २१०० रुपयाच्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे महिलांमध्ये नाराजीचा सूर उमटता असल्याचे दिसून येत आहे.

५० हजार लाभार्थी अपात्र

शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घेण्यासाठी ४ लाख ९२ हजार ९५१ अर्ज प्राप्त झाले. यातील ४ लाख ४२ हजार ९०५ अर्ज पात्र ठरले तर, ५० हजार ०४६ अर्ज अपात्र ठरविण्यात आले. ४५८ लाभार्थी २१ वर्षाखालचे असल्यानं, २९६२ लाभार्थी ६५ वरील असल्याने, ४३ हजार २२६ लाभार्थीचे इकेवायसी न झाल्याने तर इतर १९२ लाभार्थी असल्याने त्यांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले. यामुळे एकूण ५० हजार ०४६ महिला बाद झाल्या.

३ ते ४ महिन्यांपासून बहिणीचा हप्ता आलेला नाही. माझ्यासह गावातील अनेक गरजू महिलांना हप्ता मिळाला नाही. ज्या महिलांना आवश्यकता नाही, त्यांना लाभ मिळत असून मौल मजुरी करून जगणाऱ्या महिलांना हप्ता मिळत नाही. निवडणुकीपुरता घोषणा केल्या. आता वाऱ्यावर सोडलेले आहे. – रंजना गुरनुले, नागाळा

शासनाने विधानसभा निवडणुकीसाठी योजना सुरू केली. मध्यंतरी २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले, मात्र अद्यापही आमच्या खात्यात फक्त १५०० रुपये प्रमाणेच हप्ता जमा होत आहे. त्यामुळे शासनाने वाढती महागाई लक्षात घेता २१०० रुपये प्रमाणे हप्ता द्यावे. – प्रियंका कांबळे, चंद्रपूर

Mira Bhayander : “काळ आला पण वेळ नाही”; परिसरात दुहेरी संकट, एकाच दिवशी दोन ठिकाणी भीषण आग

सध्या सिलिंडर, तेलाच्या किमतीसह अनेक वस्तूंची महागाई वाढलेली आहे शासनाने २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे शासनाने बहिणीचा विचार करायला हवा. मतदानापूर्वी २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले. मात्र या आश्वासनाची पूर्तता केली नाही. त्यामुळे शासनाने कुठेतरी आश्वासनांची पूर्तता करून बहिणींना दिलासा द्यावा.- सविता बोरूले, चिमढा

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचार्‍यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Ladki bahin scheme faces backlash 2100 rupees promise pending 50000 women declared ineligible chandrapur news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 11:24 AM

Topics:  

  • Chandrapur
  • Ladki Baheen Yojana
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

भिवंडीत अनधिकृत शाळांचा सुळसुळाट! 21 शाळांवर कारवाईचा इशारा, विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर संकट
1

भिवंडीत अनधिकृत शाळांचा सुळसुळाट! 21 शाळांवर कारवाईचा इशारा, विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर संकट

Raigad News: दासगाव-गोठे खाडी पूल प्रकल्प रखडला! भूसंपादन वादामुळे १०० कोटींच्या कामाला ब्रेक
2

Raigad News: दासगाव-गोठे खाडी पूल प्रकल्प रखडला! भूसंपादन वादामुळे १०० कोटींच्या कामाला ब्रेक

मुंबईत सीटी स्कॅन अहवालांवर मोठा घोटाळा? स्कॅन स्वाक्षऱ्या आणि नोंदणी क्रमांकात विसंगतीचे धक्कादायक आरोप
3

मुंबईत सीटी स्कॅन अहवालांवर मोठा घोटाळा? स्कॅन स्वाक्षऱ्या आणि नोंदणी क्रमांकात विसंगतीचे धक्कादायक आरोप

शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा ताण; शालेय निकालावर परिणाम होण्याची भीती, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
4

शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा ताण; शालेय निकालावर परिणाम होण्याची भीती, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.